जाहिरात
5 months ago
मुंबई:

टी20 वर्ल्डकपवर विजयाची मोहोर उमटवणाऱ्या टीम इंडियाच्या काही खेळाडूंचा आज विधिमंडळात सत्कार केला जाणार आहे. दरम्यान विधिमंडळाचं काम काज सुरू झालं आहे. आजही विधिमंडळ कामकाजाची सुरुवात विरोधकांनी पायऱ्यांवर विरोधप्रदर्शन करीत झाली. 

CNG बाईक प्रदूषणमु्क्त भारत या ध्येयाला मोठा हातभार लावेल - नितीन गडकरी

प्रदूषणमुक्त भारत करण्याचं माझं सर्वात मोठं ध्येय आहे. त्याअनुषंगाने सीएनजी बाईक या ध्येयाला मोठा हातभार लावेल यात शंका नाही. वाहन उद्योग क्षेत्रात भारताचा आधी जगात सातवा नंबर होता. आता अलीकडच्या तीन महिन्यांपूर्वीच आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचलो आहे. पहिलं यूएसए, दुसरं चीन आणि मग भारताचा नंबर लागतो. आपण वाहन उद्योग क्षेत्रात भरारी घेतोय. - नितीन गडकरी

अजित पवार आणि त्यांची शेरो शायरी...

प्यार करोगे तो प्यार करेंगे, हाथ मिलाओगे तो हाथ भी मिलायेंगे, गले मिलोगे तो गले मिलायेंगे, सितम करोगे तो सितम करेंगे, हम आदमी है तुम्हारे जैसे, तूम करोगे वही हम करेंगे. 

अजित पवार

साधरण 30-25 हजार कोटी महसुलात वाढ होताना दिसतेय - अजित पवार

 साधरण 30-25 हजार कोटी महसुलात वाढ होताना दिसतेय. जीएसटी व्हॅट तसंच इतर करामुळे ही वाढ होत आहे. कर माध्यमातून उत्त्पन वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं जात आहे - अजित पवार

कोरोना काळात महसुल कमी जमा झाला. आता मागील वर्षाच्या तुलनेन 11 टक्के महसुल वाढ झाली आहे - अजित पवार

कोरोना काळात महसुल कमी जमा झाला. आता मागील वर्षाच्या तुलनेन 11 टक्के महसुल वाढ झाली आहे - अजित पवार

अर्थसंकल्पाची गोपनीयता राखली गेलेली आहे. अर्थसंकल्प फुटला नाही - अजित पवार

अर्थसंकल्पाची गोपनीयता राखली गेलेली आहे. अर्थसंकल्प फुटला नाही - अजित पवार 

अर्थसंकल्पातील चर्चेवर अजित पवारांचं उत्तर

अर्थसंकल्पातील चर्चेवर अजित पवारांचं उत्तर

झिका, चिकनगुनिया आणि डेंग्यूही; पुण्यातील 2 रूग्णांना एकाचवेळी तीन रोगांची बाधा

पुण्यातील दोन झिका रुग्णांना चिकनगुनिया आणि डेंग्यूचाही संसर्ग झाल्याची माहिती आहे. या दोन झिका रूग्णांना एकाच वेळी तीन रोगांची बाधा झाली आहे. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेने (NIV) यासंदर्भात माहिती दिली. पुण्यातील एक झिका पीसीआर पॉझिटिव्हन नमुन्यात चिकनगुनिया ऍन्टीबॉडीजसाठी पॉझिटिव्ह आढळला आहे. 

मनोज जरांगे पाटील यांची उद्या हिंगोलीत जनजागृती शांतता रॅली

मनोज जरांगे पाटील यांची उद्या हिंगोलीत जनजागृती शांतता रॅली

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जनजागृती शांतता रॅलीची घोषणा केली आहे. या रॅलीला उद्या पासुन हिंगोली जिल्ह्यातून सुरुवात होणारं आहे. उद्या सकाळी 11 वाजता हिंगोली शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होईल. रॅलीची हिंगोली जिल्हा सकल मराठा बांधवांच्या वतीने हिंगोली शहरात जय्यत तयारी करण्यात आलीय. अंदाजे 2 ते 3 लाख मराठा बांधव या रॅलीत सहभागी होतील असा दावा मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आला आहे. 

विधिमंडळाचं कामकाच सुरू होण्यापूर्वी सुप्रिया सुळेंचा पत्रकारांशी संवाद

विधिमंडळाचं कामकाच सुरू होण्यापूर्वी सुप्रिया सुळेंचा पत्रकारांशी संवाद

नितेश राणेंची राजकीय उंची कमी - रोहित पवार

गुरुवारी वानखेडे स्टेडिअममधून रोहित शर्मा बाहेर निघत होता, इतक्यात आशिष शेलार तिथे धावत आले. त्यांनी रोहित शर्माला थांबवलं, आणि रोहित पवार यांना तुमच्याशी बोलायचं आहे, फोटो काढायचा आहे, असं काहीसं सांगितलं असावं. त्यामुळे 'हिटमॅन'ला थांबला अन् त्याने फोटो काढला. यावरून नितेश राणे यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे. यावर आज विधिमंडळात जाण्यापूर्वी रोहित पवारांनी स्पष्टीकरण दिलं. 

मी रोहित शर्मासोबत फोटो काढण्यासाठी गेलो होतो. कारण तो मोठा खेळाडू आहे. बीसीसीआयला मी गुजरातच्या गाडीसंदर्भात प्रश्न विचारला होता. ऐनवेळी गाडी उपलब्ध नव्हती, त्यामुळे  गुजरातची गाडी वापरण्यात आली असं स्पष्टीकरण देण्यात आलं. नितेश राणे काहीही राजकारण करत आहेत. त्यांची राजकीय उंची कमी आहे - रोहित पवार

Listen to the latest songs, only on JioSaavn.com