मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शनिवारी निघालेल्या विराट मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंविरोधात अनेकांनी आक्रमक भाषणे करत राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येवरुन विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत. दरम्यान प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर आज मराठी कलाकार पुढे आले. अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत प्राजक्ता माळीला पाठिंबा दिला. आज नवी मुंबई विमानतळावर पहिला व्यावसायिक विमानाचं यशस्वी लँडिग झालं. नवी मुंबईतील विमानतळ देशातील दुसरं सर्वात मोठं विमानतळ आहे. या विमानतळामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बराच भार कमी होईल.
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. बीड प्रकरणात राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यात कलाकारांचे नाव बदनाम होत आहे. याबाबतची खंत प्राजक्ता माळी व्यक्त केली.
Live Update : डहाणूतील कासा-सावन राज्यमार्गावर वाघाडी येथे भीषण अपघात, तिघांचा मृत्यू
डहाणू तालुक्यातील कासा-सावन राज्यमार्गावर वाघाडी येथे भीषण अपघात झाला आहे. इको गाडी आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन कासा चारोटी येथील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये राहुल हरके (२०), चिन्मय चौरे (१९), आणि मुकेश वावरे (२०) यांचा समावेश आहे. जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Live Update : नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथील राहत्या इमारतीचा स्लॅब कोसळला, नागरिकांचा जीव धोक्यात...
कोपरखैरणे येथे पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. सेक्टर ७ मधील ही घटना आहे . तळमजला अधिक ३ मजले अशी ही सम्राट नावाची इमारत आहे. पालिकेने तत्काळ इमारत रिकामी करण्याचा सूचना दिल्या असून येत्या आठ दिवसात ही इमारत रिकामी केली जाणार आहे . या इमारतीत एकूण 16 कुटुंब वास्तव्यास आहे .
Live Update : महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांनी केला सत्कार
महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केला सत्कार
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशाबद्दल केला सत्कार
भाजप संघटन पर्वाच्या कार्यशाळेत सर्व राज्यांच्या अध्यक्ष आणि प्रभारी यांच्यासमोर बावनकुळे यांचं राष्ट्रीय अध्यक्षांकडून कौतुक
देवेंद्र फडणवीस यांच्या कष्टाचा माझ्या आजच्या यशात खूप मोठा वाटा असल्याची बावनकुळे यांनी व्यक्त केली भावना
सोबतच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचाही करण्यात आला सत्कार
Live Update : बोईसर येथील तारापुर MIDC मधील केमिकल कंपनीला भीषण आग
बोईसर येथील तारापुर MIDC मधील केमिकल कंपनीला भीषण आग
युके एरोमँटिक अँड केमिकल कंपनीला भीषण आग
तारापुर MIDC मधील प्लॉट नंबर K -६ मधल्या कंपनीला आग
आग आणि धुराचे लांबच लांब लोळ उसळले
अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल
आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही
Live Update : संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींचे मृतदेह सापडल्याची माहिती देणारा व्यक्ती होता दारूच्या नशेत?
संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींचे मृतदेह सापडल्याची माहिती देणारा व्यक्ती होता दारूच्या नशेत
बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोषी देशमुख यांच्या खून प्रकरणातील तीन आरोपींच्या मृतदेह कर्नाटक बॉर्डर रोड सापडल्याची माहिती अंजली दमानिया यांना एका व्यक्तीने व्हाईस मेसेज वरील पाठवली होती परंतु या प्रकरणात आता पोलिसांनी तपास केला असून त्यांना ज्या व्यक्तीने असा मेसेज केला होता तो मतदार का च्या नशेमध्ये असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे या घटनेविषयी कोणतीही माहिती कोणाकडे असल्यास त्याने पोलीस कार्यात पोलीस अधिकाऱ्यास किंवा पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Live Update : दुचाकीवर आलेल्या 4 अज्ञातांनी मारहाण करत व्यापाऱ्याची साडे बारा लाख रुपये असलेली बॅग पळवली
जालना शहरातील जुना मोंढा परिसरात दुकान बंद करून घरी जात असताना मोबाइलवर बोलण्यासाठी दुचाकीवर उभ्या असलेल्या व्यापाऱ्यावर पाळत ठेऊन दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी व्यापाऱ्याला मारहाण केली. दुचाकीला लटकवलेली साडे बारा लाखांची रोकड हिसकावून पळ काढला रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेली ही संपूर्ण घटना मोंढा परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे.
Live Update : किरीट सोमय्या उद्या पुन्हा मालेगाव दौऱ्यावर, आणखी एक घोटाळा उघडकीस करण्याचे सूतोवाच
माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमय्या उद्या ३० डिसेंबरला पुन्हा मालेगाव दौऱ्यावर आहेत. उद्या ते मालेगावातील तहसील कार्यालय व महापालिकेला भेट देणार आहे. दरम्यान सोमय्या 27 डिसेंबरलाच नियोजित मालेगाव दौरा होता. मात्र भारताचे माजी पंतप्रधान ज्येष्ठ अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याने किरीट सोमय्या यांनी मालेगाव दौरा हा रद्द केला होता. ते आता उद्या 30 डिसेंबरला मालेगाव दौऱ्यावर येत असून मालेगावमध्ये आणखी एक घोटाळा उघडकीस करण्यासाठी मालेगावी जात असल्याचे सोमय्या यांनी ट्विट केले. यापूर्वी सोमय्या यांनी बेरोजगार तरुणांची बनावट अकाउंट व बँकेत कोट्यावधींची फसवणुकीचे प्रकरण उचलून धरले होते.उद्या नेमका किरीट सोमय्या काय मोठा गौप्य स्फोट करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे...
Live Update : ठाणे महानगरपालिकेचे प्रथम महापौर सतीश प्रधान यांचे वृद्धापकाळाने निधन
ठाणे नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, ठाणे महानगरपालिकेचे प्रथम महापौर, शिवसेना नेते तसेच स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे सतीश प्रधान यांचे आज दुपारी 2 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मोठे योगदान दिले. त्यांचे निधन म्हणजे ठाणे शहरासाठी तसेच शिवसेनेसाठी मोठी हानी आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी 10 वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघेल.
Mumbai Boat Accident: मढ कोळी वाढ्यातील तिसाई बोटीचा अपघात, कोणतीही जिवितहानी नाही
मुंबईच्या मढजवळील समुद्रात दोन मासेमारी करणाऱ्या बोटींचा अपघात झाल्याचं समोर आले आहे. मड कोळी वाड्यातील तिसाई बोटीचा अपघात झाला असून मालवाहू जहाजाने धडक दिल्याने बोट बुडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही.
Navi Mumbai Airport: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! नवी मुंबई विमानतळावर व्यावयासिक विमानाचं यशस्वी लँडिग
नवी मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी. नवी मुंबई विमानतळावर पहिले व्यावसायिक विमानाचे लँडिग झालं आहे. इंडिगो कंपनीचे विमान नवी मुंबई विमानतळावर दाखल झालं आहे. महिन्याभरापूर्वी करण्यात आलेली लँडिंग टेस्ट यशस्वी झाल्यानंतर आता व्यावसायिक विमानाचे लँडिंग होत आहे. यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
Solapur Crime: एसटी बसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; सोलापूरमधील धक्कादायक प्रकार
एसटी बसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. बारामती ते इंदापूर मार्गे बार्शीकडे निघालेल्या बस प्रवासामध्ये अनोळखी युवकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला.
ही गोष्ट लक्षात येताच पीडितेच्या पालकांनी थेट बार्शी शहर पोलीस ठाणे गाठले. आरोपीने अल्पवयीन मुलीला आपल्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवत विनयभंग केला. रमेश सुब्राव बनसोडे नामक आरोपीला बार्शी शहर पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले असून आरोपीवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील आरोपींची हत्या झाल्याचा दावा, अंजली दमानिया यांना पोलिसांची नोटीस
बीड हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपींचा खून झाला असून त्यांचे मृतदेह सापडल्याचा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केला होता. यावरुनच आता स्थानिक गुन्हे शाखेने अंजली दमानिया यांना पत्र पाठवलं आहे.
फरार आरोपी यांच्या डेडबॉड्या सापडल्याचं अंजली दमानिया यांनी माध्यमांसमोर बोलल्यामुळे पत्र पाठवण्यात आले असून अंजली दमानियाच्या वक्तव्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत माहिती व पुरावे पोलिसांकडे सादर करावे यासाठी पोलिसांकडून दमानियांना पत्र पाठवण्यात आले आहे.
Maharashtra Politics: जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने व्हाट्सअप चॅट व्हायरल केल्याप्रकरणी रूपाली ठोंबरे यांच्यासह 8 जणांवर गुन्हा
बीड येथील मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने एक व्हाट्सअप चॅट वायरल झाले होते.. या प्रकरणात आता बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष मोहसिन शेख यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून.. यामध्ये शेख यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांचा फोटो व त्यांचा मोबाईल क्रमांक वापरून बनावट व्हाट्सअप चॅट व्हायरल केल्याचे म्हटले आहे.. या प्रकरणाचा तपास आता बीडचे शिवाजीनगर पोलीस करत आहेत.
Pandharpur Bus Accident: पंढरपुरमध्ये बस- ट्रकचा भीषण अपघात, 2 प्रवाशांचा मृत्यू
पंढरपूर - टेंभुर्णी मार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवेढावरुन पुण्याकडे जाताना ही मोठी दुर्घटना घडली असून अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
Nana Patole News: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना मातृशोक
राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. या घटनेने पटोले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुपारी 2.00 वाजता नाना पटोले यांचे मूळ गाव असलेले साकोली तालुक्यातील सुकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल.
Nandurbar News: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात
नंदुरबार जिल्ह्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर ते ०४ जानेवारी पर्यंत सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती भाजपाचे सरचिटणीस विजय चौधरी यांनी दिली आहे. राज्यात भाजपाची चांगली परिस्थिती असल्याने मोठ्या प्रमाणावर आमदार निवडून आले आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीतील ताकतीने लढणार आहेत त्यासाठी जिल्ह्यातील सात मोर्चे आणि ३२ आघाड्या मिळून सदस्य नोंदणी केली जाणार आहे या सदस्य नोंदणी मुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजपाला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे सदस्य नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती भाजपाचे सरचिटणीस विजय चौधरी यांनी दिली आहे.
Ulhasnagar Crime: चोरीची दुचाकी घेऊन फिरले अन पोलिसांना सापडले, बाईक चोरांची टोळी जेरबद
उल्हासनगरमध्ये काही संशयित इसम चोरीची बाईक घेऊन फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे कर्मचारी पिंट्या थोरवे यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेनं अमरडाय कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून रवी जैस्वार, आशिष गुप्ता आणि बाबू रिझवी या तिघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे असलेली ज्युपिटर स्कुटर ही मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली असल्याचं निष्पन्न होताच त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत त्यांनीय दुचाकीसह आणखी ६ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या सर्व गाड्या गुन्हे शाखेनं जप्त केल्या.
Dharashiv Crime: संतापजनक: तुरीच्या शेंगा तोडायला गेलेल्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार
घराच्या जवळच असलेल्या शेतातील तुरीच्या शेंगा तोडण्यासाठी गेलेल्या एका १३ वर्षीय मुलीवर गावातीलच तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उमरगा तालुक्यातील एका गावात घडली. उमरगा तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय मुलगी घराला लागूनच असलेल्या शेतात तुरीच्या शेंगा तोडण्यासाठी गेली होती. ती शेंगा तोडत असताना गावातीलच एक तरुण तिच्या पाठीमागून आला. तिला तुरीच्या शेतात ओढत नेत तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घरी आल्यानंतर पीडितने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. यानंतर आईने मुरूम पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद झाला.