राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसे नेते, मुंबई शहराध्यक्ष उपाध्यक्ष यांची राज ठाकरे यांच्यासोबत सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली असून दोन्ही ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येतील अशी वातावरण निर्मिती होत असताना राज ठाकरे मनसे नेते मुंबईतील पदाधिकारी यांच्यासोबत काय चर्चा करतात, कोणत्या सूचना देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
Live Update : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उद्या होणाऱ्या शपथविधी
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार
उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांना खास आमंत्रण
एनडीए मधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि प्रमुख सहकारी म्हणून शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार.
एकनाथ शिंदे यांचा विशेष निमंत्रितांमध्ये समावेश
Live Update: नक्षलवाद्यांच्या सर्वोच्च नेतेपदी देवजीची वर्णी?
नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता तसेच भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) सरचिटणीस नंबला केशवराव उर्फ बसवराज याला २१ मे रोजी छत्तीसगडमधील नारायणपूर जंगलात सुरक्षा दलाच्या जवानांनी चकमकीत ठार केले होते. आता या चळवळीचे सूत्र जहाल नक्षल नेता थिप्पारी तिरुपती उर्फ देवजी (६१) याच्याकडे सोपविण्यात आले आहे. आज मंगळवार, ९ सप्टेंबरला यावर शिक्कामोर्तब झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मात्र, यास अद्याप सुरक्षा यंत्रणा व नक्षलवाद्यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
Live Update : मराठा आरक्षणाचा जीआर मागे घ्या, छगन भुजबळांची मागणी
Live Update : मराठा आरक्षणाचा जीआर मागे घ्या अशी मागणी मंत्री छगन भुजबळांनी केली आहे. नाही तर राज्यात अराजक माजेल असं भुजबळ म्हणाले. मोर्चाला घाबरून सरकारने चुकीचे निर्णय घेवू नयेत असंही ते म्हणाले. ओबीसी एकत्र येवून मोठा लढा उभारू शकतात असंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रतिज्ञापत्रावरून मराठ्यांना ओबीसीमध्ये टाकता येणार नाही असं ही त्यांनी सांगितलं.
Live Update : पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वात मोठी क्लाइंबिंग वॉल उभारण्यात आली
पिंपरी चिंचवड मधील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या आणि आय टी कर्मचाऱ्यांच्या पसंतीच ठिकाण असलेल्या पिंपळे सौदागर परिसरात महाराष्ट्रातील सर्वात मोठी क्लाइंबिंग वॉल उभारण्यात आलीय.
तब्बल १४ कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेल्या योगा गार्डन मध्ये ही क्लाइंबिंग वॉल उभारण्यात आलीय...! एवढच नाही तर या योगा गार्डन मध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत...! योगा गार्डन आणि क्लाइंबिंग वॉल चे लवकरच उद्घाटन केले जाणार आहे.
Live Update : अखेर माधुरी हत्तीणी प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी इथल्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणी प्रकरणात सुनावणी घेण्यास अखेर सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे. या प्रकरणावर उद्या शुक्रवारी (दि.१२) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती पार्डीवाला यांच्या पिठासमोर होणार सुनावणी होणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
Live Update : पावसाच्या पाण्यामुळे सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी
पावसाच्या पाण्यामुळे सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी
- पावसाच्या पाण्यामुळे सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी
- सोलापूर जिल्ह्यात काल रात्रीपासून सकाळपर्यंत 118. 3 मिमी पावसाची नोंद
- शहरातील शेळगी, जुना विडी घरकुल, अक्कलकोट रोड परिसर अशा अनेक भागात पाणीच पाणी
- सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व परिस्थितीचे चित्रीकरण केले आहे ड्रोन पायलट नागेश राशिनकर यांनी
Live Update : वारजे पुलाखाली मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी
वारजे पुलाखाली मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी
पुण्यातील वारजे पुलाखाली मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी
वारजे वाहतूक पोलीस सकाळपासून वाहतूक मोकळी प्रयत्न करत त्यांच्या मदतीला वारजे पोलीस ठाण्यातील अंमलदार व अधिकारीही पाठविण्यात आले
वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण
Live Update : केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर आज शिर्डीत साईंच्या दर्शनाला
केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आज शिर्डीला भेट देत साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. समाधीसमोर नतमस्तक होत त्यांनी पाद्यपूजाही केली. साई संस्थानच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला.
दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना खट्टर यांनी कोणतीही राजकीय प्रतिक्रिया देणं टाळलं. मात्र नेपाळमधील परिस्थितीवर बोलताना त्यांनी साईबाबांच्या शिकवणीची आजही तितकीच गरज असल्याचं सांगितलं. “साईंच्या दर्शनानंतर मनःशांती लाभते आणि सर्व पीडा दूर होतात,” असंही त्यांनी नमूद केलं.
Live Update : वर्धा नदी फुगल्याने गडचांदूर भोयेगाव मार्ग बंद
वर्धा नदीला पूर आल्याने चंद्रपुरातून कोरपनाकडे जाणारा गडचांदूर भोयेगाव मार्ग बंद झाला. मार्ग बंद होण्याची ही सहावी वेळ आहे. पश्चिम विदर्भात मुसळधार पाऊस पडल्याने वर्धा नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने गडचांदूर भोयेगाव मार्ग बंद झाला. या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. चंद्रपुरातील इरई धरणाचे तीन दरवाजे ०.२५ मीटर ने उघडण्यात आल्याने नदी काठावरील गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता वाढली असताना शेती पाण्याखाली येण्याचे संकट अधिक गडद झाले आहे. प्रशासनाकडून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
Live Update : सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली
सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्ग केला पाण्याखाली
सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गला प्राप्त झाले नदीचे स्वरूप
सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गवर येतायत सुमद्रप्रमाणे लाटा, वाहतूक पूर्णतः खोळंबली
सोलापूर वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरु आहेत अतोनात प्रयत्न
Live Update : मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी
मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी
हेल्पलाइन ११२ वर अज्ञाताचा कॉल
मुंबईच्या समुद्रात बॉम्बस्फोट होणार असल्याची दिली धमकी
धमकी येताच मुंबई पोलीस सतर्क
अज्ञात कॉलरचा मुंबई पोलिसांकडून शोध सुरू
Live Update : सोलापूर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, शहरातील अनेक भागात शिरले मोठ्या प्रमाणात पाणी
- सोलापूर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, शहरातील अनेक भागात शिरले मोठ्या प्रमाणात पाणी
- जिल्ह्यात सर्वत्र काल मध्यरात्रीनंतर तुफान पाऊस
- शहरातील शेळगी भागातील हे सर्व भीषण परिस्थिती ड्रोन कॅमेरात कैद
Live Update : नेपाळमधील हिंसाचार घटनेचा कोल्हापुरातील प्रवाशांना फटका
नेपाळमधील हिंसक घटनेनंतर कोल्हापुरातील काही प्रवासी काठमांडू मध्ये अडकले आहेत. डॉ अजित पाटील हे एका हॉटेलमध्ये थांबले असल्याची माहिती. सध्या ते सुरक्षित आहेत. तसेच कोल्हापुरातील आणखी एका प्रवाशांचा ग्रुप चीनच्या सीमेवरील कोदारी या ठिकाणी आहे. सध्या सर्वजण सुरक्षित असलेल्या तरी नातेवाईकांमध्ये मात्र धाकधूक आहे. विमानसेवा सुरु झाल्यामुळे लवकरच ते भारतात परततील अशी माहिती. तसेच हिंसाचाराच्या घटनेमुळे पर्यटकांकडून नेपाळ प्रवास रद्द करण्यात आला आहे.
Live Update : ठाकरे बंधू यांच्या भेटीनंतर काँग्रेस एकटं लढण्याच्या तयारीत
ठाकरे बंधू यांच्या भेटीनंतर काँग्रेस एकटं लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती
आगामी मुंबईला महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र लढणार हे जवळपास आता निश्चित झालं आहे
अशात महाविकास आघाडी सोबत असलेला एक महत्वाचा पक्ष काँग्रेस मात्र एकटं लढण्याच्या तयारीत आहे
जागा वाटप आणि कार्यकर्त्यांच्या विचार लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे
Live Update : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अमरावतीच्या दर्यापुरात गर्भवती महिलेचा मृत्यू
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अमरावतीच्या दर्यापुरात गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचे प्रकरण...
आरोग्य विभागाच्या चौकशीनंतर चार महिन्यांनी डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल...
डॉ.माधुरी रवींद्र साबळे असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नावं...
डॉ.साबळे यांच्याकडून उपचारात हलगर्जी झाल्याचा आरोग्य विभागाच्या अहवालात ठपका....
Live Update : गणेश विसर्जन मिरवणुकीत 23 मंडळ, डीजे मालक आणि स्ट्रक्चर मालकांवर गुन्हे दाखल
गणेश विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट करून विद्युत रोषणाईसाठी मोठ्या आकाराचे स्ट्रक्चर वापरणे 23 मंडळांना भोवले. जुना राजवाडा पोलिसांनी 23 मंडळांच्या अध्यक्ष, डीजेमालक आणि स्ट्रक्चरमालक अशा 69 जणांवर गुन्हे दाखल केलेत. या कारवाईमुळे मंडळांच्या कार्यकर्त्याचे धाबे दणाणले असून, अनेक तरुणांचे करिअर धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांच्या आदेशांचे उल्लंघन करणे, मोठ्या स्ट्रक्चर उभे करून रस्ते अडवणे, प्रेशर मिडचा वापर केल्याबद्दल कलम 223 आणि 285 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. मिरवणुकीत मंडळांनी पोलिसांचे आदेश धुडकावून लावत आवाजाचा दणदणाट केला. यासाठी प्रेशर मिड तंत्राचा वापर केला. अवाढव्य आकाराचे स्ट्रक्चर उभे करून रस्ते अडवले. तसेच काही मंडळांनी गर्दीत स्मोकरमधून कार्बनडाय ऑक्साइड सोडून उपस्थितांच्या जीविताला धोका निर्माण केला.याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीये.
Live Update : वसमत तालुक्यातील कोठारी जंगलामध्ये बिबट्या आढळला मृतअवस्थेत..
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कोठारी शिवारातील जंगलामध्ये तीन वर्षाच्या बिबट्याचा मृतदेह आढळून आला आहे, वन विभागाचे कर्मचारी जंगलात गस्त घालत असताना एका झुडपामध्ये बिबट्या मृतअवस्थेत दिसून आलाय, त्यानंतर वन विभागाने पशुसंवर्धन विभागाचे पथक घटनास्थळावर दाखल होत.. या बिबट्याचे जंगलात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.. हा बिबट्या दोन ते तीन वर्षाचा असल्याकारणाने शिकार करता आली नसल्याने इतर प्राण्यां सोबत झुंज देत असताना मृत्यू झाला असल्याचा दावा वनविभागाने केला आहे.
Live Update : शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना ओळखपत्र लावणे बंधनकारक
छत्रपती संभाजीनगर
शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना ओळखपत्र लावणे बंधनकारक
ओळखपत्र न लावणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही होणार
सामान्य प्रशासन विभागाने काढले आदेश
काही शासकीय अधिकारी, कर्मचारी कार्यालयात कार्यालयीन ओळखपत्र लावत नसल्याने काढले आदेश
Live Update : गडचिरोली येथे 23 दिवसानंतर एनएचएम कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे...
गडचिरोली-राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर अखेर मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार याविषयी सकारात्मक असल्याचे सांगत आबिटकर यांनी संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन 13 पैकी 10 मागण्यांना तत्वतः मान्यता दिली. तसे लेखी पत्र राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्त केले. यामुळे गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेला बेमुदत संप अखेर मागे घेण्याचा निर्णय संघटनेने घेतला.
Live Update : जायकवाडी धरणातील आवक घटली, 21 दिवसांनंतर जायकवाडीतून विसर्ग बंद
पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक कमी झाली असून सध्या १ हजार ५७२ क्युसेक पाणी येत आहे. धरणाच्या मुख्य २७ पैकी १८ दरवाज्यातून मागील २९ दिवसापासून पाण्याचा विसर्ग सुरू होता तो आज २१ दिवसानंतर बंद करण्यात आला आहे. धरणाचा पाणी साठा साध्य ९८.७९ टक्क्यांवर आहे. गेल्या २१ ऑगस्टला दुसऱ्यांदा आणि ३१ जुलै पहिल्यांदा पाणी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. या दरम्यान १०२ टीएमसी क्षमता असलेल्या धरणातून ४० टीएमसी पाणी गोदावरी पात्रात सोडले गेल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे. १९७३ मध्ये धरणाची निर्मिती पूर्ण झाल्यानंतर धरणातून आजवर २४ वेळा विसर्ग झाला आहे. यंदाही साठा ९८ टक्के झाल्यामुळे दुसऱ्यांदा पाणी सोडले गेले होते. यामुळे मराठवाड्यासह नांदेडपर्यंत या पाण्याचा उपयोग झाला. हे पाणी सोडल्याने शेतीसाठी वाढीव जलसाठ्याचा उपयोग होईल. जायकवाडी धरण यंदा पूर्ण भरल्याने रब्बीसाठी ७ आवर्तने देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यात बागायती शेतीचे क्षेत्र वाढेल. शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या वेळी पाणी मिळेल. धरणातून विसर्ग झाल्यानंतर मराठवाड्यातील जिल्ह्यांसह विदर्भ, तेलंगणातील अनेक जिल्ह्यांना लाभ होतोय.
Live Update : धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग शहर आज बंद
धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग शहर आज बंद असणार आहे. नळदुर्ग येथे ईद-ए-मिलाद च्या मिरवणूकीत औरंगजेबाचा घोषणा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचा व्हिडीओ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंदूत्ववादी संघटनांकडून पोलिसांना निवेदन देत संबधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज नळदुर्ग शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
Live Update : नेपाळमधील अडकलेल्या मराठी पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोनवरून संवाद
नेपाळमधील अडकलेल्या मराठी पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद
नेपाळमधील अराजकतामुळे महाराष्ट्रातील ३०० हून अधिक पर्यटक अडकले. महाराष्ट्रात मुरबाड तालुक्यातील मोठ्या संख्येने पर्यटक नेपाळमध्ये अडकले आहेत… या मुरबाड मधील पर्यटकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधला. तसेच त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दिलासाही दिला.