जाहिरात
2 hours ago

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार आज दोघेही एकत्र येणार आहेत. पुण्यातील साखर संकुलातील तंत्रज्ञानाविषयी असलेल्या एका बैठकीसाठी सकाळी 11 वाजता दोन्ही नेते उपस्थित राहतील. काल 20 एप्रिल रोजी शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देणं टाळलं. पण आज शरद पवार काही बोलणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 

राज्यपालांकडून राहुल पांडे यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ

राज्यपालांकडून राहुल पांडे यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ देण्यात आली आहे.  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे यांना राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभात राज्यपालांनी रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर व गजानन निमदेव यांना देखील राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली.  सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे तसेच इतर माहिती आयुक्त यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखविली. शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तसेच समारोप राष्ट्रगीताने झाला.

नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी हमीद इंजिनियर याला जामीन

नागपूर हिंसाचार प्रकरणातील या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.  17 मार्च रोजी घडलेल्या नागपूर हिंसाचाराचा महत्वपूर्ण आरोपी हमीद इंजिनियर याला नागपूर सत्र न्यायालयातून जामीनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. पन्नास हजार रुपयाच्या मुचलक्यावर जामीनावर मुक्ततेचे आदेश देण्यात आलेत. सत्र न्यायाधीश ओझा यांच्या न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.  आज उशीर झाल्याने उद्या सकळी मध्यवर्ती कारागृहातून सुटका होणार आहे. त्याच्यावर हिंसेला चिथावणी दिल्याचा आरोप आहे.

बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कसलेला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेच्या पोलीस कोठडीत वाढ झालीय. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ॲट्रॉसिटी प्रकरणात 23 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेलीय. 

बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यादरम्यान पोलिसांनी तपासासाठी दहा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने 23 मार्चपर्यंत कोठडी सुनावलीय. यादरम्यान पोलिसांना रणजीत कासलेच्या मोबाईल मधील डेटा रिकव्हर करायचा आहे.

तसेच ज्या वाहनात रणजीत कासले विविध ठिकाणी फिरला. ते वाहन जप्त करण्याची परवानगी पोलिसांकडून न्यायालयात मागण्यात आली. मात्र कासलेच्या वकिलांनी या विरोधात युक्तिवाद केला.

Live Update : बदलापुरात मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली रेल्वे प्रशासनाची भेट

बदलापूर रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्मला बसवलेल्या जाळ्या काढण्याची मागणी करत आज मनसेच्या शिष्टमंडळाने रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी डीआरएम ऑफिसशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी मनसे शिष्टमंडळाला दिलं.

Live Update : पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या 88 वर्षी व्हेटिकन सिटीमध्ये निधन

Live Update : पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या 88 वर्षी व्हेटिकन सिटीमध्ये निधन

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच, आमदार रोहित पाटील यांची प्रतिक्रिया

राज्यात उद्धव आणि राज ठाकरेंच्या मनोमिलनाचे वारे वाहत असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आनंद होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सर्व संघटना एकत्र येऊन काम केल्यास महाराष्ट्रात एक मजबुती निश्चितपणाने येईल,असा विश्वास देखील आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

Live Update : काँग्रेस विरोधात अमरावतीत भाजप आक्रमक..

नॅशनल हेरॉल्ड घोटाळा प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध भाजपकडून आंदोलन करण्यात आल आहे.  अमरावतीच्या मालटेकडीपासून ते श्याम नगर चौकापर्यंत राहुल गांधी व काँग्रेसची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत काँग्रेस भवन समोर भाजपा आंदोलन करणार होते. मात्र या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेटींग करत भाजप कार्यकर्त्यांना अडवले. त्यावेळी पोलीस व भाजप कार्यकर्त्यात जोरदार राडा घातला. झटापट झाली तर भाजप आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस भवनाबाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

महाराष्ट्र द्वेष्ठांच्या विरोधात लढण्यासाठी दोघांनी एकत्र येण्याची गरज- विनायक राऊत

शिवसेना ठाकरे गटाने नेते विनायक राऊत यांनी म्हटलं,  राज ठाकरे व उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे ही मराठी माणसांची इच्छा आहे. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना अट घातलेली नाही, मात्र शंका बोलून दाखवली. ती रास्त आहे, त्याचा खुलासा आताच झाला पाहिजे.  नाहीतर आता मिठी मारायची आणि नंतर फाटे फोडत जायचे हे योग्य नाही. त्यामुळे राज ठाकरे त्यावर योग्य तो विचार करतील. महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र द्वेष्ठांच्या विरोधात लढण्यासाठी आज दोघांनी एकत्र येण्याची गरज आहे.

Live Update : अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरंदकरला जन्मठेपेची शिक्षा

Live Update : अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरंदकरला जन्मठेपेची शिक्षा  

Live Update : पूजा खेडकरला पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश

पूजा खेडकरला पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश

जोपर्यंत चौकशीत सहकार्य करेल तोपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम 

आतापर्यंत पूजा खेडकरची ठोस चौकशी झालेली नाही, न्यायालयाचे निरीक्षण 

पूजा खेडकर हजर राहील … चौकशीत सहकार्य करेल - पूजा खेडकरांचे वकील

Live Update : पुजा खेडकर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात

पुजा खेडकर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात 

दिल्ली पोलिसांच्या वतीने खेडकरच्या कोठडीची मागणी 

कोठडीत चौकशीची आवश्यकता नाही - पूजा खेडकरच्या वकिलांचा युक्तिवाद 

दिल्ली पोलीस - पूजा खेडकर १२ वेळा परीक्षेला बसल्या 

जरी त्या दिव्यांग असला तरीही ९ वेळा परीक्षा दिल्या जाऊ शकतात 

Live Update : नंदुरबार दोंडाईचा येथील गुलमोहर कॉलनी परिसरात असलेल्या भंगारच्या दुकानाला भीषण आग

नंदुरबारमधील दोंडाईचा येथील धुळे रस्त्यावर असलेल्या गुलमोहर कॉलनी परिसरातील भंगारच्या गोडाऊनला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धुळे, नंदुरबार, शहादा, शिंदखेडा, दोंडाईचा, शिरपूर या अग्निशामक दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरू असून अजूनही आग नियंत्रणात आलेली नाही आगीने भीषण रूप धारण केल्याने परिसरातील घरांनाही आगीच्या मोठा फटका बसला आहे... मात्र सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही अजूनही आग नियंत्रणात नसल्याने जवानांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

Live Update : नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात आणखी एकाला अटक

नागपूर शिक्षक भरती घोटाळा अपडेट

नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात आणखी एकाला अटक 

राजू केवलराम मेश्राम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव 

मेश्राम याची लिंक बोगस दस्तावेज बनविणारा शिक्षक महेंद्र म्हैसकर याच्यासोबत होती....

महेंद्र म्हैसकर यांनी पराग पुडके कडून बोगस अनुभवाचे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी अडीच लाख रुपये घेतले.. त्यातील 25 हजार रुपये राजुला कमिशन म्हणून दिले...

राजू मेश्राम हा लिपीक होता तेथून त्याने संस्थेच्या सचिव पदापर्यंत मजल मारली ती देखील संशयास्पद..

मेश्राम स्वतः भंडारा जिल्ह्यात अर्जुनी मोरेगाव येथील पिंपळगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळेत सचिव होता..

संस्थेतील वादामुळे हा प्रकरण धर्मदाय आयुक्तांकडे गेले आणि त्याला बडतर्फ करण्यात आले होते.. त्याविरोधात त्याने न्यायाधिकरणात दाद मागितली आहे..

Live Update : अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटमध्ये अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई..

अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटमध्ये अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई..

मेळघा मधील राणी गावात देखील पाण्यासाठी नागरिकांची धावपळ..

पाणी भरण्यासाठी सार्वजनिक नळावर मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांची गर्दी..

तर अनेक भागात डोंगरदर्‍यातून आणावे लागते पिण्याचे पाणी.

शासनाच्या अनेक पाण्याच्या योजना कुचकामी ठरल्याचा आरोप...

Live Update : कांदा बियाण्याची काढणी अंतिम टप्प्यात, उत्पादनात मोठी घट

वाशिम जिल्ह्यात कांदा (बीजवाई) बियाण्याचं  उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा मोठा फटका बसला आहे. सध्या बियाण्याची काढणी अंतिम टप्प्यात आहे, मात्र परागीकरणात अडथळा आल्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली असून, शेतकऱ्यांच्या खर्चाची भरपाईही होऊ शकलेली नाही.

Live Update : बडतर्फ अधिकारी रणजीत कासलेला आज न्यायालयात करणार हजर...

बडतर्फ अधिकारी रणजीत कासलेला आज न्यायालयात करणार हजर...

ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्ह्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये आज होणार सुनावणी...

दुपारी 3 वाजता जिल्हा सत्र न्यायालयात करणार हजर...

ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्ह्यातून रणजीत कासलेला जामीन मिळणार का?

Live Update : पाण्यात पोहताना युवकाला फिट आली, बुडलेल्या तरुणाचे स्थनिक जीव रक्षकांनी वाचविले प्राण

मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील कुंडमळा बंधाऱ्यात दापोडी येथील हरीश राव हा आपल्या मित्रासोबत पोहण्यासाठी उतरला असता, अचानक त्याला फिट आल्याने तो पाण्यात बुडत असताना स्थानिक जीव रक्षक आणि तळेगांव आंबी एमआयडीसी पोलीसांनी वाचविले या मुलाचे प्राण वाचविले आहेत, 

Live Update : एकीकडे राज्यात तापमानात वाढ तर गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

एकीकडे राज्यात तापमानात वाढ झाल्याने नागरिकांचे बेहाल झाले आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा व कोरची तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यामुळे वातावरणात काही प्रमाणात थंडावा जाणवत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून अचानक उन्हाचा पारा वाढल्यामुळे नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत होते. परंतु आज आलेल्या पावसामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा दिसून येत आहे.

Live Update : अकोल्याच्या अन्यायाविरोधात प्रगती शेतकरी मंडळकडून 1 मे रोजी राष्ट्रीय महामार्गावर तीव्र आंदोलन

अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूरमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय नाही, याचिका दिल्यावरही सरकार गप्प. या अन्यायाविरोधात प्रगती शेतकरी मंडळाच्या नेतृत्वाखाली १ मे रोजी राष्ट्रीय महामार्गावर तीव्र आंदोलन होणार आहे. दरम्यान, या बाबत 20 एप्रिल रोजी मंडळ कार्यालयात आंदोलन नियोजनासाठी बैठक आयोजित केली आहे. या आंदोलनामध्ये जनमंच संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आंतरभारती संस्था, न्यू एज क्लब फार्मर्स ग्रुप व यंग बॉइज क्लब सहभागी होणार आहेत. सरकारला जागे करण्यासाठी शेतकऱ्यांनी या एल्गार आंदोलनात सहभागी व्हाव, असे आवाहन राजू वानखडे यांनी केले.