
प्रविण मुधोळकर प्रतिनिधी: राज्यभरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वाशीतील भाजीपाला मार्केटमध्ये मालाची आवक कमी झाली असून, भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांहीही रेलचेल कमी झाली आहे. परिणामी शिल्लक भाजीपाला फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. चांगल्या प्रतीचा माल चढ्या दराने विकला जात असला तरी या शेतात बराचसा माल भिजल्याने खराब झाला आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अशा भाजीपाल्याच्या दरांवर परिणाम झाला असून, अनेक भाज्यांचे दर झपाट्याने कमी झाले आहेत. विशेषतः पालेभाज्या शेतातूनच भिजून आल्याने बाजारात येईपर्यंत खराब झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे पालेभाज्यांचे दर 30 ते 40 टक्क्यांनी कमी झाले आहेत. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाजारात 449 गाड्यांची आवक झाली असून खालीलप्रमाणे दर आहेत:
Maharashtra Politics: 'आम्हाला PM मोदींच्या प्रकृतीची चिंता...', 'सामना'चा लक्षवेधी अग्रलेख!
फ्लॉवर : 16-22 रुपये किलो
टोमॅटो : 16 ते 24 रुपये किलो
वाटाणा : 90 ते 110 रुपये किलो
फरसबी : 60 ते 90 रुपये किलो
गवार 30 ते 60 रुपये किलो
भेंडी 34 ते 40 रुपये किलो
शेवग्याच्या शेंगा : 20 ते 60 रुपये किलो
कोथिंबीर : 8 ते 10 रुपये जुडी
पालक : 8 ते 10 रुपये जुडी
मेथी : 8 ते 10 रुपये जुडी
कांदा पात : 8 ते 10 रुपये जुडी
नक्की वाचा - Maharashtra Rain : सोलापुरकरांसाठी चांगली बातमी! जून उजाडण्यापूर्वीच उजनी धरण होणार फुल्ल
दरम्यान, व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे शेतात पिकांचे नुकसान झाले असून, याचा परिणाम थेट बाजारात जाणवतो आहे. येणाऱ्या काही दिवसांतही दर तळाला येण्याची शक्यता कमी असून, दरवाढ कायम राहू शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. पावसामुळे संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा फटका सामान्य ग्राहकांपासून व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांनाच बसला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world