जाहिरात

Amit Thackeray : 'मला मनापासून हे करायचंय'; आमदार होताच अमित ठाकरे पहिलं काम काय करणार? 

यावेळी अमित ठाकरे म्हणाले, निवडणुकीमुळे आयुष्य बदलणार आहे. आधीचं स्वातंत्र्य जाईल. शासकीय पदाचं ओझं खूप असतं. त्यामुळे पोटात गोळा आला आहे.

Amit Thackeray : 'मला मनापासून हे करायचंय'; आमदार होताच अमित ठाकरे पहिलं काम काय करणार? 
मुंबई:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे (Raj Thackeray's son Amit Thackeray) पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे माहीम मतदारसंघातून मनसेकडून राज ठाकरे, शिंदे गटाकडून सदा सरवणकर, ठाकरे गटाकडूनही उमेदवार उभा करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अमित ठाकरेंसाठी ही निवडणूक सोपी नसेल. दरम्यान आज त्यांनी पत्रकार परिषद घेत भविष्यातील प्लानिंग सांगितलं.

यावेळी अमित ठाकरे म्हणाले, निवडणुकीमुळे आयुष्य बदलणार आहे. आधीचं स्वातंत्र्य जाईल. शासकीय पदाचं ओझं खूप असतं. त्यामुळे पोटात गोळा आला आहे. देवाने खूप दिलंय, मी त्याच्याकडे काही मागत नाही. 

वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवत होते, तेव्हा मनसेकडून कोणताही उमेदवार देण्यात आला नव्हता. यंदा ठाकरे गट काय भूमिका घेणार? यावर अमित ठाकरे म्हणाले, राज ठाकरेंची भूमिका ही उपकाराची भूमिका नसते. त्याची परतफेड कोण करेल याची ते अपेक्षा करत नाही. लोकसभेला त्यांनी मोदींना पाठिंबा दिला. त्याची परतफेड करावी याची इच्छा नाही. 

राज यांचा मास्टर स्ट्रोक, लेकाला माहिममधून उमेदवारी का? इतिहास काय सांगतो?

नक्की वाचा - राज यांचा मास्टर स्ट्रोक, लेकाला माहिममधून उमेदवारी का? इतिहास काय सांगतो?

समोर कोणीही उभा असू दे , ही लढाई आहे. मी राज ठाकरेंना सांगितलं होते की, माझ्या जागेसाठी कोणाशी तडजोड करू नका. मी राज ठाकरेंना कधीही सांगितले नाही की, मला कोणता मतदारसंघ द्या म्हणून. लोकांचे प्रश्न मला तोंडपाठ आहेत. मला मनापासून एक करायचंय की इथला समुद्रकिनारा स्वच्छ करून द्यायचाच. असा किनारा कधी लोकांना बघायला मिळाला नसेल, इतकं काम करायचं आहे.  जर आदित्यने सांगितलं तर त्याच्या मतदारसंघातला समुद्रकिनाराही मी साफ करून देईन. आमदार झाल्यानंतर इतल्या जनतेसाठी काही दिवस राखीव ठेवणार आहे. इथले प्रश्न सोडवणं कठीण नाहीये. माझ्याकडून सर्वसामान्यांसाठी प्रवेश असेल. 

निवडणूक लढवावी का वाटली यावर अमित ठाकरे म्हणाले, पक्षाला गरज होती असं मला वाटतं. आदित्यने सत्तेत असताना निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मनसेची तशी परिस्थिती नाहीये. त्यामुळे राज ठाकरेंनी माझ्यावर विश्वास टाकणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. 2023 नंतर आपण सत्तेत बसू त्यामुळे निसर्गाचे प्रश्न सुटतील. मी राज ठाकरेंकडे मतदारसंघ मागितला नाही. त्यांनी जनतेचा, मनसैनिकांचा आवाज ऐकला. लोकांची इच्छा काय आहे हे जाणून घेतलं. २०१५-२०१६ पासून मला नेता करा अशी मनसैनिकांनी मागणी होती. पत्रकारांनी दिलेल्या बातम्यांमुळे राज ठाकरेंनी कौल ऐकला. या बातम्या नसत्या तर राज ठाकरेंनी मला हे दिलं नसतं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
अजित पवारांच्या मनात काय? पहिल्या यादीनंतर नवाब मलिकसह दिग्गज नेते वेटिंगवर
Amit Thackeray : 'मला मनापासून हे करायचंय'; आमदार होताच अमित ठाकरे पहिलं काम काय करणार? 
kopergaon-assembly-no-kolhe-vs-kale-family-contest-2024
Next Article
काळे- कोल्हे संघर्षाला पुर्णविराम! कोपरगावमध्ये पहिल्यादाच कोल्हे घराण्याची माघार