जाहिरात

Sangli Crime News : आधी गप्पा मारल्या, मग बायकोचा गळा चिरला; सांगलीच्या सरकारी घाटावरील दृश्य पाहून सगळेच हादरले

Man killed Wife : प्रियांका चव्हाण असे या मयत महिलेचे नाव असून जागाप्पा चव्हाण असे आरोपी नवऱ्याचे नाव आहे. पती पत्नीच्या वादातून हा खुनाचा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

Sangli Crime News : आधी गप्पा मारल्या, मग बायकोचा गळा चिरला; सांगलीच्या सरकारी घाटावरील दृश्य पाहून सगळेच हादरले

शरद सातपुते, सांगली

नवऱ्याने बायकोची गळा चिरून हत्या केल्याची घटना सांगलीच्या सरकारी घाटावर घडली आहे. आरोपी पती घटनेनंतर फरार झाला आहे. घरगुती वादातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस या प्रकरणी सविस्तर तपास करत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रियांका चव्हाण असे या मयत महिलेचे नाव असून जागाप्पा चव्हाण असे आरोपी नवऱ्याचे नाव आहे. पती पत्नीच्या वादातून हा खुनाचा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी पती हा घटनेपूर्वी बबळेश्वर काकटगी कर्नाटक येथे राहत होता. तर पत्नी प्रियांका ही सांगली वाडी येथे आपल्या आईकडे रहात होती. ती सांगलीतील एका साडी दुकानात काम करत होती. 

(ट्रेंडिंग बातमी - Shivsena News: मर्सिडीज वरून राजकारण सुसाट! गोऱ्हेंकडे आता थेट पावत्यांची मागणी)

रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पती जाकाप्पा चव्हाण आणि पत्नी प्रियांका ही सरकारी घाटावर बोलत बसले होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि या वादातूनच पतीने सोबत आणलेला चाकू काढून पत्नी प्रियांका हिचा गळा चिरला. या घटनेनंतर हल्लेखोर पतीने तिथून पळ काढला. 

आरोपी पती हा प्लॅन करुनच तिथे आला होता असा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. मयत प्रियांका ही सांगलीतील एका साडी दुकानात कामाला होती तर पती कर्नाटक येथे त्याच्या गावी राहत होता. 

(ट्रेंडिंग बातमी - Neelam Gorhe : ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं, नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याने खळबळ)

घरगुती कारणातून पतीने पत्नीचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक विमला एम, पोलीस निरीक्षक संजय मोरे, मुकुंद कुलकर्णी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी झाली होती.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: