जाहिरात

मनोज जरांगेंच्या जनजागृती शांतता रॅलीला हिंगोलीतून सुरुवात, मराठा बांधव मोठ्या संख्येने राहणार उपस्थित

Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी सरकारला दिलेला कालावधी 13 जुलै रोजी संपणार आहे.

मनोज जरांगेंच्या जनजागृती शांतता रॅलीला हिंगोलीतून सुरुवात, मराठा बांधव मोठ्या संख्येने राहणार उपस्थित

लक्ष्मण सोळुंखे, हिंगोली

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज जनजागृती शांतता रॅलीचं आयोजन केले आहे. आज हिंगोली शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत जनजागृती शांतता रॅली पार पडणार आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी सरकारला दिलेला कालावधी 13 जुलै रोजी संपणार आहे. याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जनजागृती शांतता रॅली मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत निघणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शांतात रॅलीला हिंगोली जिल्ह्यातून आजपासून सुरवात होणार आहे. सकाळी 10 वाजता जरांगे पाटील हिंगोली शहरात दाखल होतील. त्यानंतर 11 वाजता हिंगोली शहरातून ही रॅली निघेन. मनोज जरांगे पाटील यांना हिंगोली जिल्ह्यातील सकल मराठा बांधवांकडून 51 उखळी तोफांची सलामी देण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील लाखो मराठा समुदाय या रॅलीत सहभागी होणार आहे.  

(नक्की वाचा- मराठवाड्यात एल्गार! 288 जागांवर लढायचे की पाडायचे? मनोज जरांगेंची नवी खेळी काय?)

राज्यात 5 टप्प्यात ही रॅली काढण्यात येणार आहे. घराबाहेर पडल्याशिवाय मराठ्यांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे मराठ्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या रॅलीत मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. सरकारने आरक्षण दिलं नाही तर आम्हाला आरक्षण देणारं सरकार बनवावं लागेल, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी  सरकारला दिला आहे.

 (नक्की वाचा-  लोणावळा खंडाळा बंद करा, तुम्ही आमच्या पोटावर पाय आणला')

सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

याआधी सरकारकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी भेट घेतली. हिंगोलीपासून सुरु होणाऱ्या शांतता रॅलीच्या आधी अशोक चव्हाण यांची जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. सरकारची भूमिका अशोक चव्हाण यांनी जरांगे पाटील यांच्यासमोर मांडली. शिंदे समिती मनोज जरांगे यांच्या मागणीप्रमाणे हैदराबादला जाऊन निजामचे गॅजेट पाहणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
LIVE UPDATE: राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाची भायखळ्यात हत्या
मनोज जरांगेंच्या जनजागृती शांतता रॅलीला हिंगोलीतून सुरुवात, मराठा बांधव मोठ्या संख्येने राहणार उपस्थित
MNS leader Amit Thackeray wants to contest Assembly election who controls Mahim, Bhandup, Magathane constituencies
Next Article
Amit Thackeray : अमित ठाकरे विधानसभा लढवणार? त्या 3 मतदारसंघांवर कोणाचा कंट्रोल?