
Manoj Jarange Patil Mumbai Protest: ओबीसीमधून आरक्षण मिळावे, अशी मागणी करत मनोज जरांगेंसह लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मुंबईमध्ये आझाद मैदानावर जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु असून आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. एकीकडे सरकारकडून जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्याच्या हालचाली सुरु असतानाच जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसेच मराठा आंदोलकांनाही त्यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे.
काय म्हणालेत मनोज जरांगे पाटील?
"उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा, अपमान करु नका तुमचे काही मंत्री म्हणत आहेत. एकाचं काढून दुसऱ्याला देऊ शकत नाही आम्ही दुसऱ्याचं काढून आम्हाला द्या असं म्हणत नाही. गैरसमज महाराष्ट्रात पसरवू नका. आम्ही कुणाचंही आरक्षण काढून घेत नाही. मंत्री संभ्रम निर्माण करत आहेत. आमच्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात घ्या, अस आम्ही म्हणत आहोत, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
Fact Check: आंदोलकांमुळे लालबागचा राजा मंडळाचे अन्नछत्र बंद? व्हायरल मेसेजचे नेमके सत्य काय?
"मराठा आणि कुणबी एकच आहे असं आम्ही म्हणत आहोतराज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये हि अपेक्षा. सर्व मुलांना विनंती आहे, पोलीसांनी दिलेल्या पार्किंगमध्ये गाड्या लावा. समाज यांना कधी बाप वाटना नाही, म्हणून सात करोड मराठ्यांचा वाटोळं झालंआम्हाला आरक्षण हवं राजकारण करायचं नाही मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचंय, आरक्षण द्यायचं नाही सर्वांनी संयम धरा, शांत राहा आपण वाट पाहू. रस्त्यावर गाड्या लावण्याऐवजी पोलीसांनी दिलेल्या मैदानावर लावा," असं आवाहनही त्यांनी केले आहे.
आता "मुंबई सगळीकडे मराठे आलेत, त्यांनी मुंबई बघायची नाही का, यायचं नाही का? ते वाईट करायला आले नाहीत, हा माझा शब्द आहे रस्त्यावर गाड्या लावून वाहतूक कोंडी करू नका, मुंबईकरांना त्रास देऊ नका तुमच्या गाड्या पार्किंगला लावा शांततेत आंदोलन पार पाडून जिंकायचं आहे गोंधळ घालणाऱ्यांना सांगा शांत राहा.." असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आंदोलकांना आधार; मुंबई महापालिकेने आझाद मैदानात दिल्या तात्काळ सेवा-सुविधा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world