सध्या महराष्ट्रात भीषण पाणीटंचाई पहायला मिळते आहे. मराठवाडा, विदर्भ यासारख्या भागांमध्ये नागरिकांना रोजच्या वापरासाठी पाणी मिळवताना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे. अशातच जालना येथील अंबड शहरात एक दुर्दैवी प्रकार घडला आहे. स्वयंपाक करताना पाणी संपल्यामुळे बोअरवेल सुरु करायला गेलेल्या महिलेचा विद्युत केबलला चिकटल्यामुळे जळून मृत्यू झाला आहे.
नेमकं घडलं तरी काय?
27 वर्षीय विवाहीत महिला पुजा मते ही संध्याकाळच्या वेळेस स्वयंपाक बनवण्याच्या तयारीत होती. यावेळस पाणी संपल्यामुळे पुजा या घरातली बोअरवेल सुरु करायला गेल्या. परंतु यादरम्यान त्यांच्यासमोर काय वाढून ठेवलं होतं. याची त्यांना जराही कल्पना नव्हती. बोअरवेलच्या विद्युत केबलला चिकटून पुजा यांचा जळून मृत्यू झाला.
हे ही वाचा - सुप्रीम कोर्टाने 14 वर्षांच्या मुलीच्या गर्भपाताची परवानगी देणारा आदेश घेतला मागे
आगीत घराचंही मोठं नुकसान -
दरम्यान आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु घरात ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे ही आग आणखीनच भडकली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अखेरीस स्थानिकांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. परंतु यात पुजा मते हिला आपले प्राण गमवावे लागले.
घडलेल्या प्रकरणात अंबड पोलिसांमध्ये नोंद करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरता मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा - अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपींनी केली बाळाची विक्री; आई वडिलांविरोधातही गुन्हा दाखल
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world