जाहिरात

'विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी', राज ठाकरेंच्या फडणवीसांना 'मनसे' शुभेच्छा

Raj Thackeray on Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचा मुख्यमंत्री होईल, असं भाकित राज ठाकरे यांनी केलं होतं. ते खरं झालं आहे.

'विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी', राज ठाकरेंच्या फडणवीसांना 'मनसे' शुभेच्छा
मुंबई:


Devendra Fadnavis Oath-Taking Ceremony : देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. 20 नोव्हेंबरला झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत बहुमत मिळालं. भारतीय जनता पार्टीनं सर्वाधिक 132 जागा जिंकल्या. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वात भाजपानं हे यश मिळवलं. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती. त्या चर्चेवर भाजपाच्या विधीमंडळ बैठकीत बुधवारी (4 डिसेंबर) शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर त्यांनी गुरुवारी (5 डिसेंबर) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नवं सरकार अस्तित्वात येताच त्यांना शुभेच्छांचं सत्र सुरु झालंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचा मुख्यमंत्री होईल, असं भाकित राज ठाकरे यांनी केलं होतं. ते खरं झालं आहे. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं आहे. महायुतीला मिळालेल्या बहुमताचा  या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल ही आशा राज यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ, हे सांगायला देखील राज विसरले नाहीत.

बाळासाहेबांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी घेतली शपथ, तिघांच्याही शपथेमध्ये साम्य काय?

( नक्की वाचा : बाळासाहेबांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी घेतली शपथ, तिघांच्याही शपथेमध्ये साम्य काय? )

राज ठाकरे यांची संपूर्ण पोस्ट

आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी  तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन. 

2019 ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो. 

पुढची 5 वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. 

पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की...

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा !

राज ठाकरे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com