Devendra Fadnavis Oath-Taking Ceremony : विधानसभा निवडणुकीत दणदणीत बहुमत मिळवल्यानंतर महायुती सरकाराचा शपथविधी झाला आहे. मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. ते यापूर्वी 2014, 2019 मध्ये मुख्यमंत्री झाले होते.
देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रिपद भूषविल्यानंतर उपमुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे हे राज्यातील दुसरे नेते आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस 2022 साली शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते.
एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पृथ्वीराज चव्हाण (2 वेळा), देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत.
( नक्की वाचा : निवडणुकीतील पराभव, टोमणे आणि सत्तेपासून दूर राहिल्यानंतरही कसं केलं फडणवीसांनी कमबॅक? )
शिंदेंनी केलं बाळासाहेबांचं स्मरण
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचं स्मरण केलं. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख केला. तसंच राज्यातील 13 नागरिकांचाही त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.
( नक्की वाचा : भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रिपदी निवड का झाली? 5 महत्त्वाची कारणं )
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांच्या पदाची शपथ घेताना वडिलांसोबत त्यांच्या आईंच्य़ा नावाचाही उल्लेख केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world