
नाशिक: राज्यात सध्या मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद शिगेला पोहोचला आहे. मनसेकडून मराठीचा अपमान करणाऱ्या परप्रांतियांना धडा शिकवला जात आहे. असाच प्रकार नाशिकमध्ये घडला असून मनसैनिकांनी मराठी कुटुंबाला त्रास देणाऱ्या परप्रांतियाला बेदम चोप दिला आहे. हा परप्रांतीय युवक अर्ध नग्न अवस्थेत फिरायचा तसेच स्थानिक मराठी नागरिकांवर दादागीरी करतात असा आरोप मनसेने केला आहे.
Kolhapur News: एकतर्फी प्रेम, अल्पवयीन मुलाकडून छळ; महाविद्यालयीन तरुणीने मृत्यूला कवटाळलं
नेमकं काय घडलं?
नाशिकच्या पंचवटीतील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी महिलेला व तिच्या कुटुंबियांना मारण्याच्या धमकीपासून ते फ्लॅट् मला विका नाहीतर मी जीवन जगणं हराम करीन अशी धमकी एक परप्रांतीय देत होता. इतकेच नव्हेतर तो फ्लॅटसमोर लघुशका करणे, अंतरवस्त्र, बनियनवर फ्लॅट्स समोर फिरून त्रास द्यायचा तसेच काही दिवसांपूर्वी गळ्यावरील ओढणी हिसकावून मारण्याचाही त्याने प्रयत्न केला.
या तरुणाच्या त्रासाला कंटाळून मराठी भगिनीने मनसे महिला शहराध्यक्ष सौं अक्षराताई घोडके तसेच मनसे प्रदेश सरचिटणीस श्री दिनकर आण्णा पाटील, शहराध्यक्ष श्री सुदाम भाऊ कोंबडे, पंचवटी विभाग अध्यक्ष श्री योगेश भाऊ दाभाडे ह्यांना फोन केला. सदरील महिलेला धीर देण्यासाठी तसेच त्या परप्रांतीय इसमाला समजावून सांगण्यासाठी तेथे गेल्या नंतर त्या परप्रांतीय त्रिपाठीने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरु केली त्याने अश्लील भाषेत वर्तन केले.
Pune News: पुणे महापालिकेत मनसेचा जोरदार राडा, नक्की काय घडलं?
धक्कादायक म्हणजे त्याने त्याच्या सहकाऱ्यांना बोलावून दमदाटी केली तसेच हॉकी स्टिक, देसी कट्टे दाखवण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी त्या तरुणाला बेदम चोप दिला तसेच परप्रांतीयना सळो कि पळो केले, त्यानंतर सर्वांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांकडून या सर्वांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मनसेच्या दणक्यानंतर या परप्रांतियांनी लोकांची जाहीर माफी मागितली तसेच इथून पुढे आम्ही कुणाला त्रास देणार नाही असे सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world