Nashik News: शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. भाविकांच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झालाय, तर अन्य चार लोक जखमी झाले आहेत. नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील एरंडगाव रायते शिवार परिसरात ही दुर्घटना घडली. फॉर्च्युनर कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला,पाच लोक गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारांसाठी नाशिकमध्ये नेण्यात आले, यादरम्यान वाटेतच एका जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला. अन्य चार लोकांवर नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अपघाताचा पोलीस करतायेत तपास
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉर्च्युनर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती उलटली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघाताची अधिक माहिती शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
(नक्की वाचा: Jalgaon News: भरधाव रेल्वेखाली येवून तरुण मामा- भाच्याचा गुढ मृत्यू, रिल बनवत होते की अन्य काही?)
वाशिम जिल्ह्यातील अपघातातही 3 जणांचा मृत्यू
18 ऑक्टोबर रोजी वाशिम जिल्ह्यामध्येही भीषण अपघात झाला होता. समृद्धी महामार्गावरील एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात म्यानमारच्या तीन नागरिकांचा जागीच मृत्यू झाला होता आणि तीन जण गंभीर जखमी झाले होते. अपघातग्रस्त कार मुंबईहून ओडिशातील जगन्नाथ पुरी दर्शनासाठी जात होती. कारमधील सर्व प्रवासी म्यानमारमधील रहिवासी होती.
(नक्की वाचा: Akola News : पाऊस सुरू असताना घराबाहेर पडला अन् चिमुकल्यावर काळाने झडप घातली..8 वर्षीय मुलाचा मृत्यू!)
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की गाडीच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला. प्राथमिक तपासामध्ये चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे आढळून आले.
(Content Source: IANS)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world