
Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याला 15 दिवस उलटल्यानंतर आज भारतीय लष्कराने पद्धतशीर हिशोब चुकता केला. भारतीय लष्कराकडून पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. यामध्ये 62 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या हल्ल्यानंतर देशभरातील नागरिकांसह राजकीय नेत्यांनी भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या मोहिमेत आम्ही केंद्रीय नेतृत्वासोबत आहोत असे म्हणत देशवासियांना आणि राजकारण्यांना एक मोठे आवाहनही केले आहे.
काय म्हणाले शरद पवार?
"गेल्या आठवड्यामध्ये काश्मीरमध्ये जे घडलं त्यानंतर साहजिकच लोकांमध्ये अस्वस्थता होती. ज्यांचा काही संबंध नाही अशा निष्पाप लोकांना गोळ्या घालतात, २७ लोक मरतात. अशावेळी कुठल्याही देशाला बघ्याची भूमिका घेता येत नाही. पण हे करताना काळजी घेणे महत्त्वाचे होते. भारत आणि पाकिस्तानमध्ये पीओके आहे. तिथेच हे हल्ला करण्याचे स्थान केंद्रित केले असे दिसते त्याचे कारण म्हणजे तिथे दहशतवादी कँप आहेत. तिथे ट्रेनिंग दिले जाते, दारुगोळा तयार केला जातो," असे म्हणत शरद पवार यांनी लष्कराच्या या मोहिमेचे कौतुक केले.
"आज या हल्ल्यानंतर संपूर्ण देशवासियांची आणि राजकीय नेतृत्वांची जबाबदारी आहे की एअरपोर्स आणि लष्कराने जी भूमिका घेतली त्याच्या पाठीमागे उभे राहावे. अशी भूमिका आमचीही आहे. कालच्या एक्शननंतर अमेरिका, जपान अशा काही महत्त्वाच्या देशांनी समर्थन दिले मात्र काळजी करण्यासारखी गोष्ट अशी आहे की चिनने आपल्याला समर्थन दिलेले नाही," असे महत्त्वाचे विधानही शरद पवार यांनी केले.
दरम्यान, "युद्धाला सुरुवात होईल का हे आज सांगणे योग्य नाही पण सतर्क राहण्याची गरज आहे. पाकिस्तान कुठपर्यंत पुढे जाईल माहिती नाही. त्यांना त्यांची ताकद माहिती आहे, भारताची ताकद माहिती आहे. आपण सतर्क राहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पाकची जी आर्थिक कोंडी करण्याबाबत जी पावले उचलली गेली त्यामध्ये काही चुकीचे नाही. अशा घटनांवर संकुचित भूमिका घेणे शहाणपणाचे नाही. अशावेळी संयम दाखवावा लागतो. वातावरण पाकिस्तानमध्येसुद्धा मोठा वर्ग पाकिस्तानी नेतृत्वावर नाराज आहे. आज आपण एकत्र राहूया," असे आवाहनही त्यांनी केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world