जाहिरात

Sangli News : मुस्लिमांनी बकरी ईद कशी साजरी करायची, हे सांगायला नितेश राणे मुफ्ती आहे का?, राष्ट्रवादीच्या आमदाराची टीका

मंत्रिपदाची शपथ घेऊन बालिशपणाचे विधान करणाऱ्या नितेश राणेंना आवर घालण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन करणार असल्याचेही आमदार नायकवडी यांनी स्पष्ट केले आहे.

Sangli News : मुस्लिमांनी बकरी ईद कशी साजरी करायची, हे सांगायला नितेश राणे मुफ्ती आहे का?, राष्ट्रवादीच्या आमदाराची टीका

शरद सातपुते, सांगली

बकरी ईदच्या कुर्बानीवरून मंत्री नितेश राणेंनी केलेल्या विधानावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडींनी नितेश राणेंवर निशाणा साधला आहे. बकरी ईद कशी साजरी करायची,हे सांगायला नितेश राणे मुफ्ती आहे का? असा सवाल करत वाचळवीर नितेश राणेंनी मुस्लिम समाजाला शहाणापण सांगण्याची गरज नाही,अशी टीका देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मंत्रिपदाची शपथ घेऊन बालिशपणाचे विधान करणाऱ्या नितेश राणेंना आवर घालण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन करणार असल्याचेही आमदार नायकवडी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच शासनाने प्रतिबंधित केलेल्या पशूंची कुर्बानी मुस्लिम समाजाकडून देण्यात येत नाही. ती होऊ नये, याचीही जबाबदारी मुस्लिम समाजाची असल्याचेही आमदार इद्रिस नायकवडी यांनी स्पष्ट केले आहे. सांगलीच्या मिरजेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

(नक्की वाचा-  Explainer: चिनाब रेल्वे पूलाचं स्वप्न अखेर पूर्ण! चीन-पाकिस्तानचं का वाढलं टेन्शन? वाचा संपूर्ण माहिती)

आमदार इद्रिस नायकवडी म्हणाले, बकरी ईद साजरी करताना कुर्बानी करण्याबाबतचे इस्लाम धर्मामध्ये कडक आचारसंहिता आहे. ज्याचे काटेकोर पालन मुस्लिम समाजाकडून केले जाते. योग्य पद्धतीने आणि पाण्याचा भरपूर वापर करून ती क्रुबानी करण्यात येते. पण नितेश राणेंना आताच या सर्व गोष्टी का आठवू लागल्या आहेत. हे सांगायला कोणात्या ज्योतिषाची गरज नाही. कारण त्यांना विशिष्ट समुदायाचा हिरो होऊन मीच धर्मरक्षण करतोय असं दाखवायचं आहे. त्यामुळे विशिष्ट समुदायाबद्दल वादग्रस्त विधान करून त्यातून प्रसिद्धी मिळवायची हा नितेश राणेंचा उद्योग आहे.

Baramati Crime: जीमसमोर उभी क्रेटा कार, पोलिसांना संशय आला अन्.. बारामतीत सर्वात मोठी कारवाई

काय म्हणाले होते नितेश राणे?

नितेश राणे यांनीपर्यावरणवादी आणि प्राणी हक्क कार्यकर्त्यांवर टीका केली होती आणि विचारले की त्यांनी "व्हर्च्युअल" बकरी ईद साजरी करण्याचे आवाहन का केले नाही. पर्यावरणवादी केवळ होळी आणि दिवाळी सारख्या हिंदू सणांना लक्ष्य करतात. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com