जाहिरात
1 day ago

Maharashtracha Jahirnama : NDTV मराठी चॅनेलचा महाराष्ट्राचा जाहीरनामा हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अन्य दिग्गजांनीही मतदारांच्या मनातील प्रश्नांची थेट उत्तर दिली. 

लोकसभेमध्ये कसे यांचे पानीपत झाले आणि विधानसभेमध्ये कशी सत्ता वाचवता येईल, यासाठी आता बहिणींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. -  नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

लोकसभा निवडणुकीत यांना लोकांनी जागा दाखवली मग आम्हाला बहीण तरी साथ देईल का? हा अयशस्वी प्रयत्न या लोकांनी केला -  नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

महिलांना तिकीट दिले, दीड हजार दिले म्हणजे महिलांचा सन्मान झाला असे भाजपाला वाटत असेल तर ते त्यांच्याजवळ ठेवा. लाडक्या बहिणी फक्त मतदानाच्या दिवसाची वाट पाहताहेत, दुर्गा होऊन या अत्याचारी व्यवस्थेला कसे संपवायचे हे आमच्या भगिनींनी ठरवलंय. तुम्हाला ते निकालामध्ये पाहायला मिळेल -  नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

आमच्याकडे महाविकास आघाडीच हा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहे -  नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

भाजपला गेल्या 10 वर्षे सातत्याने विदर्भाच्या लोकांनी डोक्यावर उचलले, तेच आता त्यांना पायाखाली दाबतील, असे चित्र तुम्हाला विदर्भात पाहायला मिळणार - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

मोदी देशाच्या राजकारणात आले तेव्हापासून भाजपाचे दिवस बदलले. पण महाराष्ट्रामध्ये मोदींना नाकारले. तर आता एकनाथ शिंदे, अजित पवार यांची काय स्थिती होणार, याचा तुम्हाला अंदाज नाहीय.  - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

आम्ही विश्वासाने चालणारी माणसे आहोत, त्यामुळे आमच्या मित्रावर अविश्वास करावे, हे आमच्या रक्तात नाही. - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

जागावाटपाच्या चर्चेमध्ये काही जागांचा मार्ग निघाला, काही जागांचा थांबलेला आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

महाराष्ट्रात थोड्या जागांचा जो काही प्रश्न आहे, त्या जागांबाबत बाळासाहेब थोरात यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे पाठवू, असे मीच हायकंमाडला सांगितले. पण त्यामध्ये सहमती झाली नाही - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

जिसका नाम होता है, उसकोही बदनाम किया जाता है -नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

काँग्रेसजवळ नेतृत्वासाठी कमतरता नाहीय -नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

बहुमतानंतरच मुख्यमंत्री होतो - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस 

पहिले महाराष्ट्र वाचवा, अशी काँग्रेस पक्षाची आणि आमचे नेते राहुल गांधीजींची भूमिका आहे.

महाराष्ट्र वाचवून या महाराष्ट्राला सुरक्षित करा आणि मुख्यमंत्री कोणाला बनायचंय ते महाविकास आघाडीमध्ये सर्व नेते बसून निर्णय घेतील. - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस 

मी आणि संजय राऊत आम्ही चांगले मित्र आहोत. पण आम्हा दोघांमध्ये काय भांडण लावले जाते मला अजूनही कळलेलं नाही - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस 

5-10 जागांसाठी अजूनही चर्चा सुरूच आहे. हा प्रश्न आम्ही सोडवू. 30 ऑक्टोबरनंतर आम्ही पुन्हा सर्व एकत्रित बसू आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. मविआ म्हणूनच आम्ही निवडणुकीला सामोरे जायचं निर्णय आम्ही घेतलाय. जागावाटपामध्ये हमरीतुमरी नाही झाली - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस 

काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, राष्ट्रीय पक्षाला गोष्टी फार सांभाळून घ्याव्या लागतात. प्रादेशिक पक्ष त्यांच्या मागण्या असतात, त्यांना मोठे व्हायचे स्वप्न असते. त्याला कोणाचा विरोध नाही. पण काँग्रेसने भूमिका मांडली होती की मेरिटच्या आधारावर जागावाटप करण्यात आली तर महाराष्ट्रात बहुमतात आपल्याला सरकार आणता येईल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नही केला, आजही आमचा प्रयत्न आहे. - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस 

महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होणार - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस 

बारामती हा असा मतदारसंघ आहे की तिथल्या मतदारांना विचारलं की तुम्ही कोणाला मत देणार? तर ते उघडपणे काही बोलत नाहीत. त्यामुळे सुप्रिया ताईंच्या वेळेचा आमचा अनुभव असा आहे की सर्वेक्षणाप्रमाणे त्यांना बारामतीत सर्वात कमी लीड मिळेल असे होते. पण सर्वात जास्त लीड तेथे मिळाले. त्यामुळे बारामतीकर मत व्यक्त करत नाही, असा माझा अनुभव आहे. ते फार हुशार आहेत. त्यामुळे प्रचार दोन्ही बाजूनं होईल पण निर्णय मतमोजणीनंतरच कळेल. - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार)

माझे लक्ष संख्येकडे आहे. महाविकास आघाडीची संख्या जास्त यावी. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष यांचे सहयोग-सहकार्य सर्वत्र व्हावे. एकजुटीने मविआ यावी, हे आमचे प्राधान्य आहे. मुख्यमंत्री बाकीच्या सर्व गोष्टी हे नाना पटोले सांगतील तसे आम्ही करू. - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार)

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? मुख्यमंत्री निवडणुकीच्या आधी ठरवण्याची प्रथा नाही. महायुतीचा चेहरा देवेंद्र फडणवीस होतायत असं दिसतंय. फडणवीस हा चेहरा ठरला असेल तर त्यांनी तो जाहीर करावा. आम्ही 30 तारखेला एकत्र बसल्यावर आमचं धोरण ठरवू.  पण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा द्यावा, या मानसिकतेमध्ये आम्ही नाहीत. ही घाई होते. त्यावर प्रतिक्रिया होतात. हा शेवटचा मुद्दा आहे. तो आमच्यासाठी नाही. पण समोर देवेंद्र फडणवीस आहोत हे आम्हाला दिसतातयत. -  जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार)

संजय राऊत महाविकास आघाडीचे प्रवक्ते आहोत. आम्ही त्यावर काही प्रतिक्रिया देत नाही. शरद पवारांनी जयंत पाटील मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे संकेत दिले असतील. पण कल्पना फार चांगल्या आहेत. संख्या येईपर्यंत त्यावर भाष्य करणं माझा इरादा नाही. महाविकास आघाडीचं बहुमत येणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होणं महत्त्वाचं आहे. पवार साहेबांचा मला नेहमी आशीर्वाद आहे.   जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार)

 

मनोज जरांगेंचं काय ठरलंय याची मला माहिती नाही. ते मिळण्याचा सोर्स माझ्याकडं नाही. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला संयुक्त बैठकीत ठरेल.  त्यानंतरच आम्ही याबाबत सांगू शकू. शरद पवार साहेबांचा प्रभाव महाराष्ट्रात बऱ्याच मतदारसंघात आहे. लोकसभेला पावार साहेबांनी चार पावलं मागे घेतली. आम्हाला विधानसभेला यापेक्षा जास्त जाग्या हव्या होत्या. आता निवडून येण्याची शक्यता आहे, त्याच्या कामाला आम्ही लागणार आहोत.

सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचे काम शरद पवारसाहेबांनी आज नाही, आयुष्यभर केलेले आहे.-  जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार)

जवळपास 90च्या आसपास आम्ही जागा लढवू. यावेळी निवडून येण्याची शक्यता,हा निकष वापरुनच जागा घेण्याची मागणी महाविकास आघाडीमध्ये केलीय. त्यामुळे आमचा निकाल चांगला लागेल -  जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार)

आमचे सरकार आल्यावर याच लाडक्या बहिणींना यापेक्षा दुप्पट आनंद होईल, अशी व्यवस्था आम्ही महाराष्ट्रात करू, अशी आमची भूमिका आहे.-  जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार)

लाडकी बहीण योजना सरकारने विचार न करता जाहीर केली. सरकारच्याच आमदाराने सांगितलं की आम्हाला मतं नाही मिळाली तर आम्ही हे ऑडिट करून ते कमी करू किंवा रद्द करू किंवा पैसे पुन्हा घेऊ, अशी विधानं त्यांची आहेत. समाजातल्या गरजू, संकटात असलेल्या महिलांना यापेक्षा जास्त मदत केली अशी आमची भूमिका आहे. -  जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार)

पैसे नाहीयेत पण लोकांना फसवण्याचे काम महाराष्ट्रात या सरकारने केलंय. खोटा फील गुड फॅक्टर या सरकारने तयार केलाय. -  जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार)

भाजपाचे नेते बाळासाहेब थोरातांच्या कन्येबाबत जे उद्गार काढतात त्यावरून महिलांबाबत भाजपा आणि त्यांच्या युतीतील जे पक्ष आहेत, त्यांची महिलांबाबतीत धारणा कशी आहे, हे वारंवार स्पष्ट होत आहे. अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, महिलाविरोधी गु्न्ह्यांतील वाढ, बदलापूरपासून अनेक घटना आहेत. यामुळे महाराष्ट्रातील महिलांचा यांच्यावरील विश्वास उडालाय, ही खरी वस्तूस्थिती आहे. -  जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार)

लाडक्या बहिणीचा जीआर 28 जूनला निघाला 1 जुलैपासून फॉर्म देणे सुरू झाले. यासाठी 5 टक्के म्हणजे अडीच हजार कोटी रुपये अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च करण्यात आला. त्यासाठी अ‍ॅप तयार करायला, यांनी लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला टेंडर दिले. त्याला जवळपास अडीच हजार कोटी रुपये देण्याचे पहिले काम यांनी केले. लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यापूर्वी पैसे वाटण्याचा कार्यक्रम पूर्ण केला.    जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार)

प्रचंड वाढलेली महागाई, बेरोजगारीचे आव्हान, महाराष्ट्रातील महिला सुरक्षित नाहीत. आपली मुलंबाळं सुरक्षित राहत नसतील तर मग या सरकारला अर्थ काय? असा प्रश्न विचारणारा मतदार आज महाराष्ट्रात आहे आणि भ्रष्टाचार या सर्व गोष्टींच्या बाबतीत प्रचंड रोष जनतेमध्ये आहे. त्याचा परिणाम म्हणून सरकार घाबरून योजना जाहीर करायला लागले आहे.  जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार)

पक्ष फुटला तरी सामान्य माणसं पवारसाहेबांच्या मागे उभी राहिली. हा एका मोठा गुणात्मक भाग आहे. - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार)

सत्तेमुळे प्रभावित होऊन लोक अजित पवारांसोबत गेले होते. पण बऱ्याच लोकांना शरद पवारसाहेबांशिवाय राहणे शक्य नाही हे माहिती होते. त्यामुळे अनेक नेते पुन्हा येण्याची इच्छा व्यक्त करू लागले. निवडक लोकांना आम्ही परतीचा मार्ग खुला केला. - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार)

आमचे वातावरण फार चांगलं आहे. मविआला, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला प्रचंड प्रतिसाद आहे. जिथे अर्ज करायला माणसं मिळणार नाहीत, असे 6 महिन्यांपूर्वी लोक म्हणायची. तिथे आज वाद मिटवून उमेदवारी देणे हे आमच्यासमोरील आव्हान आहे. - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार)

लोकसभा निवडणुकीत आम्ही उत्तरं देत होतो. आता आमच्या योजनांवर ते प्रश्न निर्माण करू पाहत आहेत. ते कोर्टात जात आहे.- आशिष शेलार, मुंबई भाजपा अध्यक्ष

मुस्लीम मतदारांना आता ठरवायची वेळ आली आहे की भावनिक मुद्यांवरच मतदान करायचं की येणाऱ्या आपल्या पिढीसाठी विकासाच्या यात्रेत सहभागी व्हायचे. मुस्लीम मतदारांना आवाहन करेन की भावनात्मक मुद्यांचे महत्त्व असतं, मी त्याला टाळणार नाही. मात्र याचा कुठेतरी सुवर्णमध्य गाठणे आवश्यक आहे. मी एकाच बाजूला राहील हे कुठल्याही जाती, भाषा, धर्म किंवा त्या समाजाला तर पूरक नाही, शिवाय लोकशाहीलाही घातक आहे - आशिष शेलार, मुंबई भाजपा अध्यक्ष

विरोधकांनी याचा उपयोग लोकसभा निवडणूक काळात आमच्या विरोधात मतदान करणार आहेत, असं वाटणाऱ्या मतदारांना आणखी असुरक्षित केलं. यात आमच्याकडील काही खालच्या स्थरावरील नेत्यांकडून काही गोष्टी झाल्या. त्याचा उपयोग करुन असुरक्षिततेची भावाना या मतदारांमध्ये वाढवली गेली. कुठल्याही टोकापर्यंत खोटं विरोधकांकडून पसरवलं गेलं. यातून आम्हाला फटका बसला. याला आम्ही 'व्होट जिहाद' म्हणत आहोत. या व्होट जिहादला थांबवायचं असेल असेल तर मुस्लीम मतदारांनीच पुढे आलं पाहिजे आम्ही तुमचं स्वागत करायला तयार आहोत - आशिष शेलार, मुंबई भाजपा अध्यक्ष

रोज सकाळी 9 वाजता उठून काहीतरी विचित्रच बोलायचे आणि मग त्या अजेंड्यावर दिवस काढायचा आणि मुख्य अजेंड्यावर लोकांना येऊच द्यायचे नाही. हे राजकारण म्हणूनही बरोबर नाही. राज्य म्हणूनही बरोबर नाही. केवळ मोदी आणि भाजप नको, या त्यांच्या काविळीपोटी त्यातून एक नरेटीव्हपूरक विरोधकांना निर्माण करतील, या सगळ्याला थेट उत्तर दिले पाहिजे. थेट उत्तर ग्राऊंड, मीडिया,मतदारांशी संवाद करून हा भाग आम्ही सुधारला. योजनांचा भाग समोर आणला, त्या योजना पोहोचवण्याचा कार्यक्रम केला.

 - आशिष शेलार, मुंबई भाजपा अध्यक्ष

फेक नरेटीव्हकडे आम्ही दुर्लक्ष केले, आमची चूक आहे. त्यामुळे बसलेला फटका मोठा होता. महाराष्ट्रापुरता आमच्यापेक्षा विरोधकांना यश चांगलं आले असेल तर त्या तीन पक्षांच्या मेहनतीवर आलेले नाही. केवळ फेक नरेटीव्हवर आलेले नाही. या सामाजिक आयुष्यामध्ये जगणाऱ्या काही संस्था संघटना आणि अर्बन नक्षल यांनी मिळून केलेला एकत्र प्रयत्न याचा सुद्धा त्यांना फायदा झाला.  त्यांना आम्ही कमी लेखले.- आशिष शेलार, मुंबई भाजपा अध्यक्ष

मुंबईकर सुसह्य राहणीमानाची मागणी करत आहे आणि याची सुरुवात झालीय. मेट्रो, कोस्टल रोड यासह मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय स्वरुपाच्या जगण्यातल्या हव्या आहेत. पार्किंग ग्रेस हवे आहेत, उच्च दाबाचे पाणी हवंय,वॉटर लीकेज सापडत नाहीय, मुंबईतील पर्यटनस्थळांचा विकास हवा तसा झालाय, असे माझं मत नाहीय. मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये समुद्रमार्गाचा उपयोग अजून झालेला नाहीय. इस्टल कोस्ट अद्याप उपयोगात आणलेला नाहीय. हा एक अजेंडा आहे, हाच आमचा जाहीरनामा आहे, हे आमचे स्वप्न आहे. त्यावर आम्ही काम करतोय. - आशिष शेलार, मुंबई भाजपा अध्यक्ष

सुसह्य राहणीमानाचा अजेंडा घेऊन चालणारी मंडळी आली पाहिजे. त्या अर्थाने मुंबईकरांना पुढील पाच वर्षात खूप मोठी प्रगती विकास आणि सुसह्य राहणीमान देण्याची आमची भूमिका आहे. - आशिष शेलार, मुंबई भाजपा अध्यक्ष

प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणूक नवीन आव्हान घेऊन येत असते. त्याला वेगळ्या दिशेने वेगळ्या पद्धतीने पाहावे लागते, असे माझे मत आहे. एक कॉमन आहे की मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. महाराष्ट्राला माझी जबाबदारी आणि माझी आठवण महाराष्ट्र भाजपाला बैठकांपुरते असते, तेवढे मी असतो.- आशिष शेलार, मुंबई भाजपा अध्यक्ष

कुठलीच निवडणूक ही मी सहजतेने घेत नाही. याचे कारण प्रत्येक निवडणुकीत कोणता मुद्दा कधी कसा वळण घेईल. तुम्ही काय बोलात, पुढे काय गेले आणि काय समजलात या सर्व गोष्टी कधी-कधी तुमच्यामुळे घडतात तर कधी-कधी कोणाच्यामुळे तुमच्यावर घडतात. दक्ष राहणे अतिशय आवश्यक आहे. आम्हा संघवाल्यांना दक्ष राहण्याची सवयच आहे. - आशिष शेलार, मुंबई भाजपा अध्यक्ष

ओबीसी म्हणून जन्मले आहे पण मी ओबीसी लीडर म्हणून त्याकडे पाहत नाही. मी लीडर म्हणून पाहते कारण जेव्हा मी काम केले तर मराठा समाजाचे आमदारांना तिकीट देणे, त्यांना आमदार करणे, त्यांच्यासाठी झगडणे हे जेव्हा मी केले तेव्हा मी पक्ष पाहिला. हा माणूस आपल्याला इथे निवडून द्यायचा पाहिला तर कधी जात हा विषय डोक्यात आला नाही. त्यामुळे त्याकडे ओबीसी म्हणून पाहत नाही, त्याच्याकडे लीडर म्हणून पाहते.  लीडर म्हणून पाहत असताना ही परिस्थिती मला दुर्दैवी वाटते. कोणत्याही समुदायामध्ये अशा प्रकारचे वितुष्ट होऊ नये, यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांनी निर्भीडपणे समोर आले पाहिजे. - पंकजा मुंडे, आमदार, भाजपा

महिला मुख्यमंत्र्याची चर्चा होते तेव्हा सुदैवाने माझे नाव येते, हे मला आनंद वाटला पाहिजे. पण दुर्दैवाने 4-5 महिलांचेच नाव येते. 50 महिलांचे नाव आलं तर मला आनंद वाटेल, म्हणजे तितक्या महिला राजकारणात सक्रिय आहेत, असे वाटेल. तर कमी महिला राजकारणात सक्रिय असल्याने आमचे नाव येत असेल. पण माझं आणखी एक म्हणणे आहे यामध्ये महिलांमध्येच का बरं नाव यावं. सर्व महिलांचं असे कर्तृत्व असले पाहिजे की त्यांचे लिंगापलिकडे जाऊन नाव आले पाहिजे - पंकजा मुंडे, आमदार, भाजपा

प्रीतमचाच एकटीचा विचार नसून अनेक लोक जे माझ्यासोबत राहिलेले आहेत, त्यांनाही न्याय देणे माझे कर्तव्य आहे. केवळ आपले कौटुंबिक राजकारण हे मुंडेसाहेबांचे संस्कार नाही  - पंकजा मुंडे, आमदार, भाजपा

प्रीतम मुंडे यांचे भविष्य काय आहे, याचा विचार करण्यासाठी आता मी तेवढा वेळ देऊ शकणार नाही. पण त्यांचे भविष्य नक्कीच आहे, याची काळजी करणारी मी तेथे बसले आहे. कारणी मी त्यांची मोठी बहीण आहे. मुंडेसाहेबांनंतर कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. पण माझ्या कुटुंबाची जबाबादारी ही एवढी एकमेव जबाबदारी मला मुंडेसाहेबांनी मला दिलेली नाही. - पंकजा मुंडे, आमदार, भाजपा

 

मुंडेसाहेबांच्या मृत्यूच्या घटनेमुळे प्रीतम ताई पोटनिवडणुकीमध्ये राजकारणात आल्या. कारण निकालानंतर केवळ 17 दिवसांत मुंडेसाहेब वारले आणि मग त्या आल्या. त्यांनी खूप उत्तम-सुंदर काम केले. पण पक्षाने माझा लोकसभा निवडणूक जाहीर केला म्हणजे मोदीजींच्या सहमतीने निर्णय जाहीर होतात, ते कसे डावलावे? मला काही केंद्रात जाण्याचा मानस नव्हता.  - पंकजा मुंडे, आमदार, भाजपा

महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करणे आणि प्रत्येक राज्य कसे प्रगत होईल, यासाठी आमचे योगदान देत आले आहोत आणि द्यायचे आहे. - पंकजा मुंडे, आमदार, भाजपा

अजित पवार माझ्या प्रचारासाठी आले. राष्ट्रवादी आणि आम्ही एकाच मंचावर दिसू, असे कधीही वाटलं नव्हतं. त्यामुळे आऊट ऑफ द बॉक्स आता राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे, तर ते फक्त परळीत नाही सर्व राज्यात सुरू आहे. - पंकजा मुंडे, आमदार, भाजपा

वडील असतानाही मी त्यांचा हात धरून लढले आहे. तेव्हा मुंडेंसाहेबांसोबत नेते तेवढे नव्हते, धनंजयसकट जिल्ह्यातील बऱ्याच नेत्यांनी तेव्हाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा माझे बाबा एकटे होते, तेव्ही मी एकटीने त्यांच्यासोबत काम करत होते, तेव्हा कार्यकर्त्यांची मोट बांधली. तर लढणे हे त्यांच्याबरोबच शिकले आणि त्यांच्यानंतर ते कसे सोडून देता येईल.- पंकजा मुंडे, आमदार, भाजपा

लढणे हे स्वतःसाठी नसते, विषयांसाठी असते, याचे मूर्तिमंत उदाहरणही होऊ शकले ना मी. माझा मतदारसंघ मी हसतखेळत सोडला, इच्छा नसतानाही पक्षाचा आदेश म्हणून लोकसभा लढले. याचे मूर्तिमंत उदाहरण होण्याची संधीही मुंडेसाहेबांच्या संस्कारामुळे मिळाली - पंकजा मुंडे, आमदार, भाजपा

लाडकी बहीण आणि लाडके भाऊ दोन्ही राजकारणात असतात. त्यामुळे राजकारण हे व्यक्तीच्या वैयक्तिक द्वेष आणि यापलिकडे असले पाहिजे, अशा संस्कारात मुंडेसाहेबांनी आम्हाला राजकारण शिकवले आहे. त्यामुळे मी राजकारण करत असताना कधीही कोणा व्यक्तीला तिरस्कृत केले नाही किंवा कुठल्या व्यक्तिगत टीकाटिप्पणी केली नाही. आम्ही नेहमी विचारांनी प्रभावित असे राजकारण केले आहे. - पंकजा मुंडे, आमदार, भाजपा

योगायोगाने आमचे पक्ष एक असल्याने धनंजय आणि मी एकत्र काम करू शकत आहोत. पक्षाचे वजन आहे म्हणून आम्ही काम करतोय, असे नाही तर आम्ही ते मनमोकळेपणाने काम करतोय. - पंकजा मुंडे, आमदार, भाजपा

माझ्या मेळाव्याची यंदा दशकपूर्ती होती. या मेळाव्याला धनंजय मुंडेही उपस्थित राहिले, याचा मला आनंद वाटला - पंकजा मुंडे, आमदार, भाजपा

विधानसभा निवडणुकीतील वातावरण हे लोकसभेसारखे राहिलेले नाही. पण आमच्यासमोर आव्हाने आहेत, राजकीय आव्हाने असतात किंवा मतदाराला गृहीत धरणे याच्यासारखी राजकारणातील कुठलीही चूक असणार नाही. महायुतीतील प्रत्येक घटकपक्ष आणि महायुती मतदारांना गृहीत धरणार नाही- सुनील तटकरे,प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मागील वेळेच्या उणीवा, चुका दुरुस्त करत यावेळेला अधिक ताकदीने सक्षमतेने युती म्हणून सामोरे जाऊ शकतो, याचे नियोजन आम्ही करत आहोत. मला वाटते आम्हाला त्यामध्ये चांगले यश मिळेल - सुनील तटकरे,प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्हाला मिळेल, असा दावा केला जातो. दावा या शब्दाला आक्षेप आहे. दावा केला जात नाही वस्तूस्थिती आहे. - सुनील तटकरे,प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

लाडक्या बहिणीली तीन भाऊ असू शकतात.असे थोडीच आहे की एकच भाऊ असला पाहिजे, तीनही लाडके आहेत. - सुनील तटकरे,प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

प्रत्येक निवडणूक वेगळा राजकीय परिमाण घेऊन येते. यावेळेची लोकसभेची निवडणूक देखील एक वेगळा राजकीय परिमाण घेऊन आली. आतापर्यंतच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा वेगळी निवडणूक यावेळेला देशात आणि राज्यातही झाली. - सुनील तटकरे,प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

यावेळेची विधानसभेची निवडणूक सुद्धा वेगळे परिमाण घेऊन येईल. पण एक आत्मविश्वासाने सांगतो की लोकसभेच्या वेळेचे वातावरण आणि 3 महिन्याच्या कालावधीच्या नंतर विधानसभा निवडणुकीच्या वातावरणाला सामोरे जात असलेले वातावरण यामध्ये कमालीचा फरक आहे. जनतेचा, महिलांचा, युवकांचा, शेतकऱ्यांची त्या कालावधीतील आमच्यावरील नाराजी असेल ती दूर करण्यामध्ये आम्हाला यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.- सुनील तटकरे,प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत. आजवरच्या निवडणुकीपेक्षा वेगळ्या प्रकारची निवडणूक आहे. - सुनील तटकरे,प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

आमच्यासमोरचा अजेंडा साफ आहे, महाराष्ट्राला अधिक समृद्ध करणे. विकसित महाराष्ट्र देशाच्या पातळीवर आहेच. पण, प्रचंड प्रमाणात पायाभूत सुविधा उभारणे. तरुणांसाठी अधिक प्रकारच्या रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे. - सुनील तटकरे,प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

आमच्याकडे 38 आमदारांची रांग होती. आम्हाला जिथे अडचण होती त्यांनाच घेतले. फार जणांना घेतले नाही. - जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी (शरद पवार गट)

अजित पवार पुन्हा येणार असतील तर त्याला मी विरोध करणार. पवारसाहेब माझं कितपत ऐकतील हे माहिती नाही. पण विरोध करेन. मी 30 वर्षापासून त्यांचे वागणं पाहतोय आणि मी या निष्कर्षावर आहे की त्यांचं कधीही शरद पवारांवर प्रेम नव्हते. घरातल्यांना समजत नाही, नातं किती घट्ट आहे हे बाहेरच्यांना बरोबर कळतं. - जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी (शरद पवार गट)

 

माझा कोणीही राग केला तर मला काही फरक पडत नाही. मी कोणाच्याही उपकाराखाली दबलेला नाही. माझ्यावर उपकार आहेत तर ते एकाच माणसाचे त्यांचं नाव आहे शरदचंद्र गोविंदराव पवारसाहेब  - जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी (शरद पवार गट)

पुरोगामीत्व म्हणजे निरश्वरवादी आहे का? आमची पण कुलदैवत-कुलदेवी आहेत, आम्ही त्यांना नैवेद्य देतो. आम्ही फक्त देवाकडे जाताना ढोलताशा वाजवून घेऊन जात नाही - जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी (शरद पवार गट)

ओबीसी विरुद्ध मराठा पेटवण्याचं कारण एकच होतं की आपल्याला त्यातून राजकीय फायदा किती मिळतोय. पण यातून तुम्ही महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ बिघडवत आहात, याची काळजी कोणालाच नव्हती.  - जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी (शरद पवार गट)

कोणताही धर्म असो समाज असो किंवा समाजव्यवस्था, त्यामध्ये एकदा दरी पडली की ती मिटवायला वर्षानुवर्षे निघून जातात. - जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी (शरद पवार गट)

आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे, असे तुम्ही पंतप्रधानांना भेटून हक्काने का सांगितले नाही. इतक्या वर्षात आरक्षणासाठी तुम्ही त्यांना भेटलातच नाहीत. तुम्ही मूर्ख बनवत होतात. - जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी (शरद पवार गट)

निवडणुकीमध्ये सर्वच फॅक्टर महत्त्वाचे असतात. सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत जातीपातीचे आणि धर्माचे राजकारण इतके घट्ट होत चालले आहे की याचे भीती वाटते. ज्या जातीपातीला आपण मूठमाती द्यायला चाललो होते, त्या जातीपाती आपण जागे करायला लागले आहोत. - जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी (शरद पवार गट)

विक्रोळी-भांडुप मतदारसंघामध्ये मुस्लिम आहेत का तिथे? हरल्यानंतर रडीचा डाव नाही खेळायचा. व्होट जिहाद झाले वगैरे. मग कशाला मदरशाला एक्सटेंशन देताय, पगार वाढवताय, कशाला करताय आता? जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी (शरद पवार गट)

लोकसभा निवडणुकीत आम्ही 31 जागा जिंकलो, तुम्ही 17वर आले आहात. तुम्हाला हरवलंय सदसद्विवेकबुद्धी आणि शांततेला महत्त्व देणाऱ्या हिंदूंनी, ज्यांना तुमच्या किळसवाण्या राजकारणाचा कंटाळा आलाय - जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी (शरद पवार गट)

बेकारी, महागाई, दररोजचे दंगे-धोके याने बदनाम होत जाणारा जो इथला एक वर्ग आहे, तो तुमच्यापासून लांब झाला. - जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी (शरद पवार गट)

अयोध्येमध्ये तुम्ही हरलात, ते पण कोणाकडून तर एका मागासवर्गीय अवधेश प्रसादकडून. मुस्लिमांची तेथे टक्केवारी किती आहे?  - जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी (शरद पवार गट)

कोणत्या मतदारसंघाबाबत तुम्हाला बोलायचंय, तेथे मुस्लिमांनीच आम्हाला जिंकवलंय - जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी (शरद पवार गट)

मविआमध्ये कोणताही संघर्ष नाहीय. जर संघर्ष असता तर आम्ही दिल्लीला गेलो असतो. दिल्लीत बैठका झाल्या असत्या. आमचे व्यवस्थित सुरू आहे - जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी (शरद पवार गट)

घराणेशाहीचा आरोप हा सर्वच पक्षामध्ये केला जातो. घराणेशाहीतून आलेली व्यक्ती ही कदाचित राजकारणाचा मार्ग स्वीकारत असताना ज्या अडचणी येतात, जे व्यासपीठ मिळायला पाहिजे, जो सहजासहजी रस्ता मिळाला पाहिजे, तो कुटुंबामुळे मिळून जातो. पण शेवटी स्वतःचे कर्तृत्व त्यांना स्वतः सिद्ध करावे लागते.तेव्हा जनता स्वीकारते.  रुपाली चाकणकर,नेत्या, राष्ट्रवादी (अजित पवार)

प्रश्न -  बारामतीतून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देणे टाळता आले असते का?

एक चांगल्या पद्धतीचे व्हिजन महाराष्ट्राला देणारी व्यक्ती बारामतीमधून येतेय, त्यामुळे कोणीही उमेदवार दिला तरी त्याचा फारसा फरक पडणार नाही. लोकशाही पद्धतीने ही निवडणूक लढुया आणि चांगल्या पद्धतीने लोकांमधला कौल जनतेसमोर पुन्हा दिसेल - रुपाली चाकणकर,नेत्या, राष्ट्रवादी (अजित पवार गट)

लोकसभेच्या निवडणुका वेगळ्या मुद्यावर लढवल्या गेल्या होत्या. मनसे त्यावेळी आमच्यासोबत होती. मात्र विधानसभेला 288 जागा आहेत. अशात कार्यकर्त्यांना संधी मिळावी अशी प्रत्येक पक्षाची इच्छा असते. आपला कार्यकर्ता त्या भागात वाढला पाहिजे. कार्यकर्ता वाढला तर पक्ष वाढतो. कार्यकर्ता हाच पक्षाचा कणा असतो. कार्यकर्ता जपण्याचा प्रयत्न मनसेने केला आहे. मनसेची आम्हाला काही ठिकाणी साथ नक्की मिळेल. - रुपाली चाकणकर,नेत्या, राष्ट्रवादी (अजित पवार गट)

 

संजय गांधी योजनेसारख्या अनेक योजना याआधी राबवल्या गेल्या. त्या योजना देखील मोफत होत्या. त्यावेळी विरोधकांनी म्हणजेच आता सत्तेत असलेल्यांनी विरोधाचं राजकारण केलं नाही. आता विरोधात कोणत्याही घटनेचा संबंध लाडकी बहीण योजनेशी जोडतात. कारण त्यांना या योजनेची धास्ती वाटत आहे. संयज गांधी योजना आजही सुरु आहे मात्र आम्ही त्याचा संबंध आम्ही कुठेही जोडला नाही. - रुपाली चाकणकर,नेत्या, राष्ट्रवादी (अजित पवार गट)

मी राजसाहेबांना विचारलं की वरळीतून निवडणूक लढवण्याची माझी इच्छा आहे. तुम्ही परवानगी दिली तर मी तिथे काम सुरू करेन. त्याप्रमाणे त्यांनी परवानगी दिली आणि काम सुरू केले. - संदीप देशपांडे, नेते, मनसे 

काही लोकांना असे वाटतं की आम्ही इथे आहोत तर कोणीच आले नाही पाहिजे. हा पण एक समज-गैरसमज जे काही आहेत. ते दूर करणे गरजेचे होते, ते यावेळेला वरळीकर दूर करतील की कोणताही मतदारसंघ हा कोणाचीही जहागीर नसते, हे एकदा सर्वांना कळलं पाहिजे. - संदीप देशपांडे, नेते, मनसे 

2019मध्ये आम्ही वरळीतून निवडणूक लढवली नव्हती. पण गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने वरळीचा विकास व्हायला पाहिजे होता, वरळीचे प्रश्न मार्गी लागायला पाहिजे होते, वरळीकरांना एक दिलासा मिळायला हवा होता, तसे ते होताना दिसले नाही. - संदीप देशपांडे, नेते, मनसे 

NDTV मराठीच्या महाराष्ट्राचा जाहीरनामा या कार्यक्रमाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन  

कोस्टल रोड संदर्भात मी पाच बैठका केल्या सर्व अडचणी दूर केल्या. मी तो रोड मंजूर करुन आणला, हायकोर्टात लढलो. सुप्रीम कोर्टात लढलो, सुप्रीम कोर्टात जिंकलो. तेव्हा तो कोस्टल रोड सुरू झाला. आजही सांगतो कोस्टल रोड MMRDA, सिडको, MSRTC नं बांधावा असं आमचं मत होतं, उद्धवजी म्हणाले आमच्या महापालिकेला बांधायला द्या. त्यानंतर आम्ही तो महापालिकेला बांधायला दिला. त्यांचं  योगदान असेल तर त्यांनी तो माझ्याकडून महापालिकेकडं घेतला, इतकंच योगदान आहे. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

त्यांनी एक आयकॉनिक प्रोजेक्ट सांगावा त्यांच्याकडं नाही, मी असे 100 प्रोजेक्ट सांगू शकतो, ते माझं व्हिजन आहे. -देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

ते तर ताजमहाल त्यांनी बांधला असंही सांगू शकतात. त्यांचा काही नेम नाही, अलिकडच्या काळात ते ताजमहाल बांधणाऱ्यांचेच वंशज असतील, अशा प्रकाराच व्यवहार करतायत - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मी नेहमी लाँग टर्मचं व्हिजन ठेवणारा आहे. मी गेल्या अडीच वर्षात 44 हजार मेगावॅट वीज निर्मितीचं करार केले आहेत. त्यातील 22 हजार मेगावॅटचे काम सुरू केले आहेत. त्यामधील जवळपास 16 हजार मेगावॅट पुढच्या 18 महिन्यात पूर्ण होईल. 2 हजार मेगावॅट पूर्ण झालं आहे. त्याचा परिणाम म्हणून 2030 साली महाराष्ट्रातील 52 टक्के वीज अपारंपारिक उर्जा स्रोतामधून येईल. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देशामधील सर्वात मोठं बंदर JNPT चं पोर्ट आहे. आता वाढवण बंदर JNPTच्या तीनपट आहे. जगातील सर्वात मोठं जहाज तिथं येऊ शकतं. जगातील दहा बंदरामध्ये एकही भारतीय बंदर नव्हतं. पहिल्या दिवसांपासून वाढवणचं बंदर जगातील टॉप 10 बंदरामध्ये असेल. दहा लाख रोजगाराची निर्मिती या एका बंदरामुळे होईल. भारत सागरी क्षेत्रातील एक सत्ता या बंदरामुळे होणार आहे. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

हरियाणा निवडणुकीत सर्व राजकीय विश्लेषक सांगत होते की भाजपाचा पराभव होणार. पण भाजपानं अशी मुसंडी मारली की सर्व पोल पंडित काय बोलावं यावर चकीत झाले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फेक नरेटीव्हच्या आधारे यश मिळालं. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये 0.3 टक्केच अंतर होतं. ते 48.9 होते आम्ही 48.6 होते. आम्ही निवडणुकीनंतर सांगितलं होतं त्यांच्या फेक नरेटीव्हला थेट नरेटीव्हनं उत्तर देणार - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री 

ज्या नरेटीव्हनं त्यांना एज दिली तो नरेटीव्ह संपला आहे. या संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीत व्होट जिहाद हा महत्त्वाचा घटक होता. व्होट जिहाद हा इथं पाहिला मिळाला. सर्व धार्मिक स्थळं एकत्र येऊन सर्व धर्मगुरु एकत्र येऊन व्होट जिहादचा नारा देत होते. त्याचं ध्रुविकरण इथं पाहायला मिळालं, पण त्याचा फायदा आता होणार नाही. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मी आकडा लावणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळे आकडा सांगत नाही.  मी इतकंच म्हणेल या निवडणुकीत महायुतीला अनुकूल वातावरण आहे. भाजपा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष आहे. आम्ही आमच्या मित्रपक्षांसह सरकार बनवू, इतकं बहुमत आम्हाला असेल. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री 

व्होट जिहाद हे काय आहे ते एकदा फडणवीसांनी स्पष्ट करावं. 2019मध्ये मुस्लिमांची मतं मोदींना पडली तेव्हा व्होट जिहाद नव्हते का? तुम्हाला जेव्हा मुस्लिमांची मतं पडतात तेव्हा तो व्होट जिहाद नसतो आणि तिच मतं काँग्रेस किंवा आम्हाला पडतात तेव्हा तो व्होट जिहाद असतो. हा दुटप्पीपण त्यांना सोडला पाहिजे - संजय राऊत, खासदार

हिंदुत्व सॉफ्ट किंवा हार्ड नसते, हिंदुत्व हे हिंदुत्व असते. मग आता आमचे जे महाशय जे हिंदुत्वाच्या नावाखाली सोडून गेले आणि दिल्लीत जाऊन गृहमंत्री-प्रधानमंत्र्यांसमोर उठाबशा काढताहेत, ते काय हार्ड हिंदुत्व आहे का? - संजय राऊत, खासदार

महाराष्ट्राचा स्वाभिमान या लोकांनी दिल्लीच्या पायाशी गहाण ठेवला आहे. मराठी माणसाची पूर्ण बेअब्रू या लोकांनी केली आहे. मराठी माणूस जो ताठ कण्याने जगत होता दिल्ली आणि महाराष्ट्रात त्याचा कणा या लोकांनी  मोडून काढला. कसले हे हिंदुत्व? - संजय राऊत, खासदार

जम्मू-काश्मीरसारख्या अत्यंत संवेदनशील राज्यामध्ये मोदींनी खूप राजकारण केले. पण तिथल्या जनतेने त्यांना स्वीकारले नाही. या देशातील अनेक प्रमुख राज्य आहेत, महाराष्ट्र-पश्चिम बंगाल-केरळ-कर्नाटक- झारखंड असेल जेथे नरेंद्र मोदींना शिरकावच करता आला नाही. मग त्यांना कसे पॅन इंडियाचे नेते म्हणणार तुम्ही- संजय राऊत, खासदार

नरेंद्र मोदी हे जागतिक नेते जरुर आहेत, पण देशाचे नेते आहेत का? ही शंका आहे आमच्या मनामध्ये - संजय राऊत, खासदार

देशस्तरावर आमच्यासारखे नेते सातत्याने मोदींना प्रश्न विचारत होते म्हणून आम्हा सर्वांना तुरुंगात टाकलं ना. आम्ही संघर्ष केला, त्यांच्या चुकांवर बोट दाखवलं. म्हणून माझ्यासारखे अनेक लोक मोदी-शाहांनी तुरुंगात टाकली  - संजय राऊत, खासदार

 

ज्या पद्धतीने महाराष्ट्र लुटला जातोय, ओरबाडला जातोय अशा व्यक्तीला मी भेटेने. हे कोणी कल्पना देखील करू शकणार नाही - संजय राऊत, खासदार

आम्ही भाजपासोबत अजिबात जाणार नाही, शक्यच नाही. आमच्या लोकांची ती मानसिकताही नाही आणि भावनाही नाही - संजय राऊत, खासदार

आताही जे सोडून गेले त्यातील 13 आमदार आमच्यासोबत येण्यासाठी तयार आहेत किंवा होते. पण जे सोडून गेले, ज्यांनी पक्ष संकटात आणला आणि त्यानंतर आम्ही जो पक्ष उभा केला, तर त्यांना घेणे म्हणजे निष्ठेचा अपमान ठरेल. आम्ही त्यांना नकार दिला - संजय राऊत, खासदार

लोकसभेमध्ये नारायण राणे यांचा फार मोठा विजय झालाय असे मला वाटत नाही. त्यांचा विजय हा 50,000च्याच आत आहे. प्रचंड प्रमाणात घराघरामध्ये पैशांचे वाटप झाले आणि आम्ही हे निवडणूक आयोगाला वारंवार कळवलं. तरीही जिंकताना त्यांची दमछाक झाली. हाच निकाल कायम राहतो, असे नाही. विधानसभेत तुम्हाला चित्र बदललेले दिसेल - संजय राऊत, खासदार

विधानसभा निवडणुकीत आमची शिवसेना 20 जागा जिंकू, याची आम्हाला खात्री आहे - संजय राऊत, खासदार

प्रश्न - मविआची सत्ता आली तर मुख्यमंत्रिपदाचे तुमच्या डोळ्यांसमोर तीन चेहरे सांगा.

उत्तर -  उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे - संजय राऊत, खासदार 

निवडणुकीनंतर या राज्याची सूत्र एकनाथ शिंदेंकडे नसतील, हे मी खात्रीने सांगतो - संजय राऊत 

न्यायाधीश पदावर बसलेल्या व्यक्तीने देशाच्या संविधानाच्या घटनेतल्या कलमांचं रक्षण करण्याचं कर्तव्य बजावलं पाहिजे. मात्र अशा प्रकारचं कर्तव्य पार पाडलं गेलं नाही. ज्या संस्था घटनेचं रक्षण करण्यासाठी निष्पक्षपणे काम करण्यासाठी निर्माण झाल्या, त्या पक्षपाती भूमिका घेताना दिसल्या. निवडणूक आयोगाने सुद्धा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या दबावाखाली पक्षपाती भूमिका घेतली. - संजय राऊत 

पक्षाचा बाप हजर आहे तिकडे आणि निवडणूक आयोग सांगते हा पक्ष तुमचा नाही म्हणून. हा कोणता कायदा? कोणती घटना? - संजय राऊत 

आमच्याकडे आज स्वतःचा पक्ष नाही. आमच्या डोळ्यासमोर चोऱ्या करुन आमचा पक्ष-चिन्ह घेऊन गेले. राज्यात पुन्हा उभे राहणे सोपी गोष्टी नाही.  - संजय राऊत 

मविआच्या माध्यमातून शिवसेनेने लोकसभेत नरेंद्र मोदींचा आणि सर्वांचा महाराष्ट्रात पराभव केलाय, ही कितीतरी मोठी गोष्ट आहे. जे लोकसभेला घडले त्याचीच पुनरावृत्ती आम्ही विधानसभेत घडवू एवढा आत्मविश्वास आमच्यामध्ये आहे  - संजय राऊत 

शिवसेना आव्हाने काही नवीन नाहीत. शिवसेनेच्या जन्मापासूनच आम्ही आगीशी खेळत राहिलेलो आहोत. - संजय राऊत 

लाडकी बहीण योजना खरंच आर्थिक शिस्तीत बसत असेल आणि त्याची गरज या राज्यातील महिलांना असेल तर ती अधिक स्पष्ट करुन समोर आणावी लागेल - संजय राऊत 

दीड हजार रुपयांमध्ये कुटुंब खरंच चालू शकते का? त्यापेक्षा त्या महिलांना सक्षम करून, त्यांचे कुटुंब, त्यांच्या मुलांचं शिक्षण, त्यांच्या घरातल्या व्यवस्था पूर्ण होतील इतके तरी त्यांना उत्पन्न मिळावे;अशा प्रकारच्या योजना आपण केल्या पाहिजेत.  - संजय राऊत 

खरोखर यांना बहिणींची काळजी असेल तर बहिणींना सक्षम करणे, त्यांना रोजगार देणे. त्यांच्यासाठी लहान उद्योग निर्माण करणे, बचतगटाच्या माध्यमातून त्यांना मदत करणे अशा योजना राबवायला पाहिजेत. तुम्ही सरसकट खात्यामध्ये पैसे टाकताय. आता ही सवय लागली की पुढे येणाऱ्या सरकारला सुद्धा ती थांबवता येत नाही. - संजय राऊत 

नरेंद्र मोदी हे झारखंडमधील लाडकी बहीण योजनेवर टीका करतात. ही योजना बोगस-कुचकामी आहे, असे सांगतात. पण याच योजनेचे महाराष्ट्रात कौतुक करतात, हे ढोंग आहे. हा दुतोंडीपणा आहे - संजय राऊत 

गोष्टी मोफत देणे हे आर्थिक बेशिस्तपणाचे लक्षण आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक राज्यांमध्ये जाऊन सांगितले. पण सर्वात जास्त रेवड्या वाटण्याचे काम मोदींच्या कार्यकाळात झाले-  संजय राऊत 

अडीच वर्ष हे सरकार काय करत होते? निवडणुकीपूर्वी घोषणांचा पाऊस पाडला जातो. कॅबिनेटमध्ये एकाच दिवशी 250-250 निर्णय घेतले जातात. कॅबिनेटमध्ये इतका वेळ कुठे मिळाला चर्चा करायला? प्रत्येक जातीनुसार महामंडळं तयार केली. प्रत्येक जातीला एक आर्थिक महामंडळ. पैसे कुठून आणणार? हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेले निर्णय असतात. - संजय राऊत 

आम्ही भाजपाबरोबर जाणार नाही - संजय राऊत

राहुल गांधी 4 नोव्हेंबरला महाराष्ट्रात येतील आणि आम्ही आमचा महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करू. आम्ही एकत्रच आहोत आणि जाहीरनामा एकत्रच असायला पाहिजे - संजय राऊत 

मुंबई, पुण्यासारख्या शहरामध्ये लोकप्रतिनिधींच्या हत्या होतात आणि या हत्या पोलिसांच्या संरक्षणामध्ये होत आहेत. तुरुंगात बसलेले मोठेमोठे गुन्हेगार तिथून मुलाखती देऊन महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देत आहेत, हे चित्र आम्ही या महाराष्ट्रात पाहिले नव्हते - संजय राऊत

राज्यामध्ये उद्योग वाढायला पाहिजे. देशामध्ये महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे औद्योगिक राज्य म्हणून ओळखले जाते. आज ती परिस्थिती नाहीय, हे राज्य पहिल्या 10 मध्ये सुद्धा नाहीय. - संजय राऊत 

महाराष्ट्रातील बहुसंख्य उद्योग हे गेल्या अडीच-तीन वर्षात राज्याबाहेर गेले आहेत. राज्यामध्ये तरुणांना जो रोजगार हक्काने मिळत होता, तो रोजगार सुद्धा या राज्यातून निघून गेला. या गोष्टी थांबवणे हे आमच्यासमोरील मोठे आव्हान आहे  - संजय राऊत 

हे राज्य कर्जाच्या ओझ्याखाली पूर्णपणे खचलंय आणि बुडालंय त्याला बाहेर काढणे, या राज्याला आर्थिक शिस्त लावणे, राज्यात भ्रष्टाचाराचा महापूर आलेला आहे, त्याला बांध घालणे त्याशिवाय हे राज्य पुन्हा स्थिर होणार नाही - संजय राऊत 

जाहीरनामा हा विषय देशभरामध्ये -जगभरामध्ये मतदार गांभीर्याने घेत नाहीत -संजय राऊत

अगदी फार चकचकीत गुळगुळीत कागदावर आपण जाहीरनामे छापतो. लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, लोकांना भरपूर आश्वासने देतो त्यातील किती आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण होतात? हे आपल्याला माहिती आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक विषय बदलत जातात. पण नक्कीच त्यातील काही विषय असतात काही शेतकऱ्यांचे काही कष्टकऱ्यांचे शिक्षणासंदर्भात आरोग्यासंदर्भात हे अचानक उत्पन्न होतात आणि ते आपल्याला सोडवावे लागतात  -संजय राऊत

माझे संबंध सर्वांशी चांगले आहेत, जरांगेंशी सुद्धा चांगले आहेत. पण त्यांची जी मूळ मागणी होती, त्या मागणीपासून ते आता दुसरीकडे वळले आहेत. त्यांची आताची जी नवीन मागणी आहे, ती मला वाटते राजकारणाचा मुख्य मुद्दा होतोय , असे एकंदरीत दिसत आहे आणि ती म्हणजे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या ही जी मागणी आहे आणि दुसरीकडे ओबीसी संघटना आणि नेते यांची असणारी मागणी की आम्ही असताना मराठा समाजाला आमच्या यादीमध्ये येऊ देणार नाही. शासनाला वेगळे द्यायचे असेल तर त्यांनी द्यावे. या दोन्ही मागण्या परस्परविरोधी आहेत - प्रकाश आंबेडकर

कदाचित या आघाड्या माझ्या आकलनाप्रमाणे नॉन क्लिअर असतील असे मी धरून चालतोय. जर जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे की अर्ज भरायला त्यांनी सांगितलेले आहेत आणि 30 तारखेला कोणी अर्ज ठेवायचे याची जर कदाचित यादी त्यांनी बाहेर काढली तर मग माझे म्हणणे आहे की राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलतो, अशी असणारी परिस्थिती आहे  - प्रकाश आंबेडकर 

गेल्या 8-10 दिवसांत मी पाहतोय की इथे फक्त दोनच आघाड्या आहेत, असेच चित्र सर्व चॅनेल्सवर दाखवलं जातंय. या दोन आघाड्या आहेत, असे तुम्ही पाहताय. पण एक फॅक्ट आपल्याला सांगतो, आमच्या पक्षासह काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना यांना एकत्र केले आणि त्यांच्याकडे जेवढे उमेदवार मागण्यासाठी अ‍ॅप्लिकेशन  आले असे आपण म्हणू ते अ‍ॅप्लिकेशन आणि जरांगेंकडे आलेले अ‍ॅप्लिकेशन आपण असताना पाहिले. तर सर्व राजकीय पक्षांचे उमेदवारी मागणारे अर्जदार हे कमी आहेत आणि जरांगेंकडे दुप्पट आहेत, अशी परिस्थिती आहे - प्रकाश आंबेडकर

सर्वसामान्य जनता आधी बदलते आणि राजकीय पक्ष नंतर बदलतात अशी परिस्थिती आहे - प्रकाश आंबेडकर

किंगमेकरच्या कॉन्सेप्टमध्ये मी विश्वास ठेवत नाही. कारण राजकारणामध्ये लोक  किंगमेकर असतात आणि गेल्या 40 वर्षातील राजकारणातला इतिहास पाहता तर राजकीय पक्षांना लोकच शिकवतात अशी परिस्थिती आहे. राजकीय पक्ष लोकांना शिकवतात, असे मला कधीच दिसलेले नाही. यासाठी मी उदाहरण नेहमी मुंबईचे देत असतो. मुंबईतील माणसाला सरकारची गरज आहे का? तर अजिबात नाही. सरकारला मुंबईतल्या माणसांची गरज आहे. - प्रकाश आंबेडकर

जागावाटपाचा घोळ मविआ महायुती दोन्ही बाजूला आहे. मात्र कुठला उमेदवार कुठे निवडून येईल हे पाहिलं जातं. तुमच्या पक्षाची ताकद आहे मात्र चांगला उमेदवार दुसऱ्या पक्षाकडे असेल तरीही तिथे अदलाबदली केली जाते. महायुतीत वाटाघाटी अजूनही सुरू आहे. सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्यासोबत अजूनही चर्चा सुरु आहे, उद्यापर्यंत चित्र स्पष्ट होईल. - छगन भुजबळ

सर्वजण स्वतंत्र विचार करू शकतात. समीर भुजबळ जेथे उभे राहिले तिथली परिस्थिती फार विचित्र आहे. तिथे दहशतीचे वातावरण आहे. - छगन भुजबळ

सुहास कांदेवर गंभीर आरोप. कुणाी बोलू शकत नाही. सुहास कांदे सर्वांनाच त्रास देतात. भाजप, काँग्रेस सर्वांना त्रास देणे ही त्यांची सवय आहेत. - छगन भुजबळ

स्थानिक लोकांना जाऊन विचारलं तर लोक सांगतील. मात्र ते बोलतील की नाही माहिती नाही. लोक आता दहशतीच्या बाहेर येऊन निवडणुकीत मतदान करतील. - छगन भुजबळ

सर्व पुतण्यांचा डीएनए सारखाच असतो. - छगन भुजबळ

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंधने रद्द केली. काही निर्बंध काढून टाकले. आज कांद्याचे भाव 5 हजार रुपयापर्यंत वाढले आहे. कांदा शेतकरी आज आनंदात आहेत. सर्वसामान्य शेतकरी आज दोन पैसे कमावत आहेत. शेतकरऱ्यांना विम्याचे पेसे सुद्धा मिळाले आहेत. काहींना एक एक लाख रुपये मिळाले आहेत. वीज बिल माफ केली आहेत. आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत.  - छगन भुजबळ

आरक्षणाच्या मागण्यांवरुन लोकप्रिय योजनांचा धडाका लावला गेला असा आरोप केला जातो. निवडणुका आल्या की विरोधक आरोप सुरू करतात. त्यात काही गैर नाही. मत मिळवण्यासाठी हे सर्वच करतात. लाडकी बहीण योजना मविआ सरकार आलं तर बंद होईल. महायुती सरकार आलं तर ही योजना सुरू राहील ही हमी आम्ही देतो. आम्ही योजना बंद केली तर लोक सरकार चालू देतील का. - छगन भुजबळ

महायुती आणि मविआमध्ये दोन्ही बाजूने मराठा समाजाचे नेते आहेत. त्यामुळे ही निवडणूक विकासाच्या मुद्यांवरच लढवली जाणार आहे. लाडकी बहीण योजना सर्वांसाठी आहे. त्यात कुठेही जात-पात नाही. प्रत्येक समाजाचा आणि घटकाचा विकास याच मुद्यावर निवडणुका लढवल्या जातात. - छगन भुजबळ

मनोज जरांगेंचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात नाही. राखीव जागा सोडल्या तर इतरत्र मराठा समाजाचेच उमेदवार जास्त आहेत. त्यामुळे जरांगे फॅक्टर हा मुद्दाच नाही. बाळासाहेब म्हणायचे जाहीरनामा कुणी वाचतच नाहीत. त्यामुळे त्यांनी वचननामा सुरु केला होता. - छगन भुजबळ

येवल्यामध्ये निवडणूक कठीण आहे, असे बोलले जात आहे. मात्र मी गेली 20 वर्ष तिथे विकासकामे करत आहेत. कुठेही जातीपातीचं राजकारण केलं नाही. मुंबई-नाशिकचा महामार्ग मी करून घेतला. येवल्यामध्ये जाण्याचा रस्ता केला. सगळ्या सोई-सुविधा तिथे केल्या. - छगन भुजबळ

ओबीसी आरक्षणाविरोधात कोण तरी जातंय किंवा त्याला धक्का लावला जातोय तेव्हा मला बोलावं लागतं. ओबीसीला धक्का नको हे मी एकटा कुठे म्हणतोय. - छगन भुजबळ

शिंदे, फडणवीस, पवार, ठाकरे सगळे तेच म्हणतायत. माझे कुणाशी वैयक्तिक भांडण नाही. माझे कुठे काही चुकलंय. मराठा आरक्षणांचं जे आंदोलन सुरू आहे, तो विषय मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये स्थितीत आहे. त्याचा फारसा परिणाम उर्वरित महाराष्ट्रात होणार नाही. - छगन भुजबळ

किंगमेकरच्या कॉन्सेप्टमध्ये मी विश्वास ठेवत नाही- प्रकाश आंबेडकर

पूर्वीची विधानसभेतील भाषणे, त्यावेळेचे नेते आणि आताची परिस्थिती यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे - छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री

सर्व पुतण्यांचे DNA सारखे हे भुजबळांचं विधान चांगलंच गाजलं. मी ते विधान टीका करण्यासाठी केलं नव्हतं. ते स्वतंत्र पद्धतीनं विचार करू शकतात. स्वतंत्र पद्धतीनं चालतात, इतकाच त्याचा अर्थ होतो - छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री

कांदे यांनी अपक्ष म्हणून येवल्यात फॉर्म घेतला आहे. मी त्यांचं स्वागत करतो त्यांचं मनापासून स्वागत करतो. लोकशाही आहे. मी त्यांना काहीही वाईट बोलणार नाही.  त्यांनी कुणालाही पाठवावावं. त्याची काही चिंता करण्याची गरज नाही - छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री

कोण काय बोलते, सभेमध्ये काय बोलावे, काय बोलू नये याचं काही ताळतंत्र राहिलेय असे मला वाटत नाही. - छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री

पूर्वीच्या निवडणुका आणि आताच्या निवडणुका यामध्ये फार फरक आहे - छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री