
संकेत कुलकर्णी, पंढरपूर
मागील काही दिवसात शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाला लागलेला गळती थांबयचं नाव घेत नाही. माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावरुन निशाणा साधला आहे. एक दिवस आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरे यांना सोडून जातील, असा दावा शहाजी पाटील यांनी केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करत आहे. तर आणखी काही नेते वाटेवर आहेत. ठाकरे गटाला लागलेल्या गळतीवर माजी आमदार शहाजी पाटील यांनी ठाकरे पिता-पुत्रांमध्येच फूट पडेल, असं भाकीत केलं आहे.
(नक्की वाचा- Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी कशामुळे झाली? चौकशी अहवालात कारण आलं समोर)
विरोधी पक्षातील अनेक नेते आणि आमदाराच्या चौकशी झाल्या म्हणून त्यांनी पक्ष सोडला नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वास्तव परिस्थिती अशी झाली आहे. तिथे थांबण्यात काही अर्थ नाही अशी भावना त्यांच्या नेत्यामध्ये झाली आहे. त्यामुळे एक दिवस असा उगवेल की उद्धवसाहेबांना सोडायची भाषा आदित्य ठाकरेच करतील. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना एकटेच राहण्याची परिस्थिती येऊ शकते असं देखील शहाजी पाटील यांनी म्हटलं आहे.
(नक्की वाचा- Crime News : 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' भाषणासाठी विद्यार्थिनीला पुरस्कार, काही दिवसात शिक्षकानेच केला अत्याचार)
आदित्य ठाकरे यांचे विरोधी पक्षनेता म्हणून नाव पुढे येत आहे? या प्रश्नावर बोलताना शहाजी पाटील यांनी म्हटलं की काहीही होणार नाही. कारण ठाकरे गटाकडे संख्याबळ नाही. जरी त्यांना हे पद दिले तरी महाराष्ट्रात अतिशय निकृष्ट काम करणारा विरोधी पक्षनेता म्हणून आदित्य ठाकरेंचे नाव गाजेल अशी खिल्ली त्यांनी उडवली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world