जाहिरात

Pune News : PMPML ची विशेष सेवा; केवळ 500 रुपयात देवीच्या शक्तिस्थळांचं दर्शन

आता पुणे महानगर परिवहन महामंडळाने लिमिटेड  (पीएमपीएमएल) ने प्रवाशांसाठी विशेष पर्यटन बससेवा सुरू केली आहे.

Pune News : PMPML ची विशेष सेवा; केवळ 500 रुपयात देवीच्या शक्तिस्थळांचं दर्शन

प्रतिनिधी, सूरज कसबे 

Pune News : नवरात्र उत्सवात  पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील देवीच्या मंदिरांना भेट देणे आता अधिक सोयीचे आणि किफायतशीर झाले आहे. आता पुणे महानगर परिवहन महामंडळाने लिमिटेड  (पीएमपीएमएल) ने प्रवाशांसाठी विशेष पर्यटन बससेवा सुरू केली आहे. ही सेवा पूर्णपणे वातानुकूलित आणि स्मार्ट इलेक्ट्रिक बसेसद्वारे चालवली जाणार आहे. ही बससेवा शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये उपलब्ध असतील. तसेच, मागणीनुसारही या बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. या सेवेसाठी प्रति प्रवासी तिकीट दर फक्त 500 रुपये ठेवण्यात आलं आहे.
   
या विशेष बससेवेचे दोन मार्ग  करण्यात आले आहेत. पर्यटन बस क्र. 13 (अ): हा मार्ग पुणे स्टेशनपासून सुरू होऊन तळजाई माता, पद्मावती, तुकाई माता, कोंढणपूर येथील म्हस्कोबा, जोगेश्वरी माता आणि शिवरी येथील यमाई माता या मंदिरांना भेट देऊन पुन्हा पुणे स्टेशनला परत येणार आहे. तर पर्यटन बस क्र. 13 (ब) या मार्गावर पुणे स्टेशनपासून सुरू होऊन सारसबागेतील महालक्ष्मी, तांबडी जोगेश्वरी, चतुःश्रुंगी माता, पिंपरीतील वैष्णवी माता आणि भवानी माता या मंदिरांना भेटी देऊन पुन्हा पुणे स्टेशनला परत येणार आहे.

Latest and Breaking News on NDTV

या पर्यटन बस सकाळी 8.30 वाजता पुणे स्टेशनहून सुटतील आणि सायंकाळी 7.00 वाजता परत येणार आहेत.  यासाठी  प्रवासी डेक्कन, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर, पुणे मनपा भवन, भोसरी आणि निगडी येथील बुकिंग केंद्रांवरून तिकीट बुक करू शकतात. या विशेष सेवेमुळे भाविकांना नवरात्रौत्सवातील देवीच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. ही सेवा प्रवाशांसाठी एक सोयीस्कर आणि किफायतशीर पर्याय म्हणून उपलब्ध झाली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com