अविनाश पवार, पुणे:
Pune Nilesh Ghaywal Gang News: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीला पोलिसांनी आता सर्वात मोठा दणका दिला आहे. निलेश घायवळ टोळीतील 9 गुन्हेगारांवर 6455 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. १७ सप्टेंबर रोजी घायवळ टोळीतील गुंडांनी गोळीबार केला होता. याचप्रकरणात गुन्हे शाखेने घायवळ टोळीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
निलेश घायवळ टोळीला दणका
याबाबत सविस्तर माहिती अशी की, निलेश घायवळच्या टोळीने १७ सप्टेंबर रोजी पुण्यातील कोथरुड भागात गोळीबार केला होता. या प्रकरणात आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. कोथरुड गोळीबार प्रकरणी घायवळ टोळीतील ९ गुन्हेगारावर गुन्हे शाखेने ६ हजार ४५५ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या दोषारोपपत्रामध्ये हा संपूर्ण गोळीबाराचा कट गणेश विसर्जनाच्या दिवशी रचल्याचे म्हटले आहे.
शास्त्रीनगर भागात काही दिवसात जोरात धमाका करा, वेपन, पैसे मी पुरवितो आणि केस लागली तर बाहेर काढतो, असे सांगून निलेश घायवळने गणेशोत्सव विसर्जन रोजी कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मयुर ऊर्फ राकेश गुलाब कुंबरे, मयंक मॉन्टी विजय व्यास, गणेश सतिश राऊत, दिनेश राम फाटक, आनंद अनिल चांदलेकर, मुसाब ईलाही शेख, जयेश कृष्णा वाघ, अक्षय दिलीप गोगावळे, अजय महादेव सरोदे अशी दोषारोपपत्र दाखल झालेल्यांची नावे आहेत.
9 आरोपींविरोधात दोषारोपपत्र
हा गुन्हा घडल्यानंतर काही दिवसात गँगस्टर नीलेश घायवळ हा परदेशात पळून गेला असून त्याला पकडण्यासाठी इंटरपोलची मदत घेण्यात आली आहे. त्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस ही जारी करण्यात आली आहे. अटक केलेल्या ९ आरोपीविरुद्ध १२ जानेवारी रोजी दोषारोपपत्र दाखल केले आहे. कोथरुड गोळीबार प्रकरणानंतर पुणे पोलिसांच्या रडारवर असलेल्या घायवळ गँगला हा सर्वात मोठा धक्का पोलिसांनी दिला आहे.
( नक्की वाचा : Nashik News: आई-बाबा मला माफ करा! हातावर शेवटचा संदेश लिहून नाशिकमध्ये 21 वर्षांच्या तरुणीनं संपवलं आयुष्य )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world