
सुरज कसबे, प्रतिनिधी; पुणे:
Pimpri Chinchwad: गेल्या काही दिवसांपासून आत्महत्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांमध्ये आयुष्य संपवण्याचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच पुणे शहरात एकाच दिवसात सात जणांच्या आत्महत्यांची नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवसात सात जणांनी टोकाने निर्णय घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
उद्योग नगरी पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 27 जानेवारी रोजी एकाच दिवशी सात जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. आत्महत्या केल्यांमध्ये सहा पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. या सर्वांच्या आत्महत्येची कारणे वेगवेगळी असली तरी लोकांमध्ये टोकाचे निर्णय घेण्याचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आत्महत्येची पहिली घटना चाकण परिसरात घडली असून चाकण परिसरात गौरव ज्ञानेश्वर अगम (वय, 28) याने घरातील खिडकीच्या ग्रील ला ओढणी बांधून सकाळी साडे दहाच्या दरम्यान आत्महत्या केली. त्यानंतर पुनावळे भागात प्रसाद संजय अवचट या 31 वर्षीय तरुणाने दुपारी साडे चारच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. तिसरी घटना भोसरीमध्ये घडली असून लांडगे आळी परिसरात विकास रामदास मुरगुंड या 35 वर्षीय तरुणाने दुपारी बारा वाजता गळफास घेतला.
दुसरीकडे, मुळशी तालुक्यातील नेरे गावात सकाळी पावणे दहाच्या दरम्यान मनाप्पा सोमल्ल्या चव्हाण या 52 वर्षीय जेष्ठ नागरिकाने घराशेजारील लिंबाच्या झाडाला डोक्याचा फटका बांधून गळफास घेत आयुष्य संपवले. थेरगावध्ये नवनाथ भगवान पवार या 46 वर्षीय नागरिकाने त्याच्या राहत्या घरी रात्री पावणे एकच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
नक्की वाचा - Rickshaw taxi fare hike : रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचे नवे दर कधीपासून लागू होणार?
जुनी सांगवी परिसरात 36 वर्षाच्या सुवर्णा श्रीराम पवार या महिलेने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन रात्री पावणे बाराच्या सुमारास आत्महत्या केली. तर सातवी घटना ही चिखली परिसरात घडला असून इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी घेत 40 वर्षीय दिनेश सुरेश लोखंडे याने सायंकाळी पावणे आठच्या सुमारास आपलं जीवन संपवलं आहे.
दरम्यान, एकाच दिवशी शहरातली वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात या आत्महत्यांची नोंद झाली झाली आहे, वाढता ताणतणाव, मानसिक आजार, कर्जबाजारीपणा , कौंटुबिक वाद इत्यादी कारणांमुळे या आत्महत्या झाल्या असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र नागरिकांनी खचून न जाता टोकाची भूमिका घेण्या आधी पोलिसांशी संपर्क साधावा योग्य वेळी समुपदेशन झाल्यास नक्की बदल होईल असा विश्वास सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन हिरे यांनी व्यक्त केला आहे.
Mumbai Bike Taxi : अवघ्या 2 महिन्यांची प्रतीक्षा, मुंबईत बाईक टॅक्सी सुरू होणार, काय असतील दर?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world