
Sinhagad Road flyover Pune : पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यादरम्यान पुणेकरांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. आज 1 सप्टेंबरपासून पुण्यातील सर्वात लांब उड्डाणपूल वाहतुकीस खुला होणार आहे. यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीतून प्रवाशांना काही प्रमाणात सुटका मिळणार आहे.
सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेल्या दुहेरी उड्डाणपूल आजपासून प्रवाशांसाठी वाहतुकीस खुला होणार आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. सिंहगड रस्त्यांवरील वाहतूक कोंडी ही दिवसेंदिवस वाढत होती, मात्र या उड्डाणपुलामुळे फनटाइम थिएटर ते विठ्ठलवाडी हा प्रवास सुलभ होणार आहे. साधारण 2021 पासून या उड्डापुलाचे काम सुरू होते. चार वर्षांनंतर अखेर हा उड्डाणपूल प्रवाशांसाठी खुला होईल.
नक्की वाचा - Apple Store in Pune: मुंबईनंतर पुण्यातही सुरू होणार Apple Store, कधी आणि कुठे? वाचा सविस्तर
या उड्डाणपुलामुळे सिंहगड रस्ता, धायरी, नऱ्हे, खडकवासला, वडगाव बुद्रुक, नांदेड सिटी, बंगळुरू-मुंबई राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल.
काय आहे हा प्रकल्प?
पुण्यातील वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी सर्वात मोठ्या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. तीन टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. यापूर्वी सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फन टाइम चित्रपटगृहादरम्यान 520 मीटर लांबीचा उड्डाणपूल आणि विठ्ठलवाडी कमान ते फन टाइम चित्रपटगृह असा दोन हजार 120 मीटर लांबीचा उड्डाणपूल यापूर्वीच खुला करण्यात आला असून आता तिसऱ्या टप्प्यात गोयल गंगा चौक ते इनामदार चौक असा एक हजार 540 मीटर लांबीचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
उड्डाणपुलाची एकूण लांबी - सुमारे 2.5 किलोमीटर
एकूण खर्च - 118 कोटी रुपये
कालावधी - सप्टेंबर 2021 ते ऑगस्ट 2025
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world