जाहिरात

'गृहमंत्री झालो तर काय करणार?' रोहित पवारांनी थेट सांगितलं

महायुतीतील भ्रष्टाचारी नेत्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला अकोले येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

'गृहमंत्री झालो तर काय करणार?' रोहित पवारांनी थेट सांगितलं

सुनिल दवांगे, अकोले:  'मी गृहमंत्री झालो तर सत्तेतील साठ, सत्तर टक्के नेते कायमचे गुवाहाटीला जावून बसतील...' असे मोठे विधान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केले.  तसेच महायुतीतील भ्रष्टाचारी नेत्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला अकोले येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी रोहित पवार यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. 

काय म्हणाले रोहित पवार?

अकोले विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होत असून शरद पवारांनी अमित भांगरे मैदानात उतरवले आहे. अमित भांगरे यांच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेत बोलताना रोहित पवार यांनी महायुतीच्या नेत्यांविरोधात जोरदार फटकेबाजी केली. मी गृहमंत्री झालो तर सत्तेतील साठ, सत्तर टक्के नेते गुवाहाटीला जाऊन बसतील, असा टोला त्यांनी लगावला. तसेच आम्ही सेटलमेंट न करणारे लोक आहोत तेव्हा गृहमंत्री पद चुकून मिळाल तर भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षातील काही लोक महाराष्ट्रात न राहता कायमचे गुवाहाटीला जाऊन राहतील, असंही रोहित पवार यावेळी म्हणाले. 

नक्की वाचा: पंडित अण्णा आणि धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते, शरद पवारांनी परळीत सांगितला 'तो' किस्सा

दरम्यान, अकोले विधानसभा मतदार संघात बंडखोरांनी चांगलीच डोकेदुखी वाढवली आहे. अकोल्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार किरण लहामटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अमित भांगरे रिंगणात उतरले आहेत. दुसरीकडे माजी आमदार वैभव पिचड यांच्यासह मारुतीत मेंगाळ आणि मधुकर तळपाडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या बंडखोरीमुळे महायुतीसह महाविकास आघाडीची डोकेदुखी चांगलीच वाढली असून मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होण्याची शक्यता आहे. 

ट्रेंडिंग बातमी: 'जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांचा करेक्ट कार्यक्रम..', सुनील तटकरेंचा प्रतिहल्ला

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com