जाहिरात

Sanjay Raut: राज ठाकरे- उद्धव ठाकरेंमध्ये फोनाफोनी झाली? संजय राऊतांचे सर्वात मोठे विधान

शिवतीर्थ हे काही आमच्यासाठी कॅफे नाही ते आमच्यासाठी घरच आहे. मनोमिलन नक्की होईल," असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

Sanjay Raut: राज ठाकरे- उद्धव ठाकरेंमध्ये फोनाफोनी झाली? संजय राऊतांचे सर्वात मोठे विधान

मुंबई: एकीकडे मुंबई महापालिकांच्या निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु असतानाच राजकीय वर्तुळात ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाच्या चर्चांना उधाण आले आहे. यावरच बोलताना अमित ठाकरे यांनी चर्चा करुन काही होणार नाही, दोन्ही भावांनी एकमेकांना फोन करावा.. असे महत्त्वाचे विधान केले होते. अमित ठाकरे यांच्या या विधानानंतर आता खासदार संजय राऊत यांनी सर्वात मोठा दावा केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणालेत  संजय राऊत?

"शिवसेना- मनसे युतीबाबत नेते सकारात्मक म्हणूनच कार्यकर्त्यांचे मनोमिलन होत आहे, त्यांचे मनोमिलन वाढले आहे. आम्ही सकारात्मक आहोत, उद्धव ठाकरे- राज ठाकरे सकारात्मक आहेत. वर युतीबाबत नेते सकारात्मक असल्यामुळेच जमिनीवरील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर त्याचा परिणाम झाला असेल, तसेच दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नसते" असं संजय राऊत म्हणाले.

" अमित ठाकरे- आदित्य ठाकरे ही सर्व मुले आहेत त्यांच्या जन्मापासून हे दोन्ही भाऊ आहेत. कोणीही जाहीरपणे सोशल मीडियावर सांगून एकमेकांना फोन करत नाहीत. काय सांगावं फोन झालेही असतील. तुम्हाला फळ दिसेल. त्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शिवतीर्थ हे काही आमच्यासाठी कॅफे नाही ते आमच्यासाठी घरच आहे. मनोमिलन नक्की होईल," असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

Baramati Crime: जीमसमोर उभी क्रेटा कार, पोलिसांना संशय आला अन्.. बारामतीत सर्वात मोठी कारवाई

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरुन शस्त्रसंधी जाहीर केली. एकीकडे पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याच्या गप्पा सुरु असताना अचानक युद्धबंदी का केली? याचे उत्तर विरोधकांना द्यावे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले. 

Sindoor Tree: PM मोदींनी लावलेलं सिंदूर झाड नेमकं कसे असते? महाराष्ट्रातील 'या' गावात आहे भलामोठा वृक्ष

Listen to the latest songs, only on JioSaavn.com