
विनोद जिरे, बीड
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना कारागृहात मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन गटात झालेल्या राड्यानंतर ही मारहाण झाल्याचं कळतंय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वाल्मिक कराड याने खोट्या गुन्ह्यात अडकवल्याच्या रागातून या तुरुंगातील एका आरोपीने वाल्मिक कराड आणि त्याचा साथीदार सुदर्शन घुले याला मारहाण केल्याचे कळते आहे.
बीडच्या जिल्हा कारागृहात आज सकाळी कैद्यांच्या दोन गटात वाद झाला होता. परळीतील महादेव गीते व सोनवणे नामक आरोपींच्या गटात हा वाद झाला होता. या वादात दोन्ही बाजूंनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाली. मात्र कारागृहातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद निवळला.
(नक्की वाचा - Prashant Koratkar : प्रशांत कोरटकर कुणाच्या मदतीने तेलंगणात पोहोचला? 5 जणांना नोटीस)
आरोपींना इतर जेलमध्ये हलवण्याची गरज- सुरेश धस
वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना झालेल्या मारहाणीनंतर आमदार सुरेश धस यांना या आरोपींना तर इतर जेलमध्ये हलवण्याची मागणी केली आहे. बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गीते याने यापूर्वी पोस्ट केल्या होत्या. मला कशा पद्धतीने अडकवले गेले आहे. त्यामुले बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकते, अशी भीती सुरेश धस यांनी वर्तवली आहे.
(नक्की वाचा - Shirdi News : नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ ठरणार केंद्र बिंदू, नाईट लँडिग विमानसेवा सुरू)
जेलमध्ये आकाला जेवणसुद्ध पाहिजे तसे दिले जाते. एक विशेष फोन देखील त्याच्याकडे असून तो परळी येथे कनेक्ट होतो. पोलीस अधीक्षक यांनी यात लक्ष घालायला हवे होते. काही लोक आतमध्ये सुद्धा खून करू शकतात. त्यामुळे यातील काही आरोपी यापूर्वी अमरावती, नागपूर, नाशिक , संभाजीनगर येथे पाठवायला हवे होते, असं देखील सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world