जाहिरात

Santosh Deshmukh Case: सर्वात मोठी बातमी! फरार कृष्णा आंधळेचे लोकेशन सापडले? 3 महिन्यांनी सुगावा लागला

Santosh Deshmukh Murder Case Update: दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला आज सकाळी बघितल्याचा दावा काही स्थानिकांनी केला आहे. याबाबतची माहिती मिळताच नाशिक पोलीस परिसरात दाखल झाले आहेत.

Santosh Deshmukh Case: सर्वात मोठी बातमी! फरार कृष्णा आंधळेचे लोकेशन सापडले? 3 महिन्यांनी सुगावा लागला

प्रांजल कुलकर्णी: बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिन्यांहून अधिक काळ उलटून केला आहे. या हत्या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. तीन महिन्यांपासून बीड पोलिसांसह सीआयडीला गुंगारा देणारा कृष्णा आंधळे नेमका कुठे आहे? याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच आता कृष्णा आंधळेच्या लोकेशनबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा दावा सर्वात मोठा दावा करण्यात आला आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला आज सकाळी बघितल्याचा दावा काही स्थानिकांनी केला आहे. याबाबतची माहिती मिळताच नाशिक पोलीस परिसरात दाखल झाले आहेत.

नक्की वाचा - Road Accident : रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रशासन अलर्टवर; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

नागरिकांच्या म्हणण्याणुसार, एका मोटरसायकलवर कृष्ण आंधळे आणि आणखी एक साथीदार या ठिकाणी सकाळी साडेनऊ वाजता दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. दत्त मंदिराकडे जात असताना एका बाजूला दोघे उभे होते. त्यापैकी एकाने मास्क खाली घेताच तो कृष्णा आंधळे असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मी तात्काळ पोलिसांना फोन केल्याचे त्याने म्हटले आहे. या माहितीनंतर नाशिक पोलिसांनी तात्काळ धाव घेत शोध सुरु केला आहे.

Beed Crime : बीडमधील पाचवा संतापजनक Video; आता तर क्रौर्याची हद्दच गाठली!

संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार झाला आहे. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपी सापडले मात्र कृष्णा आंधळेने सर्वांनाच गुंगारा दिला आहे. तब्बल तीन महिने कृष्णा आंधळे न सापडल्याने त्याची हत्या झाली असावी, असाही दावा अनेकांनी केला होता. मात्र अशातच आता पहिल्यांदाच कृष्णाला पाहिले गेल्याचा दावा केल्याने तपासाला गती येण्याची शक्यता आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: