जाहिरात

Man Water Crisis: 'जलनायक' गोरेंच्या बालेकिल्ल्यात पाण्यासाठी वणवण! जनावरांसह निघणार अर्धनग्न मोर्चा

Man Taluka Water Crisis: माणमधील पाणीप्रश्न आणखी पेटणार असून 30 एप्रिल रोजी मोठ्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Man Water Crisis: 'जलनायक' गोरेंच्या बालेकिल्ल्यात पाण्यासाठी वणवण! जनावरांसह निघणार अर्धनग्न मोर्चा

राहुल तपासे, सातारा: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे ग्रामीण विकास तथा पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांचा बालेकिल्ला असलेल्या माण तालुक्यातील ग्रामस्थांचा पाण्यासाठी मोठा संघर्ष सुरू आहे. पाण्याच्या एका थेंबासाठी लोकांना वणवण करावी लागत आहे. आता माणमधील पाणीप्रश्न आणखी पेटणार असून 30 एप्रिल रोजी मोठ्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्यातील पाण्याचा भीषण प्रश्न आता संघर्षाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. 30 एप्रिल रोजी तहानलेल्या माणदेशी  माणसांचं आणि जनावरांसह अखेर रणशिंग फुंकलं जाणार आहे. पाण्यासाठी तडफडणाऱ्या जनतेनं आंदोलनाचा निर्धार केला असून प्रशासनाचे दबाव, जमावबंदीचे आदेश - काहीही झालं तरी हा लढा थांबणार नाही, असं संतप्त नागरिकांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच माण तालुक्यात पाणी सोडल्याचा दावा फोल असल्याचे सांगत महेश करचे या सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट कॅनॉलमध्ये उतरुन वास्तवही दाखवले. तिथे केवळ अर्धा इत पाणी वाहताना दिसतेय, आम्ही जर तहान भागवत असताना चोर ठरत असून तर आम्हाला अटक करा, निदान तुरुंगात तरी पाणी मिळेल असे म्हणत 30 एप्रिल रोजी, माण-खटावच्या रस्त्यांवर अर्धनग्न आंदोलन, जनावरांसह मोर्चा आणि प्रांत कार्यालयावर थेट धडक दिली जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

नक्की वाचा  - Pahalgam Video: पहलगाम हल्ल्याचा सर्वात भयानक Video समोर, गोळ्या लागत होत्या, लोक कोसळत होते)

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच माण तालुक्यात पाणीपुरवठा करत असलेले टँकरही गळत असल्याची तक्रार करण्यात आली होती.  सातारा जिल्हा परिषद अंतर्गत माण पंचायत समितीच्या हद्दीत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, पण या टँकरची अवस्था पाहिली तर संताप उफाळल्याशिवाय राहणार नाही. 

दुष्काळामुळे टँकरवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये गळक्या टँकरमुळे लाखो लिटर पाणी अक्षरशः रस्त्यावर वाया जात आहे. एका बाजूला थेंब थेंब पाण्यासाठी लोक वणवण करतायत, तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाची ही बेफिकिरी जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे.. असे म्हणत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच ही दुष्काळग्रस्त भागातील जनतेची क्रूर चेष्टा आहे आणि ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही नागरिकांनी दिला. 

Court News: अदृश्य शक्तीमुळे 2 लेकींना संपवलं, जन्मदात्या आईचा दावा; सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निकाल!

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: