जाहिरात
8 days ago

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचा मुंबईत शो झाला त्या ठिकाणी तोडफोड झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्याने खारच्या युनीकाॅन्टिनेंटल येथील आपल्या कार्यक्रमात शिवसेनेसंबंधित एक उपहासात्मक गाणं म्हटलं होतं. त्यानंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी त्या हॉटेलमधील सेटची तोडफोड केली. या प्रकरणात शिवसेना नेते राहुल कनाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याशिवाय 40 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

धारावी हादरली! 10 ते 13 सिलेंडरचे भीषण स्फोट

धारावी बस डेपोजवळ गैस सिलेंडरच्या ट्रकमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. सिलेंडर वाहून नेणाऱ्या गाडीमध्ये 12 ते 13 सिलेंडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटानंतर आग लागली असून अग्निशमन दल ,एमबुलेन्स आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचा प्रयत्न शुरु आहे. मात्र आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान काही वेळात या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. 

प्रशांत कोरटकरला तेलंगणात अटक

प्रशांत कोरटकरला तेलंगणात अटक झाल्याची माहिती समोर येत आहे.  सूत्रांनी ही माहिती दिली आहे. कोल्हापूर पोलिस लवकरच याची अधिकृत  माहिती देण्याची शक्यता आहे. कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर तो फरार होता. 

Live Update : चंद्रपूर शहरालगत असलेल्या MIDC परिसरातील लक्की पेट्रोलियम ऑईल कंपनीत भीषण आग

चंद्रपूर शहरालगत असलेल्या MIDC परिसरातील लक्की पेट्रोलियम ऑईल कंपनीत भीषण आग लागली, एक तासापासून ऑईल कंपनीत आग लागली आहे, कशामुळे आग लागली याचे अद्याप कारण अस्पष्ट, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल प्रयत्न करत आहे. आतापर्यंत अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. लक्की पेट्रोलियम ऑईल कंपनीसह कंपनी शेजारी असलेल्या कंपन्यांचं ही मोठं नुकसान झालं आहे. 

Live Update : धुळे जिल्हा रुग्णालयात उष्माघाताचा विभाग सुरू

धुळे जिल्हा रुग्णालयात उष्माघाताचा विभाग सुरू करण्यात आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्ता देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सुविधायुक्त असा उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्याबाबतची तयारी देखील रुग्णालयाने पूर्ण केली आहे. या कक्षात दहा बेड तयार करण्यात आले असून पुरेसे डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व सर्व प्रकारच्या यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहे. 

                           

सध्या उन्हाळा लागला असून मार्च महिन्यातच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली आहे. अशातच शहराच तापमान सातत्याने वाढत असल्याने उष्माघाताचा त्रासापासून नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे. सध्या उष्णघाताच्या त्रासाचा एकही रुग्ण नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे अतिदक्षता विभाग प्रमुख रवींद्र सोनवणे यांनी दिली आहे....

Live Update : कामराचा स्टुडिओ फोडला..! आता आपटे, सोलापूरकर, कोरटकर यांच्याकडे कधी तोडफोड करायची? सुषमा अंधारेंचा सवाल

Live Update : पुण्यात आता चक्क 45 वराहांची चोरी

पुण्यात चाललंय काय?  अज्ञात चोरट्यांकडून चक्क वराहांची चोरी

पुण्यात आता चक्क 45 वराहांची चोरी

पुण्यातील वाघोली परिसरामध्ये घडला प्रकार

जवळपास 1 लाख 28 हजार रुपयांची किंमत असणारे वराह चोरीला गेल्याने खळबळ

पुण्यातील वाघोली पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल

रात्री खाऊ पिऊ घालून कुंपणात सोडून दिलेले वराह चोरट्यांनी पळवले

Live Update : मध्य रेल्वेचा ब्लॉक, 26 मार्चपर्यत काही गाड्यांच्या फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेने ब्लॉक घेतला असून अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मार्गाचे विस्तारीकरण केले जात आहे. त्यासाठी हा ब्लॉक घेतला गेलाय. याचा काही रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. पुढील 26 मार्चपर्यत काही गाड्यांच्या फेऱ्या रद्द राहणार आहे. रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन रेल्वे विभागाने केले. हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असणार आहे. 

Live Update :नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खान याच्या घरावर चालवला बुलडोझर

नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खान याच्या घरावर बुलडोजर चालवला

Live Update : नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खान याचं घर रिकामं करण्यास सुरुवात

नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खान याचं घर रिकामं केलं जात आहे...

Live Update : कुणाल कामराचा कार्यक्रम झालेल्या हॅबिटॅटकडून माफीनामा

कुणाल कामराचा कार्यक्रम झालेल्या हॅबिटॅटकडून माफीनामा

कुणाल कामराच्या अलीकडील व्हिडिओच्या निर्मितीमध्ये हॅबिटॅटचा सहभाग नसनू त्याने व्यक्त केलेल्या मतांना आमचं समर्थन नसल्याचं हॅबिटॅटकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलं आहे. या व्हिडिओमुळे दुखावलेल्या सर्वांची आम्ही मनापासून माफी मागतो असंही त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

Live Update : गौतमी पाटलाच्या कार्यक्रमात महिलांचा मोठा उत्साह

हिंदवी महिला प्रतिष्ठान आणि ग्रँड रेसिडेन्सी यांच्या वतीने खास महिलांसाठी गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे पंढरपूर आयोजन केले होते. महिलांसाठी विशेष करून गौतमी पाटील यांचा कार्यक्रम महिला मंडळाचे आयोजित केल्याने  महिलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी मोठा बंदोबस्त जरी असला तरी गौतमी पाटलांच्या कार्यक्रमात महिलांचा जल्लोष आणि उत्साह वेगळाच पाहायला मिळाला.

Live Update : वीट भट्टी कामगार 25 वर्षीय महिलेचा आढळला मृतदेह

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या वेल्हाळे शिवारात 25 वर्षीय वीट भट्टी कामगार महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून सना अजीज शेख असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. महिलेची गळा दाबून हत्या झाल्याचा संशय हा व्यक्त केला जात असून महिलेच्या पतीनेच हत्या केल्याचा आरोप हा नातेवाईकांकडून केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Live Update : 26 तारखेपर्यंत भुसावळ देवळाली व नाशिक बडनेरा मेमु गाड्या रद्द

जळगाव पाचोरा दरम्यान असलेल्या म्हसावद रेल्वे स्थानकावर यार्ड पुनर्रचनेचे काम रेल्वे विभागाने हाती घेतले असून त्यामुळे 26 मार्चपर्यंत अपडाऊन मार्गावरील भुसावळ देवळाली व नाशिक बडनेरा मेमु रेल्वे गाडी रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.