
मंगेश जोशी, जळगाव: शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लिहिलेल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. पुस्तकामध्ये महाविकास आघाडीची स्थापना तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर व भाजपवर अनेक गंभीर आरोप संजय राऊत यांनी केले आहेत. या पुस्तकातील टीकेनंतर शिवसेना शिंदे गटाचे नेतेही आक्रमक झाले असून संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नरेंद्र मोदी व अमित शहा हे गुजरात मध्ये मंत्रीपदावर असताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मदत केली असून गुजरात दंगली प्रकरणात बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांनीच त्यांना बाहेर काढण्याचा दावा संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकात केला आहे. बाळासाहेब ठाकरे व शरद पवारांनी मदत केल्यावरही त्यांच्यावर उपकार करण्याऐवजी दोघांचीही पक्ष त्यांनी फोडण्याचा आरोप संजय राऊत यांनी या पुस्तकात केला आहे. तर एवढ्याच नाही शिंदेंच्या शिवसेनेचा लोफर म्हणून संजय राऊत यांनी या पुस्तकात उल्लेख केला आहे
मात्र याच पुस्तकातील आरोपावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत आम्हाला लोफर म्हणत असतील तर ते महालोफर असल्याचे म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. "संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी अमित शहा यांच्याबाबत केलेल्या आरोपावर बोलताना संजय राऊत हे त्यावेळी मध्यस्थी होते की त्यांनी त्यावेळी या सर्व गोष्टी पाहिल्या? असा प्रश्न गुलाबराव पाटलांनी उपस्थित केला असून नरेंद्र मोदी व अमित शहा यासारख्या मोठ्या लोकांवर बोलणं उचित नसल्याचेही" गुलाबराव पाटील म्हणाले.
नक्की वाचा: तुरुंगातल्या आरोपीने सुचवले संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाचे नाव
तसेच "बाळासाहेबांची शिवसेना संपली असं कोणी म्हणत असेल तर ते चुकीचे असून कारण आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेचे असल्याचे म्हणत गुलाबराव पाटलांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी पुस्तकाच्या माध्यमातून ते आरोप व भाष्य केला आहे मात्र त्यावेळी संजय राऊत हे फक्त पत्रकार होते त्यामुळे भाजप शिवसेनेत काय चाललं हे त्यांना काहीही माहिती नाही. मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेत फक्त संजय राऊत हे शिल्लक असून त्यामुळे "हाड्याचं बसणं आणि आणि डांगेच तुटणं" अशी अवस्था संजय राऊतांची असल्याची खोचक टीकाही गुलाबराव पाटलांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world