जाहिरात

महायुतीचं जागावाटप ठरेना; मात्र शिंदेंच्या आमदाराची परस्पर मोठी घोषणा

संतोष बांगर यांनी याबाबत म्हटलं की, मी विद्यमान आमदार असल्यामुळे मलाच उमेदवारी मिळेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो काही निर्णय देतात तो निर्णय 'सर आंखों पर'असतो.

महायुतीचं जागावाटप ठरेना; मात्र शिंदेंच्या आमदाराची परस्पर मोठी घोषणा

विधानसभेची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. नेत्यांनी बैठकांचा धडाका सुरु केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आज कळमनुरी येथे कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच आपला उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जाहीर केली आहे. आमदार संतोष बांगर हे येत्या 24 तारखेला शिवसेना पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संतोष बांगर यांनी याबाबत म्हटलं की, मी विद्यमान आमदार असल्यामुळे मलाच उमेदवारी मिळेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो काही निर्णय देतात तो निर्णय 'सर आंखों पर'असतो. असं म्हणत महायुतीकडून उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच आमदार संतोष बांगर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जाहीर केली आहे.

(नक्की वाचा-  Amravati Politics : दर्यापूर मतदारसंघात कोण जिंकणार आधीच आलं समोर; अंकशास्त्रतज्ञाचा मोठा दावा)

मतदारांना मतदानासाठी आणण्याची व्यवस्था करा

हिंगोलीच्या कळमनुरी येथे पार पडलेल्या शिंदेच्या शिवसेना मेळाव्यात आमदार संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांना बाहेरील मतदारांचा आढावा घेऊन त्यांना मतदानासाठी आणण्याची व्यवस्था देखील करण्याच्या सूचना केल्या आहेत. मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी त्यांना यूपीआयद्वारे पैसे पोहोचवण्याची व्यस्था केली जाईल असं वक्तव्य केल्याने, एकच खळबळ उडाली आहे. 

(नक्की वाचा-  "राज्यातील काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत", जागावाटपावरुन संजय राऊतांची तिखट टीका)

आमदार संतोष बांगर यांनी थेट मतदारांना पैशाचे आमिष दाखवून मतदानाला आणण्याची भाषा केली आहे. त्यामुळे त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे पुढे आले आहे. आता निवडणूक आयोग काही कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com