Solapur Politics : सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे भाजपची बी टीम; ठाकरे गटाचा नेता भडकला

अपक्षाला मत म्हणजे भाजपला मत आहे. आपला उमेदवार हा अमर पाटील असून त्यालाच निवडून आणायचे आहे, असं आवाहन देखी शरद कोळी यांना केली आहे.  

जाहिरात
Read Time: 2 mins

सौरभ वाघमारे, सोलापूर

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर दक्षिणमध्ये अपक्ष उमेदवार धर्मराज काडगी यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींची प्रणिती शिंदेंवर सडकून टीका केली. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे भाजपची बी टीम असं म्हणत ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

(नक्की वाचा-  सोलापुरात 'सांगली पॅटर्न', अखेरच्या क्षणी उद्धव ठाकरेंना धक्का; काँग्रेसची अपक्षाला साथ)

दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेसने ठाकरे गटाच्या अमर पाटील यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काळात यांना पाठिंबा दिला आहे. प्रणिती शिंदे या भाजपच्या बी टीम आहेत. भाजपचा प्रचार करतात आणि त्यांनी भाजपसोबत आतून हातमिळवणी केली आहे.  शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी आहे, यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही, असा इशारा देखील शरद कोळी यांनी दिला आहे. 

(नक्की वाचा: "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांच्या समर्थकला पोलिसांसमोर धमकी)

शिंदे कुटुंबाने ठाकरे गटाचा केसाने गळा कापला आहे. भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अपक्षाला मत म्हणजे भाजपला मत आहे. आपला उमेदवार हा अमर पाटील असून त्यालाच निवडून आणायचे आहे, असं आवाहन देखी शरद कोळी यांना केली आहे.  

लोकसभेत भाजपच्या आमदारांनी मदत केल्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचा विकास केला नाही. शिंदे कुटुंबाने आमचे आभार मानण्याऐवजी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. ही माणसं धोकेबाज निघाली, गद्दारांकडून काय अपेक्षा करणार, असा सवाल देखील शरद कोळी यांनी विचारला. 

Advertisement

Topics mentioned in this article