पवित्र श्रावण महिन्यातील आज तिसरा सोमवार असल्याने शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक भाविक पहाटेच दर्शनासाठी मंदिरात पोहोचले. भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी वेरूळचे श्री घृष्णेश्वर हे शेवटचे बारावे ज्योतिर्लिंग आहे. वेरूळच्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्यास बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्याचे पुण्य मिळते अशी भावना आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात राज्यसह देशभरातील भाविक दर्शनासाठी वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात येत असतात.
Live Update : निवडणूक आयोगाच्या आंदोलनादरम्यान राहुल गांधी, प्रियंका गांधींसह अनेकजण ताब्यात
सर्वात मोठी बातमी! निवडणूक आयोगाच्या आंदोलनादरम्यान राहुल गांधी, प्रियंका गांधींसह अनेकजण ताब्यात
Live Update : इंडिया आघाडीचा एल्गार, दिल्ली पोलिसांनी कॉग्रेसचा मोर्चा अडवला
इंडिया आघाडीचा एल्गार, दिल्ली पोलिसांनी कॉग्रेसचा मोर्चा अडवला
Live Update : राहुल गांधींनी निवडणूक आयोगाची पोलखोल केली आहे. - माजी खासदार विनायक राऊत
राहुल गांधी यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाची पोलखोल केली आहे. - माजी खासदार विनायक राऊत
एकनाथ शिंदे यांचे विसर्जन लवकरच - विनायक राऊत
Live Update : दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन, राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपानंतर इंडिया आघाडीचा मोर्चा
दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन...
मकर द्वाराजवळ खासदार एकवटले
राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपानंतर इंडिया आघाडीचा मोर्चा
Live Update : काळाचौकी परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
काळाचौकी परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून मुलीला ब्लॅकमेल करून आरोपीनी केला अत्याचार
याबाबत कोणाला सांगितल्यास मुलीला बदनामी करण्याची आरोपींनी दिली धमकी
काळाचौकी पोलिसांनी ५ जणावर गुन्हादाखल करून त्यांना ताब्यात घेतलं आहे
विशेष म्हणजे ही पाचही मुलं अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली
उघडकीस आलेल्या या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे
मागील काही महिन्यांपासून मुलीसोबत सुरू असलेल्या अत्याचाराला कंटाळून अखेर तिने कुटुंबियाना याबाबतची माहिती दिली
मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीना ताब्यात घेतलं आहे
Live Update : गणपतीपुळ्यात उद्या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव, श्रींचे मंदिर पहाटे ३.३० वाजता खुलं केलं जाणार
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे उद्या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाचं आयोजन संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्या वतीने करण्यात आलं आहे. अंगारकीच्या पार्श्वभूमीवर स्वयंभू श्रींचे मंदिर पहाटे ३.३० वाजता खुलं केलं जाणार आहे. अंगारकी यात्रोत्सवानिमित्त प्रारंभी मुख्य पुजारी अभिजित घनवटकर यांच्या हस्ते 'श्रीं'ची पूजा अर्चा, मंत्रपुष्प व आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. पहाटे ३:३० ते रात्री १०:३० पर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. या अंगारकी चतुर्थीचा योग पवित्र श्रावण महिन्यात जुळून आल्याने स्वयंभू 'श्रीं'च्या दर्शनासाठी घाटमाथ्यावरील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यांतून सुमारे ५० ते ६० हजार भाविक हजेरी लावतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.. दरम्यान सागर दर्शन पार्किंग, महालक्ष्मी हॉल, गणपतीपुळे खारभूमी मैदान येथे भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे..
Live Update : अमरावतीत गुन्हे शाखेच्या पथकाची काफिला नावाच्या हुक्का पार्लरवर धाड...
अमरावतीत गुन्हे शाखेच्या पथकाची काफिला नावाच्या हुक्का पार्लरवर धाड...
३० ग्रॅम गांजा, ३ ग्रॅम एमडी आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली.
पार्लरमध्ये एमडी ड्रग्ज, गांजा तथा विदेशी मद्याचा पुरवठा व सेवन केले जात होते...
दरम्यान मालक व हुक्का पिणाऱ्यांसह एकूण ११ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात..
Live Update : जळगाव येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन
जळगाव येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी आमदार सुरेश भोळे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचीही उपस्थिती होती. या महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी गट व बचत गटाच्या महिलांनी पारंपारिक पद्धतीने उगवलेल्या उतरण, काटवल, माल कमोनी, पांढरा कुडा, बांबू, राजगिरा, रानवांगे, यासह विविध रानभाज्या खरेदी करण्यासाठी नागरिकांनी ही गर्दी केली होती.
Live Update : पीओपी मूर्तीवरील बंदी उशिरा उठल्याने टंचाई, दरवाढीची शक्यता
गणेशोत्सव अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपला असताना पीओपी मूर्तीवरील बंदी उशिरा उठल्याने यंदा बाजारात मूर्तींची टंचाई आणि दरवाढ होण्याची शक्यता आहे. याचा फटका मूर्तिकार आणि भाविक, दोघांनाही बसण्याची शक्यता आहे.
पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्ती निर्मितीवरील बंदी मागे घेण्याचा निर्णय उशिरा झाल्यामुळे मूर्तिकारांना उत्पादनासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे यंदा बाजारात मूर्तींची कमतरता जाणवत असून दर २० ते २५ टक्क्यांनी वाढतील असा अंदाज वर्तवला जात आहे. आर्थिक संकटातून सावरत असलेले कारागीर या परिस्थितीत अधिकच अडचणीत आले आहेत. भाविकांनाही मूर्ती खरेदी करताना जादा खर्चाचा सामना करावा लागणार आहे. टंचाई आणि दरवाढ टाळण्यासाठी वेळेत मूर्ती बुक करणे आवश्यक असल्याचे मूर्तिकारांचे आवाहन आहे.
Live Update : तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त औंढा नागनाथ येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी
देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील नागेश दारूकावणे मंदिरामध्ये तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची मोठी गर्दी केली आहे, काल मध्यरात्रीपासूनच भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या आहेत, आज तिसरा श्रावणी सोमवार असल्याने औंढा नागनाथ मंदिरामध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाला आहे..
Live Update : काँग्रेस पक्षाचं आज दोन दिवसीय शिबीर
काँग्रेस पक्षाचं दोन दिवसीय शिबीर आजपासून आयोजित करण्यात आलं आहे
11 आणि 12 ऑगस्ट रोजी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकारिणीची बैठक
प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडणार
या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकी संदर्भात चर्चा आणि रणनीती आखली जाणार
त्याचसोबत राज्यातील विविध विषयांवर काँग्रेस पक्षाने काय भूमिका घेतली पाहिजे यावर देखील चर्चा केली जाणार
Live Update : दादर मधला कबुतर खाना पुन्हा एकदा ताडपत्रीने झाकला
दादर मधला कबुतर खाना पुन्हा एकदा ताडपत्रीने झाकण्यात आला आहे
मुंबई उच्च न्यायालयच्या निकाला नंतर मुंबई महापालिकेने ही कारवाई केली आहे
या आधी फक्त काही भाग झाकण्यात आला होता मात्र आता हा संपूर्ण कबुतरखाना झकला असून बाजूला बॅरिकेटिंग देखील लावण्यात आलं आहे
Live Update : रुग्णालयातच युवकाला हृदयविकाराचा झटका, वेळप्रसंगी डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे वाचले युवकाचे प्राण
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात असलेल्या मंगल श्याम हॉस्पिटल येथे एका युवकाला आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यात आले होते युवकाच्या पुढील उपचारासाठी नातेवाईकांशी चर्चा सुरू असताना अचानक युवकाला हृदयविकाराच्या झटका आला या झटक्यामुळे युवकाने मान टाकली व हृदयाचे ठोके देखील बंद पडले होते मात्र डॉक्टर योगेश्वर चौधरी यांच्या तत्परतेमुळे युवकाला जीवनदान मिळाले आहे, डॉक्टर चौधरी यांनी सीपीआर पद्धत वापरून बंद असलेले हृदय व शरीरातील रक्तपुरवठा तात्काळ पूर्ववत केला व पुढील उपचारासाठी युवकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून योग्य उपचार करून युवकाचे प्राण वाचवले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली असून सर्व स्तरावरून डॉ. चौधरी यांचे कौतुक केले जात आहे.
Live Update : उत्तराखंड ढगफुटी व जलप्रलयात अडकलेले पाळधी येथील 13 तरुण सुखरूप परतले
उत्तराखंड मध्ये झालेल्या ढगफुटी व जलप्रलयात अडकलेले जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथील 13 तरुण सुखरू परतले असून पाळधी गावात या तरुणांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परतल्याने तरुणांच्या पालकांना मात्र याप्रसंगी अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळालं. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही सुखरू परतलेल्या तरुणांचे स्वागत केले.
Live Update :मनमाडच्या डॉ.आंबेडकर वसतिगृहाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा द्यावा, आंबेडकरी अनुयायांची मागणी...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भूमिपूजन व उदघाटन केलेल्या नाशिकच्या मनमाडच्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व प्रेरणाभूमी असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी आंबेडकरी अनुयायी एकवटले असून, प्रसंगी जनलढा उभारण्याचा निर्धारात आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला.शासनाने या वसतिगृहाचे नूतनीकरण करून विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक सुविधा ,अत्याधुनिक लायब्ररी तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संग्रहालय तयार करून पुढील पिढीला प्रेरणा देण्यासाठी वास्तू जतन करून करण्याची एकमुखी आगामी या बैठकीत करण्यात आली.
Live Update : बुलढाण्यात पावसाचा जोरदार कमबॅक, दडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन
बुलढाणा जिल्ह्यात दडी मारून बसलेल्या पावसाने जोरदार कमबॅक केल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. गेल्या दहा ते बारा दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती त्यामुळे खरिपाच्या पिकांवर पावसाअभावी मोठे संकट ओढवले होते.. त्यामुळे शेतकरी मोठ्या संख्येत चिंता ग्रस्त झाले होते..बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, मेहकर,चिखली या भागात पावसाने मुसळधार स्वरूपात बरसायला सुरुवात केली आहे.. इतरही भागात पावसाची रिप रिप पाहायला मिळत आहे.. त्यामुळे संकटात सापडलेल्या पिकांसाठी हा पाऊस संजीवनी ठरतो आहे..आलेल्या पावसानं शेतकरी वर्ग सुखावला गेला आहे.