जाहिरात

वेंगुर्ले दुर्घटना: आणखी एका खलाशाचा मृतदेह लागला हाती, दुर्घटनाग्रस्त बोटही सापडली

Vengurla Port Boat Accident: वेंगुर्ले बंदरामध्ये बुडालेल्या बोटीतील आणखी एका खलाशाचा मृतदेह सापडला आहे.

वेंगुर्ले दुर्घटना: आणखी एका खलाशाचा मृतदेह लागला हाती, दुर्घटनाग्रस्त बोटही सापडली

सिंधुदुर्ग
वेंगुर्ले बंदरामध्ये बुडालेल्या खलाशांपैकी आणखी एकाचा मृतदेह शनिवारी पहाटे (25 मे 2024) सापडला आहे. मृतांचा एकूण आकडा तीनवर पोहोचला आहे. कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर आणि बोटींच्या मदतीने शोधकार्य सुरू असून बुडालेली नौका देखील मूठ समुद्रामध्ये सापडली आहे. बोटीवर असलेल्यांमध्ये मध्य प्रदेशातील पाच, कर्नाटकातील एक आणि राज्यातील रत्नागिरीतील एकाचा समावेश होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक शिवशंकर सावंत यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, वेंगुर्ले पोलीस आणि एसडीआरएफने स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू केले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नेमके काय घडले? 

वेंगुर्ले बंदरामध्ये गुरुवारी (23 मे 2024) रात्री बर्फ घेऊन जाणारी बोट बुडल्याची घटना समोर आली होती. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोट भरकटल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माहितीनुसार, सात खलाशी लहान होडीतून बर्फासह अन्य साहित्य वाहून नेत होते. या दरम्यान गुरुवारी रात्री 9 वाजेदरम्यान वादळी वारे आणि पावसामुळे बोट समुद्रामध्ये उलटली. बोट बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर तीन जणांनी अंधारामध्ये समुद्रात उडी घेऊन पोहून सुरक्षितरित्या समुद्रकिनारा गाठला, अशी माहिती पोलीस निरीक्षक शिवशंकर सावंत यांनी दिली. 

(नक्की वाचा: बोट दुर्घटनेमुळे आता कोकण हादरलं; 7 खलाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली)

20 हून अधिक जणांचा मृत्यू

गेल्या आठवडाभरात महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बोट उटलून जीवितहानी झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. आतापर्यंत 20 हून अधिक जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.  

(नक्की वाचा - महाराष्ट्र हादरला! 4 दुर्घटनांत 20 जणांचा बुडून मृत्यू)

VIDEO: Maharashtra Drought | महाराष्ट्र नव्हे, दुष्काळ राष्ट्र; धरणं, विहिरी कोरड्याठाक

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com