जाहिरात
Story ProgressBack

सोलापुरातील महिला IAS अधिकाऱ्याची आदर्श कृती, मुलीचा जिल्हा परिषद शाळेत घेतला प्रवेश

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी त्यांची मुलगी ईशा हिचा सोलापूर जिल्ह्यातील हत्तूरमधील अंगणवाडीमध्ये प्रवेश घेतला आहे. 

Read Time: 2 mins
सोलापुरातील महिला IAS अधिकाऱ्याची आदर्श कृती, मुलीचा जिल्हा परिषद शाळेत घेतला प्रवेश

सौरभ वाघमारे, सोलापूर

सोलापूरच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सर्वांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. मनीषा आव्हाळे यांनी त्यांची मुलगी ईशा हिचा सोलापूर जिल्ह्यातील हत्तूरमधील जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीमध्ये प्रवेश घेतला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शनिवार, 15 जून रोजी अंगणवाडीत पालक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अंगणवाडी सेविकांना सर्व मुलांचे औक्षण करुन स्वागत केले. या पालकसभेला स्वत: मनीषा आव्हाळे आपल्या मुलीसह उपस्थित होत्या. 

(नक्की वाचा - सांगली महापालिका आयुक्तांचं व्हिजिटिंग कार्ड होतंय व्हायरल, काय आहे खास?)

जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माझ्या व्यवस्थेवर मला विश्वास आहे. फक्त बोलण्यातून हे व्यक्त करण्यापेक्षा कृतीतून व्यक्त व्हायला पाहिजे. म्हणून मी माझ्या मुलीपासून ही सुरुवात केली आहे. लोकांच्या मनात मला विश्वास निर्माण करायचा आहे, की या शाळा आपल्या आहेत. यात अनेक सोईसुविधा शासनामार्फत दिल्या जातात,  असं मनीषा ओव्हाळे यांनी म्हटलं आहे. 

(नक्की वाचा- Fathers Day: गौरवास्पद! IPS बापाकडून सलामी घेणाऱ्या IAS लेकीची गोष्ट)

दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या जवळपास 2 लाख विद्यार्थ्यांनी शनिवारी शाळेत प्रवेश घेतला. मात्र त्यांना अद्यापही गणवेश मिळालेला नाही. तो गणवेश लवकरच मिळेल, असा विश्वास देखील मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी व्यक्त केला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
आनंदाची बातमी! विद्यार्थ्यांना एसटी पास आता थेट शाळेत मिळणार
सोलापुरातील महिला IAS अधिकाऱ्याची आदर्श कृती, मुलीचा जिल्हा परिषद शाळेत घेतला प्रवेश
Pankaja munde visit activist families of end his life after beed loss in lok sabha 2024
Next Article
आत्महत्या थांबवा अन्यथा राजकारण सोडेन; पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
;