दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आता निकालाचे वेध लागले आहेत. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांचं पुढील प्लानिंग सुरू होतं. कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा याचीही चाचपणी सुरू होते. विद्यार्थ्यांची धाकधूक वाढवणारा निकाल लवकरच समोर येणार आहे. सध्या दहावी-बारावी विद्यार्थी सुट्ट्या एन्जॉय करीत आहेत. त्या दरम्यान निकालेच अपडेट समोर आले आहे. बारावीच्या निकालांचे बऱ्याच अंशी काम पूर्ण झालं असून अवघ्या महिन्याभरात बारावीचे निकाल विद्यार्थ्यांच्या हातात येणार आहेत.
दरम्यान दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. बारावीचा निकाल 25 मेपर्यंत तर दहावीचा निकाल 6 जूनपूर्वी जाहीर होईल. बारावीच्या निकालाला आता एक महिनापेक्षा कमी कालावधी राहिला आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्याशिवाय परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
नक्की वाचा - घरातल्या कुत्र्याच्या मृत्यूने धक्का; 12 वर्षांच्या मुलीने स्वत:चा जीवच संपवला!
यंदा बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख 28 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. तर दहावीच्या परीक्षेला 17 लाख विद्यार्थी बसले होते. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. तर दहावीच्या काही टक्के उत्तरपत्रिका तपासायच्या शिल्लक आहेत. दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच अधिकृतपणे तारखा जाहीर केल्या जातील. यंदा बोर्डाच्या निकालात कोण बाजी मारणार? नेहमीप्रमाणे मुलींचा टक्का सर्वाधिक असणार की मुलं यंदा बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world