
सुनील दवंगे: 'ज्यांना लग्नाच्या पत्रिका येत नाही ते अजित पवारांना वैष्णवी हगवणे प्रकरणासोबत जोडत आहेतट, असे म्हणत भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला. यावेळी सुजय विखे यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठराखणही केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले सुजय विखे पाटील?
"वैष्णवी हगवणे प्रकरणाशी अजित पवारांना जोडणे हे चुकीचं आहे, अजित पवारांच्या विरोधात बोलणारे शिवसेना उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाच्या लोकांना पत्रिका येतच नाही, ज्यांना लग्नाच्या पत्रिका येत नसतील त्यांना दुस-यांचा त्रास होत असल्याची मिश्किल टिप्पणी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी करत अजित पवारांची पाठराखण केली.
तसेच "लोकप्रतिनीधी असल्यानं लोक लग्नाकार्याला बोलवतात,.मी पण मागे एका लग्नाला गेलो तिथे नवरीच पळून गेली मग काय करणार.? असे म्हणत वैष्णवी हगवणे प्रकरण दुर्देवीच आहे. पुर्वी हगवणे कुटूंबीयाला कोणी ओळखत नव्हते मात्र आता आमदार अनं मंत्र्यापेक्षा अधिक प्रसिद्धी हगवणे कुटूंबाला मिळत असून काही लोक जाणीवपूर्वक हे करत असल्याची टीकाही सुजय विखे यांनी केली आहे. आता कायदा करावा लागेल की आरोपींना आपल्या कपड्यावर बिल्ला लावावा की तो आरोपी आहे.. म्हणजे लोकप्रतीनिधींना देखील निर्णय घेण शक्य होईल असेही सुजय विखे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेसचे निष्ठावान बाळासाहेब थोरात यांचे भाचे विधान परीषदेचे आमदार सत्यजित तांबे भाजप वाटेवर असल्यांची चर्चा सुरु आहे, यावर भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाला विरोध नसल्याचं स्पष्ट केले आहे. तसेच मामा आले भाचे तरी संगमनेरमध्ये राजकीय संघर्ष सुरुच राहणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world