Death Threat to Raj Thackeray and Avinash Jadhav: मुंबईमध्ये मराठीचा मुद्दा तापला असतानाच ठाण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. या धमकी देणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांना धमकी कोणी दिली ?
ठाण्यातील गांधीनगर परिसरातील पोखरण रोड येथील एक अज्ञात व्यक्तीकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गाडी लावण्यावरुन वाद झाल्यानंतर एका रिक्षा चालकाने ही धमकी दिल्याचं समोर आले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक रिक्षाचालक राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत असल्याचे दिसत आहे. हा मुंबई नाही आहे हा ठाण्यातील गांधीनगर आहे इकडे फक्त उत्तर भारतीय यांचा चालेल. इथे फक्त भैय्या लोकांचीच चालेल असं हा तरुण म्हणत आहे.
Palghar News: झडप घातली, दप्तरामुळे वाचला जीव; पाचवीतल्या पोरांनी बिबट्याला पळवलं
आम्ही भैय्या आहे, मनसे वगेरे चालत नाही! ब्लेडने वार करेन!!
मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव याला ब्लेडने वार करेन. आम्ही भैय्या आहे, मनसे वगेरे चालत नाही, असंही हा तरुण म्हणतोय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने मराठी प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित तरुणाला धडा शिकवावा, अशी मागणी होत आहे.
Dombivli News: 65 बेकायदा इमारत प्रकरणी मोठा ट्वीस्ट, कोर्टाने दिले आता 'हे' आदेश
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world