जाहिरात

Sangli News : तमाशा... दारू... प्रेम! 24 तासात 3 खून; सांगलीत खळबळ

सांगलीतील कवलापूर आणि कुपवाडमध्ये 24 तासात तीन खुनाच्या घटनांनी खळबळ उडाली आहे.

Sangli News : तमाशा... दारू... प्रेम!  24 तासात 3 खून; सांगलीत खळबळ

शरद सातपुते, प्रतिनिधी

Sangli News : सांगलीतील कवलापूर आणि कुपवाडमध्ये 24 तासात तीन खुनाच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. तमाशा पाहताना लागलेला धक्का, दारू पिताना झालेला वाद या कारणातून दोन वेगवेगळे खून झालेत. तर प्रेम संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीचा पत्नीनेच खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनांमुळे मात्र सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

हत्येच्या तीन घटना...

१. सांगलीच्या कवलापूरमध्ये यात्रेनिमित्त तमाशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी तमाशा पाहण्यासाठी विश्वास कल्लाप्पा सुतार हा 32 वर्षीय तरुण गेला होता. त्याचवेळी रोहीत उर्फ नवनाथ श्रीरंग नाईक हा देखील तमाशा पाहण्यासाठी गेला होता. यावेळी विश्वास याचा रोहीत उर्फ नवनाथ याला धक्का लागला. दोघेही दारूच्या नशेत असल्याने शिवीगाळचा प्रकार घडला. त्यानंतर रोहीत उर्फ नवनाथ याने विश्वास याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.

२. तर दुसरीकडे कुपवाड शहरात दोन खुनाच्या घटना घडल्यात. कुपवाडमधील सचिन माने हा दारू पिण्यासाठी दारू दुकानात गेला होता. त्याचवेळी त्याचासोबत पूर्वी पासून वाद असणारे दोघेही दारू पिण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. त्यावेळी त्यांच्यात वादाचा प्रकार घडला. त्यानंतर दोघांनी सचिन माने याच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृणपणे खून केला. खुनानंतर दोघांनी पलायन केलं असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

नक्की वाचा - Ashok Kharat : अशोक खरातचं 46 वर्षांपूर्वीचं पहिलं मोठं कांड समोर; किशोरवयात 'कारनामा' करून झाला होता पसार 

३. तर तिसर्‍या खुनाच्या घटनेत दगडू केंगार या बांधकाम कामगाराचा खून झालाय. प्रेम संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीचा पत्नीनेच खून केल्याची घटना घडलीये. याप्रकरणी दगडू केंगार याच्या पत्नीला कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दगडू केंगार याच्या पत्नीचे एका तरुणासोबत प्रेम संबंध होते. परंतू या प्रेम संबंधाला दगडू केंगार याचा विरोध होता. त्यातून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होता. प्रेम संबंधात अडथळा ठरल्यानेच पतीचा खून केल्याचे पत्नीने कबुली दिली आहे. दरम्यान 24 तासात तीन खुनाच्या घटना घडल्याने सांगली जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com