जाहिरात

आधी फडणवीसांची भेट नंतर आमदारांना कानमंत्र; उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा सल्ला दिला

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांशी संवाद साधत त्यांना विधानसभेचे कामकाज गाजवण्याचे आदेश दिले. 

आधी फडणवीसांची भेट नंतर आमदारांना कानमंत्र; उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा सल्ला दिला

नागपूर:  नागपूरमध्ये सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध विषयांवरुन चांगलीच खडाजंगी रंगताना दिसत आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांशी संवाद साधत त्यांना विधानसभेचे कामकाज गाजवण्याचे आदेश दिले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

'काहीजण येतात आणि त्यांच्या हितासाठी त्यांना पुढे करतात. मराठी भाषा अशी आहे की जी आपल्याला वापरता आली पाहिजे. अनिल परब यांनी लक्षवेधी विषयी सांगितलं ते महत्वाचे आहे. गेले पाच वर्ष आपण अनुभवल की एखादे वक्तव्य कोणाच्या अंगलट येते. मी सभागृहात असायचो तेव्हा वर अनिलला विचारायचो आणि खाली सुनील प्रभू यांना विचारायचो. पुढे फडणवीस असले तरी माझे 20 आहेत हे मी अनेकवेळा बोललो आहे आताही तेच सांगतो,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

'अनेकजण आपल्यापैकी एकटे एकटे होते तेव्हा त्यांनी सभागृह डोक्यावर घेण्याच काम केल आहे.  आपल्याकडे भुजबळ होते तेव्हा ते एकटे सभागृह डोक्यावर घ्यायचे. संधी मिळाली की सोनं करता येत एक जरी असला तरी सभागृह डोक्यावर घेता येते. विधानसभेत मिळणारी पुस्तक तुम्ही घ्या नियमावली समजून घ्या.  त्यांच्याकडे संख्याबळ खूप असलं तरी त्यांच्याकडे नाराजी देखील खुप आहे. तुम्ही मात्र एकजुटीने राहा. आपल्याला कोणाचीही वैयक्तिक भानगडीत पडायचं नाही,' असा सल्लाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. 

ट्रेंडिंग बातमी - संतोष देशमुख हत्या! आरोपी बरोबर काय संबंध? धनंजय मुंडे पहिल्यांदाच थेट बोलले

'आपलं राजकारण हे सूसंस्कृत राजकारण असेल. तुम्ही आता फक्तं वीस आमदार आहात, पण तुम्ही ही संख्या कमी समजू नका. या आधी शिवसेनेच्या इतिहासात पाहिले तर वामनराव महाडीक असतील किंवा छगन भूजबळ असतील हे सभागृहात एकटे आमदार असताना सर्वांना भारी पडत होते, असे सभागृह डोक्यावर घेणारे आमदार आपण दिलेत,' असे म्हणत सभागृह गाजवण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी दिले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com