जाहिरात

Nashik News : एकाच महिन्यात ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का; बडगुजरांपाठोपाठ मोठ्या नेत्याचा पक्षाला राम राम

काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. 

Nashik News : एकाच महिन्यात ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का; बडगुजरांपाठोपाठ मोठ्या नेत्याचा पक्षाला राम राम

Nashik News : कडाडून विरोध, हायहोल्टेज ड्राम्यानंतर अखेर शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईमध्ये ुभाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भाजप आमदार सीमा हिरे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला होता. मात्र हा विरोध डावलून सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. (Uddhav Thackeray Shiv Sena faces big setback)

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठं खिंडार पडलं आहे. ठाकरे सेनेचे माजी महानगर प्रमुख विलास शिंदे आज 8 नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांसह शिंदेच्या सेनेत प्रवेश करणार आहेत. आज ठाण्यात दुपारी 12 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे. या प्रवेशासाठी नाशिकहून जोरदार शक्तिप्रदर्शन करत शिंदे ठाण्याकडे रवाना होणार आहेत.

Tanaji Sawant : शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली, ICU मध्ये दाखल; अँजिओप्लास्टी होण्याची शक्यता

नक्की वाचा - Tanaji Sawant : शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली, ICU मध्ये दाखल; अँजिओप्लास्टी होण्याची शक्यता

विलास शिंदेसह 8 नगरसेवक, 12 जिल्हा परिषद सदस्य, 40 हून अधिक सरपंच, जिल्हा बँक, बाजार समितीचे आजी माजी पदाधिकारीही शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ ठाकरे गटातील मोठा चेहरा शिंदे गटात गेल्याने ठाकरें सेनेला अवघ्या 1 महिन्यात दुसरा मोठा धक्का बसला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com