जाहिरात

BJP Maha Adhiveshan : राज्यात शिवशाही स्थापन करण्यासाठी जनतेने भाजपला अभुतपूर्व यश दिलं : नितीन गडकरी

Nitin Gadkari : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाचे हे यश आहे, असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं.  

BJP Maha Adhiveshan : राज्यात शिवशाही स्थापन करण्यासाठी जनतेने भाजपला अभुतपूर्व यश दिलं : नितीन गडकरी

विधानसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मिळालेल्या घवघवीत यशानंतर शिर्डीत भाजपचं दोन दिवसीय राज्यस्तरीय महाधिवेशन पार पडत आहे. राज्यभरातील सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांनी या महाधिवेशनाला हजेरी लावली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील उपस्थितींना मार्गदर्शन केलं. महाराष्ट्रातील जनतेने राज्यात शिवशाही स्थापन करण्यासाठी भाजपला अभुतपूर्व यश दिलं आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. शिवरायांची शिवशाही राज्यात निर्माण करणे ही आमची संकल्पना आहे. 20 वे शतक अमेरिकेचे होते, आता एकविसावे शतक भारताचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींजींना भारताला विश्वगुरु बनवायचं आणि आत्मनिर्भर विकसीत भारत तयार करायचा आहे. भारताला जगातली तिसरी आर्थिक व्यवस्था म्हणून पुढे न्यायचं आहे. 

(नक्की वाचा - BJP News : रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती)

महाराष्ट्राच्या निवडणुकीत जनतेने आपल्याला अभूतपूर्व यश दिले. हे या राज्यात शिवशाहीचे राज्य स्थापन करण्यासाठी दिले आहे. त्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर टाकली आहे. हे यश म्हणजे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या इतिहासाचे सूवर्ण शिखर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाचे हे यश आहे, असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं.  

(नक्की वाचा- Walmik Karad: पैशांचा ढीग, फार्महाऊस अन् 11 कोटींचा स्कॅम; वाल्मिक कराडने 140 जणांना कसं लुटलं?)

यश मिळालेल आहे पण ज्या अपेक्षेने जनतेने हे मत दिले त्या पूर्ण करण्याची जबाबदारीही आपल्यावर आहे. हा महाराष्ट्र  छत्रपती शिवरायांचा, शाहू- फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. जनतेचे कल्याण झाले पाहिजे. शिर्डीच्या या पवित्र भूमीवर साईबाबांचे स्मरण करुन विजयाच्या मिळालेल्या विश्वासातून भविष्याचा महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आपण सर्व करुया, असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com