जाहिरात
This Article is From May 09, 2024

सुटीचा आनंद ठरला क्षणभंगुर, वसईतील रिसॉर्टमध्ये चिमुकलीचा मृत्यू 

Vasai Swimming Pool: वसईतील रिसॉर्टमध्ये सुटीचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

सुटीचा आनंद ठरला क्षणभंगुर, वसईतील रिसॉर्टमध्ये चिमुकलीचा मृत्यू 

मनोज सातवी, वसई
Vasai Swimming Pool: स्विमिंग पूलमध्ये बुडून एका दहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. वसईतील पश्चिम भागातील रानगाव येथील रॉयल रिसॉर्टमध्ये ही घटना घडली आहे. मृत पावलेल्या मुलीचे नाव रिद्धी माने (वय 10 वर्ष) असे आहे. रिद्धी माने ही विरार पूर्वेकडील कारगिल नगरातील श्री साई कीर्ती चाळीमध्ये राहत होती. उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद लुटण्यासाठी माने कुटुंबीय रॉयल रिसॉर्टमध्ये आले होते.  

(नक्की वाचा: पालकांनो मुलांवर ठेवा लक्ष! इन्स्टाग्राममुळे अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त)

यावेळेस रिद्धी लहान मुलांच्या स्विमिंग पूलमध्ये खेळत होती. तिची आई देखील सोबत होती. पण थोड्या वेळाने रिद्धीची आई मुलांसाठी खाऊ आणण्याकरिता स्विमिंग पूलबाहेर पडली. यादरम्यान रिद्धीने मोठ्या स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. पण पोहता येत नसल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे या स्विमिंग पूलजवळ जीवरक्षक देखील उपस्थित नसल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(नक्की वाचा: दिल्लीतील फर्जी गजाआड, कल्याण पोलिसांनी जप्त केल्या हजारोंच्या बनावट नोटा)

दरम्यान, इतक्या मोठ्या रिसॉर्टमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याने दुर्घटनांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. 

(नक्की वाचा: Jalebi Baba: 100हून अधिक महिलांवर बलात्कार करणाऱ्या जलेबी बाबाचा मृत्यू)

VIDEO: तुमचा खिसा UPI मुळे रिकामा होतोय, IIT दिल्लीच्या सर्व्हेक्षणात महत्त्वाचे निष्कर्ष  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com