जाहिरात

Viral video: 'काका आहेत का?' धडाधड मराठी बोलणारा कावळा, व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य काय?

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गारगाव या गावात हा कावळा आहे.

Viral video: 'काका आहेत का?' धडाधड मराठी बोलणारा कावळा, व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य काय?
पालघर:

मनोज सातवी 

सध्या एक कावळा सोशल मीडियावर जोरदार व्हायर होत आहे. त्याला कारण ही आहे. तो कावळा या व्हिडीओत धडाधड मराठी बोलताना दिसत आहे. या आधी आपण पोपट बोलताना पाहीले आहे. पण कावळा बोलतो असं पहिल्यांदाच घडत आहे. पण तो खरोखर मराठीत बोलतो असं या व्हिडीत दिसत आहे. हा कावळा पालघर जिल्ह्यातील गारगावात आहे. गावात राहाणाऱ्या मुकणे परिवाराचा तो एक सदस्य आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सध्या हा कावळा आकर्षणाचा विषय ठरला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

    पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गारगाव या गावात हा कावळा आहे. तो चक्क मराठीमध्ये बोलतो. कावळा बोलतोय हे ऐकून तुम्हाला नवलं वाटलं असेल परंतु हे खरं आहे. येथील मुकणे कुटुंबीयांचा एक सदस्य बनलेला हा कावळा कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या लहान मुलाप्रमाणे संवाद साधतोय. सध्या या कावळ्याच्या बोलण्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.  त्यामुळेच हा बोलका कावळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

    ट्रेंडिंग बातमी - Walmik Karad : बीड कारागृहात वाल्मीकच बॉस? 'ते' कैदी बाहेर येताच धडाधड बोलले

    वाडा तालुक्यातील गारगाव येथील तनुजा मुकणे या बारावीत शिकणाऱ्या मुलीला हा कावळा मिळाला होता. जवळपास तीन वर्षा पूर्वी एका झाडाखाली हा कावळा पडलेला तिला आढळला होता. त्यावेळी हा कावळा पंधरा दिवसांचा होता. त्यानंतर ती त्या कावळ्याच्या पिल्लाला घरी घेवून आली होती. तेव्हा पासून हा कावळा मुकणे कुटुंबात आहे. हे कुटुंब त्याचा घरातल्या सदस्या प्रमाणे सांभाळ ही करतात. 

    ट्रेंडिंग बातमी - Chhatrapati Sambhajinagar : आईने रचला लेकाच्या हत्येचा कट, कारणही हादरवणारं!

    माणसांमध्ये राहून हा कावळा त्यांच्या प्रमाणेच बोलत आहे. काका, बाबा, काका आहेत का असं तो मराठीत खणखणीत बोलतो. तो घरातल्या सदस्यां समोर मराठीत संवाद साधतो. त्याचा हा मराठी बोलतानाचा हाच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या कावळ्याला घरात असलेल्या प्राणी आणि पक्षांची ही साथ आहे. या कावळ्याची काळजी ही ते घेत असतात. पण तोच त्यांच्यात मराठी बोलतो. त्यामुळे हा कावळा सर्वांपेक्षा वेगळा ठरतो.  

    Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

    Follow us: