जाहिरात

Wardha Politics : कराळे मास्तरांमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार? वर्ध्यात नेमकं काय घडतंय?

वर्धा जिल्ह्यातील आर्वी आणि वर्धा अशा दोनपैकी एका ठिकाणी उमेदवारी मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. नितेश कराळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेतल्या आहे.

Wardha Politics : कराळे मास्तरांमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार? वर्ध्यात नेमकं काय घडतंय?

निलेश बंगाले, वर्धा

वर्ध्यातीतल प्रसिद्ध 'खदखद' मास्तर नितेश कराळे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कराळे मास्तर आर्वी, वर्धा  विधानसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. नितेश कराळे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लोकसभा निवडणुकीती कराळे मास्तर हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यावेळी त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. मात्र आता विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा कराळे मास्तर यांना पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

(नक्की वाचा- अजित पवार गटाला 'घड्याळ' चिन्ह वापरता येणार की नाही? सुप्रीम कोर्टात आज होणार फैसला)

वर्धा जिल्ह्यातील आर्वी आणि वर्धा अशा दोनपैकी एका ठिकाणी उमेदवारी मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. नितेश कराळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेतल्या आहे. कराळे मास्तर यांच्या निवडणूक लढण्याच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढू शकते.

(नक्की वाचा- सणासुदीच्या तोंडावर महागाईचा झटका! गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ)

कारण एकीकडे नितेश कराळे यांना विधानसभेसाठी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवारीसाठी विधानसभा उपाध्यक्ष राहिलेले दिवंगत प्रमोद शेंडे यांचे पुत्र शेखर शेंडे आणि दत्ता मेघे यांचे पुतणे अभ्युदय मेघे यांनी देखील दावा केला आहे. त्यामुळे वर्ध्याच्या जागेवरुन रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा गड राहिलेल्या वर्ध्यात कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com