जाहिरात

Davos Parishad 2025: दावोस परिषद म्हणजे काय? मुख्यमंत्र्यांच्या सर्वात चर्चित दौऱ्याचं महत्त्व काय? जाणून घ्या खास माहिती

राज्यातील मुख्यमंत्र्यांचा सर्वात चर्चित दौरा आणि जगभरातील उद्योजक, मोठे नेत्यांच्या उपस्थितीत कोट्यवधींची गुंतवणूक होणारी दावोस परिषद नेमकी काय आहे?  या परिषदेत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते? वाचा...

Davos Parishad 2025:  दावोस परिषद म्हणजे काय? मुख्यमंत्र्यांच्या सर्वात चर्चित दौऱ्याचं महत्त्व काय? जाणून घ्या खास माहिती

Davos Summit 2025:  20 जानेवारीपासून दावोस येथे सुरु होणाऱ्या जागतिक आर्थिक फोरम परिषदेत सहभागी होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वित्झर्लंडला गेले आहेत. या परिषदेतून महाराष्ट्रात तब्बल सात लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार होणे अपेक्षित आहे. याआधी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दावोस दौऱ्यातून कोट्यवधींचे करार केले होते.

राज्यातील मुख्यमंत्र्यांचा सर्वात चर्चित दौरा आणि जगभरातील उद्योजक, मोठे नेत्यांच्या उपस्थितीत कोट्यवधींची गुंतवणूक होणारी दावोस परिषद नेमकी काय आहे?  या परिषदेत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते? ही दावोस परिषद महाराष्ट्रासाठी का महत्त्वाची आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. जगभरातील नेते, उद्योजक, व्यावसायिक, अर्थशास्त्रज्ञांच्या उपस्थितीत होणाऱ्या या परिषदेबद्दल सविस्तर माहिती वाचा....

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जागतिक आर्थिक फोरम परिषद म्हणजे काय? 

जागतिक आर्थिक फोरम परिषद(  WEF) ही एक खासगी संस्था आहे, जर्मन प्रोफेसर क्लाउस श्क्वाब यांनी 1971 मध्ये या संस्थेची स्थापना केली. जागतिक व्यवसाय, राजकारण, शिक्षण, अर्थशास्त्र आणि इतर क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींना एकत्र आणून एखाद्या प्रदेशाचा सर्वांगिण विकास करणे हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे. पाच दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये फक्त व्यापारीच नव्हेतर जगभरातील नेते, सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक आणि प्रशासकीय अधिकारीही एकत्र येऊन जगभरातील आव्हाने, समस्या आणि गुंतवणुकीबाबत चर्चा करतात. 

ट्रेंडिंग बातमी -  त्या हॉटेलच्या किचनमध्ये शिजत होतं चिकन, अन् बाहेरच्या टेबलावर संतोष देशमुखांच्या हत्येचा कट
 
दावोस परिषद असं का म्हटलं जात?

जागतिक आर्थिक फोरम परिषद(  WEF) ही एक खासगी संस्था आहे, जर्मन प्रोफेसर क्लाउस श्क्वाब यांनी 1971 मध्ये या संस्थेची स्थापना केली. जागतिक व्यवसाय, राजकारण, शिक्षण, अर्थशास्त्र आणि इतर क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींना एकत्र आणून एखाद्या प्रदेशाचा सर्वांगिण विकास करणे हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे. पाच दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये फक्त व्यापारीच नव्हेतर जगभरातील नेते, सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक आणि प्रशासकीय अधिकारीही एकत्र येऊन जगभरातील आव्हाने, समस्या आणि गुंतवणुकीबाबत चर्चा करतात. 

दावोस परिषद असं का म्हटलं जात? 
 दरवर्षी या संस्थेतर्फे स्वित्झर्लंडच्या दावोस या नयनरम्य ठिकाणी एका परिषदेचं आयोजन केलं जातं. त्यात सुमारे 3000 जण सहभागी होतात. दावोस या शहरात याचे आयोजन केले जात असल्याने दावोस परिषद असं नाव पडले. स्वित्झरर्लंडमधील लँड वासर नदीकाठी वसलेलं दावोस हे अत्यंत सुंदर शहर आहे. स्विस आल्प्स पर्वताच्या प्लेसूर आणि अल्बूला पर्वतरांगांनी वेढा दिल्याने याठिकाणी निसर्गाचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो. दावोस शहराची लोकसंख्या फक्त 11,000 एवढी असून युरोपमधील सर्वात उंचीवर वसलेलं शहर म्हणून ते ओळखले जाते. 

ट्रेंडिंग बातमी - Exclusive : "अशी भांडणं आम्ही शाळेत लावायचो", वडेट्टीवार-राऊतांच्या आरोपांना उदय सामंतांचं उत्तर

जगभरातील महत्त्वाचे नेते, संयुक्त राष्ट्रांसारख्या मोठ्या संघटनांचे प्रमुख, वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रतिनिधी, वेगवेगळ्या संस्थांचे ब्रँड अँबेसिडर असलेले जगविख्यात सेलिब्रेटी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुख, अर्थतज्ज्ञ आणि विचारवंत या परिषदेत सहभागी होतात. या परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण आवश्यक असते तसेच काही रिपोर्टनुसार तीन कोटी रुपये भरुन याचे सदस्यत्व घेता येते. 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक दिग्गजांच्या गाठीभेटी घेत या दौऱ्याचा श्रीगणेशा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची भेट घेतली.  नवीन तंत्रज्ञान, नाविन्य यावर भर देताना असे आयोजन राज्य सरकारसोबत सहकार्याने करण्याबाबत तसेच होरॅसिसचे मुंबईत मुख्यालय असण्याबाबत सुद्धा यावेळी प्राथमिक चर्चा झाली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com