जाहिरात

सत्तार की सावे? कोण होणार संभाजीनगरचा पालकमंत्री; संजय शिरसाटही वेटिंगवर

आता संभाजीनगर जिल्ह्याचा नवीन पालकमंत्री कोण होणार? याची चर्चा जिल्हाभरात पाहायला मिळत आहे.

सत्तार की सावे? कोण होणार संभाजीनगरचा पालकमंत्री; संजय शिरसाटही वेटिंगवर

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे विजयी झाले आहेत. त्यामुळे विधानसभा सदस्य पदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. ज्यात त्यांचे कॅबिनेट मंत्रिपद आणि संभाजीनगरचं पालकमंत्री पद देखील जाणार आहे. त्यामुळे आता संभाजीनगर जिल्ह्याचा नवीन पालकमंत्री कोण होणार? याची चर्चा जिल्हाभरात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सध्याच्या सरकारमध्ये सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार आणि पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल सावे कॅबिनेट मंत्री आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांपैकी कुणाच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(ट्रेडिंग न्यूज: 'मी निवडून हीरो झाले असते, ते कुणाला कसं आवडेल'; पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?)

संभाजीनगरचे पालकमंत्री पद मिळावं यासाठी अब्दुल सत्तार यांच्यासह अतुल सावे यांच्याकडून देखील पडद्यामागून हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे. तर "लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे भुमरे यांच्या विजयात भाजपचा मोठा वाटा असून, पालकमंत्री पद भाजपला देण्याची मागणी केली जात आहे. एवढेच काय तर अतुल सावे यांनाच पालकमंत्री करण्याची मागणी स्थानिक भाजप नेत्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

(ट्रेडिंग न्यूज: रायबरेली की वायनाड? राहुल गांधींचं ठरलं, प्रियांका गांधी लढवणार निवडणूक)

अब्दुल सत्तारांचं दबावतंत्र?

महायुतीत संभाजीनगरचं पालकमंत्री पद नेहमी शिवसेनेकडे राहिले आहे. त्यामुळे या पदावर आपली वर्णी लागावी यासाठी अब्दुल सत्तार देखील इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच अब्दुल सत्तारांकडून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची देखील चर्चा आहे. अब्दुल सत्तार पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे चर्चा सुरू आहे, त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपलं प्रासंगिक करार असल्याचं सत्तार म्हणाले आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार शिवसेनेची साथ सोडणार का? असेही बोलले जात आहे. मात्र, सत्तारांच्या या सर्व भूमिकेमागे पालकमंत्री पदासाठी दबावतंत्र तर वापरले जात नाही ना? अशीही चर्चा आहे.

(ट्रेडिंग न्यूज: PM नरेंद्र मोदींकडे जातीय जनगणनेची मागणी करणार : छगन भुजबळ)

संजय शिरसाट वेटिंगवर?

शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यापासून आमदार संजय शिरसाठ मंत्रिमंडळाच्या वेटिंग लिस्टमध्ये सर्वात आघाडीवर आहे. एवढेच काय तर अनेकदा संजय शिरसाट यांनी मंत्रिपदाची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली. आता विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यात तरी संजय शिरसाठ यांचा नंबर लागतो का? आणि मंत्री झाल्यावर संभाजीनगरचे पालकमंत्री पद त्यांना मिळणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Ajit Pawar And Eknath Shinde | अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com