
इंदापूरच्या जंक्शनमध्ये सदाशिव मोहोळकर शिक्षण संस्थेचा 25 वा रौप्य महोत्सव सोहळा पार पडला. यावेळी अल्पवयीन मुलांमध्ये वाढती गुन्हेगारी पाहता अजित पवारांनी शालेय विद्यार्थ्यांना चांगलंच धारेवर धरलं. विद्यार्थ्यांमधील वाढती गुन्हेगारी टवाळखोरी कमी करण्यासाठी पोलिसांच्या मदतीने शक्ती अभियान सुरू केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यासाठी तक्रार नोंदवण्याकरता शक्ती मोबाईल नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
यावेळी अजित पवारांनी विद्यार्थ्यांना धारेवर धरताना चांगलीच कानउघाडणी केली. शिवाय दादा दम भरायला ही विसरले नाहीत. जर कुठे विद्यार्थ्यांवर अन्यात होत असेल, टवाळखोही होत असेल, छेडछाड होत असेल हे टाळण्यासाठी शक्ती संपर्क नंबर देण्यात आला आहे. यानंबर विद्यार्थी तक्रार करू शकतात. या संपर्क नंबरवर कोणीही गंमत म्हणून फोन करू नका. असं ही यावेळी अजित पवार अर्जून म्हणाले.
पुढे तर त्यांनी विद्यार्थ्यांना दमच भरला. आम्हाला जर कळलं की गंमत म्हणून कुणी फोन केलाय, तर मी त्याची अशी गंमत करीन की त्याच्या दहा पिढ्या आठवणीत राहतील. या शब्दात अजित पवारांनी विद्यार्थ्यांची कान उघाडणी केलीय. कोण चुकत असेल तर तो कितीही मोठ्या बापाचा पोरगा-पोरगी असेल तर हयगय करू नका. सगळ्यांना कायदा नियम सारखा म्हणत अजित पवारांनी पोलीस खात्याला ही खडे बोल सुनावले.
एकमेकांकडे का बघितलं म्हणून भांडण होतात. कोयत्याने वार केले जात आहेत. हे प्रकार थांबले पाहिजेत. आई बापाने तुम्हाला जन्माला घातले ते एकमेकांकडे आकसाने बघण्यासाठी नाही. भांडण करण्यासाठी तर अजिबात नाही. मी पोलिसांना सांगितले आहे, यात कोणाचे ही लाड करू नका. पुणे भागात अल्पवयीन शालेय मुलांमध्ये गुन्हे करण्याचं प्रमाण वाढत आहे. अशा काही घटना गेल्या काही दिवसात समोर आल्या होत्या. त्यानंतर शक्ती क्रमांकाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world