जाहिरात

राज्यसभेत जोरदार खडाजंगी! धनखडांनाच खरगेंनी खडसावले, सत्ताधारी विरोधक भिडले

खरगे यांचे आक्रमक रूप आणि सभागृहात विरोधकांचा राग, त्यातुन निर्माण झालेला गोंधळ लक्षात घेता राज्यभेचे सभापती जगदीप धनखड यांनी राज्यसभेचे कामकाज तहकूब केले.

राज्यसभेत जोरदार खडाजंगी! धनखडांनाच खरगेंनी खडसावले, सत्ताधारी विरोधक भिडले
नवी दिल्ली:

राज्यसभेत आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. वादाचा मुद्दा हा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड हे होते. त्यांच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास ठराव आणला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या ट्विटरवरून धनखड यांच्या विरोधात बोचऱ्या शब्दात टीका केली होती. शिवाय ते कसा पक्षपात करतात हे उदाहरणासह सांगितलं होतं. याधी राज्यसभेच्या इतिहासात असा पक्षपात कधीत झाला नव्हता असंही त्यांनी म्हटलं आहे. याचे जोरदार पडसाद राज्यसभेचे कामकाज सुरू होताच उमटले. शेवटी प्रचंड गदारोळ झाला. पण धनखड आणि खरगे यांच्यात झालेली खडाजंगी  संपुर्ण सभागृहाने अनुभवली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्यसभेच्या कामकाजाला सुरूवात होताच गदारोळाला सुरूवात झाली. राज्यासभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे. याविरोधात भाजप खासदार राधामोहन दास अग्रवाल यांनी विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे. त्यावरून सभागृहात गदारोळ सुरू झाली. यावेळी सभापती धनखड आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात जोरदार वादावादी झाली. विरोधकांनी यावेळी जोरदार गदारोळ करत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. 

ट्रेंडिंग बातमी - 'जरा जरी लाज लज्जा शरम शिल्लक असेल तर...' ठाकरे भाजपवर का भडकले?

सभापती जगदीप धनखड यांनी यावेळी आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्यावर अविश्वास ठराव आणला गेला आहे. हा विरोधकांचा संविधानीक अधिकार आहे. पण त्यामुळे आपल्याला वैयक्तीक त्रास झाला आहे. हे सभागृह चालावे यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. प्रत्येकाचे अधिकार जपवे जावेत यासाठी प्रयत्न केले आहे. त्यामुळे सभागृहात ज्या गोष्टी सुरू आहेत त्याचा मला खूप त्रास झाला. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी झुकणार नाही. विरोधकांनी संविधानाचे तुकडे केले.

ट्रेंडिंग बातमी - 'शरद पवार, अजित पवार एकत्र येणार? रोहित पवारांच्या आईंचे सर्वात मोठे विधान

जगदीप धनखड यांना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी तेवढ्याच जोरदार पणे प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही सतत आमच्या पक्षाच्या नेत्यांचा अपमान करता. आम्हाला बोलू देत नाही. आम्ही बोललो तर ते कामकाजातून काढून टाकता. बोलताना प्रत्येक वेळी टोकता. तुमचे काम सभागृह चालवणे आहे. तुमची स्तुती ऐकायला आम्ही इथे आलो नाही. तुम्ही शेतकऱ्याचे पुत्र असाल तर मी मजुराचा मुलगा आहे. तुम्ही माझा आदर करत नसाल तर मी तुमचा आदर का करू? असा थेट सवाल खरगे यांनी धनखड यांना करत त्यांचीच कोंडी केली. 

ट्रेंडिंग बातमी - Allu Arjun Arrested : संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरण, हैदराबादमधून सुपरस्टार अल्लु अर्जुनला अटक

खरगे यांचे आक्रमक रूप आणि सभागृहात विरोधकांचा राग, त्यातुन निर्माण झालेला गोंधळ लक्षात घेता राज्यभेचे सभापती जगदीप धनखड यांनी  राज्यसभेचे कामकाज तहकूब केले. त्या आधी धनखड यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या चेंबरमध्ये चर्चेसाठी आमंत्रित केले. पण धनखड यांचे म्हणणे ऐकण्याच्या मनस्थितीत विरोधी पक्ष नव्हता. त्यामुळे गोंधळ वाढत गेला. अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. आता राज्यसभेचे कामकाज सोमवारी सुरू होणार आहे.