
मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेवर मराठा आंदोलकां पैकी एक असलेल्या बाळासाहेब शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे. शिवाय जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्याच विरोधात आंदोलन करण्याचा निश्चय केला आहे. या आंदोलनात नऊ हजार मराठा आंदोलक सहभागी होतील असा दावा शिंदे यांनी केला आहे. अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनीही जरांगे यांच्या भूमिकेला विरोध करत, बार्शीत सभा घेवूनच दाखवा असे आव्हान दिले होते. त्यामुळे जरांगेंना विरोध करणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. याबाबत जरांगे काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बार्शी इथले मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे यांच्यातला वाद चिघळला आहे. मनोज जरांगे यांना मराठा आंदोलक बाळासाहेब शिंदे यांनी अकरा प्रश्न विचारले होते. त्यानंतर बाळासाहेब शिंदे यांना शंभरहून अधिक धमक्यांचे फोन आले आहेत असं त्यांनी सांगितले. असं असलं तरी आपण जरांगेंचा विरोध करतच राहाणार आहे असे शिंदे म्हणाले. या पार्श्वभूमिवर 9 हजार कार्यकर्त्यांसह जरांगे यांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मनोज जरांगेंचे कार्यकर्ते, तसेच महाविकास आघाडीचे काही लोक जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा दावाही बाळासाहेब शिंदे यांनी केला आहे. जरांगे यांच्यामुळे मराठा समाजाच्या विरोधात सर्व जाती-जमाती एकवटल्या आहेत असा आरोप शिंदे यांनी केला. त्यामुळे मराठा समाजाचे मोठं नुकसान होत आहे. शिवाय जरांगे पाटील हे शरद पवारांची भाषा बोलत आहेत. ते शरद पवारांचे कार्यकर्ते असल्या सारखे वागत आहेत, असा थेट आरोपही त्यांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - हर्षवर्धन पाटील लढणार की माघार घेणार? इंदापूर विधानसभा कोणाच्या पारड्यात?
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांनी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली आहे. भाजपच्या उमेदवारांना पाडा असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केला आहे. हे सरकार घालवायचे आहे असंही ते म्हणाले होते. शिवाय मराठा समाजाचे हक्काचे आमदार विधानसभेत पाठवायचे आहेत असेही जरांगे म्हणाले होते. त्यासाठी समाज काही उमेदवार रिंगणात उतरवेल असे भाष्यही त्यांनी केले. त्याबाबत अजून निर्णय जरी झाला नसला तरी त्याची चाचपणी जरांगे करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world