
राहुल गांधी गेल्या दोन आठवड्यांपासून बिहारच्या मैदानात होते. त्यांच्यासोबत तेजस्वी यादव, दीपांकर भट्टाचार्य आणि मुकेश सहनी हे 15 दिवस सोबत होते. या 15 दिवसांच्या प्रवासात राहुल गांधींनी सुमारे 1300 किलोमीटरचा प्रवास केला आहे. ज्यात 23 जिल्ह्यांचा समावेश होता. ही यात्रा 174 विधानसभा मतदारसंघांमधून गेली. राहुल गांधींनी हाच मार्ग का निवडला, यातच या संपूर्ण प्रवासाचे सार आहे. या 174 जागांपैकी, महागठबंधनने 74 जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच 100 जागांवर महागठबंधनला अधिक मेहनत करण्याची गरज आहे. या 174 जागांपैकी, आरजेडीने 104 जागा लढल्या, ज्यात त्यांना 50 जागांवर यश मिळाले. काँग्रेसने 51 जागा लढवून 14 जागांवर यश मिळवले आणि सीपीआय (माले) ने 14 जागा लढवून 9 जागा जिंकल्या. याचा अर्थ असा की, जर महागठबंधनला सत्तेत यायचे असेल, तर त्यांना या 100 जागांवर चांगली कामगिरी करावी लागेल.
विशेषतः त्या 16 जागांवर, जिथे विजयाचे अंतर 5 हजारपेक्षा कमी होते, तर 15 जागांवर 5 हजार ते 10 हजारच्या दरम्यानचे अंतर होते. महागठबंधनला आधी या 31 जागांवर मेहनत करावी लागेल. म्हणजेच 4 टक्के मतांची वाढ आवश्यक आहे. काँग्रेसला सर्वात आधी 20 टक्के दलित मतांमध्ये जागा मिळवावी लागेल. म्हणूनच पक्षाने रविदास समाजाच्या राजेश राम यांना प्रदेशाध्यक्ष बनवले आहे.
नक्की वाचा - Political news: मोहम्मद अजहरुद्दीन मंत्री होणार? कसं होणार शक्य, काय आहे गणित?
बिहारमध्ये सर्वाधिक दलित मतदार याच समाजातून येतात. त्यानंतर पासवान यांचा क्रमांक लागतो. महागठबंधनला अति-मागासवर्गातही जागा मिळवावी लागेल. तरच यश मिळेल. म्हणूनच राहुल गांधींनी या यात्रेत मुकेश सहनी यांना सातत्याने आपल्या शेजारी जागा दिली. कारण बिहारमध्ये मल्लाह समाजाची मते साडेतीन टक्क्यांपर्यंत आहेत. बिहारमध्ये राहुल गांधी आणि त्यांची 'वोट अधिकार यात्रा' यांनी वातावरण तयार केले आहे. पण महागठबंधनला ते पुढील एक महिना टिकवून ठेवावे लागेल. त्यानंतर उमेदवारांची निवड सर्वात महत्त्वाची ठरेल. कारण सध्या महागठबंधन फक्त 'शॅडो बॉक्सिंग' करत आहे. कारण एनडीए अजून मैदानात उतरलेलीच नाही.
हे मान्य करावं लागेली की राहुल आणि तेजस्वी यांनी जे वातावरण तयार केले आहे, त्याचे मतांमध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी बिहारच्या स्थानिक नेत्यांची असेल. पण काँग्रेसकडे जमिनीवर एवढी मजबूत संघटना आहे का? काँग्रेसने 'वोट अधिकार यात्रा'मध्ये एवढा जोर यासाठी लावला आहे. जेणेकरून जेव्हा ते आरजेडी आणि इतर पक्षांसोबत जागावाटपासाठी बसतील, तेव्हा ते जिंकणाऱ्या जागा मिळवू शकतील. कारण मागील निवडणुकीत काँग्रेसला 70 जागा देण्यात आल्या होत्या, पण ते फक्त 19 जागा जिंकले आणि तेजस्वी सरकार न बनण्याचे खापर काँग्रेसवर फोडण्यात आले होते.
यावेळी काँग्रेस या यात्रा आणि राहुल गांधींच्या दोन आठवड्यांच्या बिहार दौऱ्यामुळे जिंकणाऱ्या जागांवर दावा करेल. काँग्रेस यावेळी 70 पेक्षा कमी म्हणजेच 55-60 जागांवरच दावा करेल. महागठबंधनला वाटते की मुकेश सहनी यांच्या येण्याने त्यांची ताकद वाढली आहे. पण ते किती विश्वासार्ह असतील हे वेळच सांगेल. काहीही असो, राहुल गांधींनी बिहारमध्ये सुरुवातीची आघाडी घेतली आहे, पण ती टिकवून ठेवणे आवश्यक असेल आणि हेच महागठबंधनसमोरचे सर्वात मोठे आव्हान असेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world